Marathi Ukhane | Best 100+ मराठी उखाने

मित्रांनो आज आपण Marathi Ukhane या बद्दल जाणून घेऊया. आपल्या मराठी हिंदू संस्कृती मध्ये उखाणे घेण्याची जुनी पद्धत आहे. आपल्या मराठी परंपरा जश्या लग्न, हळदी कुंकू, घ्रह प्रवेश किंवा इतर कोणत्या शुभकार्याक्रमा मध्ये महिलांनी किंवा पुरुषांनी आपल्या पती किंवा पत्नीसाठी उखाणे घेण्याची पद्धत अजून टिकून आहे. तुम्हाला या कार्यक्रमांसाठी उखाण्याची गरज लागेल, म्हणून आम्ही विविध प्रकारचे छान Marathi Ukhane घेऊन आलोय.

Marathi Ukhane

हंसराज पक्षी दिसतात हौशी,
***चे नाव घेते सत्यनारायण दिवशी.

भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ
***रावांमुळे माझे जीवन झाले सार्थ

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर,
****चं नाव घेते ****ची लव्हर.

सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण,
… रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.

चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा,
…रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा.

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
….रावं बिड्या ओढतात संडासात बसून.

सासरचे निराजंन माहेरची फुलवात
***रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात.

पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी…
…मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
त्यातच एकरुप *** रावांचे सूख निर्झर.

पित्याचे कर्तव्य संपले,कर्तव्याला माझ्या सुरूवात
*** रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात.

Marathi Ukhane

संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा
*** रावांचे नाव घेऊन,मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा.

चांदी च्या वाटीत सोन्याचा चमचा
***रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा.

जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले
***रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले.

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
***रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची.

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
*** रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी. 

वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,
*** चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.

बारीक मणी घरभर पसरले,
***साठी माहेर विसरले. 

चांदीच्या ताटात गाजराचा हलवा.
*** रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा. 

चांदीचे जोडवे पतीची खूण,
*** रावांचे नाव घेते *** ची सून. 

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
***चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. 

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
*** चे नाव घेतो ऐका देऊन कान. 

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,
माझी ***म्हणते मधुर गाणी. 

काट्यात काटा गुलाबाचा काटा,
*** नाव घेतो गुलाबजाम खाता खाता. 

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,
***ला घास भरवतो वरणभात तूपाचा. 

बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड,
***रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड. 

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय,
***भाव देत नाही किती केले ट्राय.

Marathi Ukhane

खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका,
***माझी मांजर आणि मी तिचा बोका.

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
*** रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

घातली मी वरमाला हसले *** राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
***च्या सवे चालते मी सप्तपद !!

चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
***रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी,
***सोबत सुखी आहे सासरी.

फुलासंगे मातीस सुवास लागे,
***रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.

धरला यांनी हात वाटली मला भीती,
हळूच म्हणाले *** राव अशीच असते प्रीती.

एका वर्षात असतात महिने बारा,
*** च्या नावात समावलाय आनंद सारा.

गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध,
*** रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध.

ठाण्यातल्या गडकरीला लागलंय मोरूची मावशी 
***चे नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी 

चांदीच्या तबकात तुपाच्या फुलवाती 
***रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 

नव्हत्या माहित मला, जन्मातरींच्या गाठी,
***देवाने बनवलंय तुला, माझ्याच साठी.

घरात भरल्या अठरा धान्याच्या राशी 
***चं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 

आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,
***चं नाव घेते बारशाच्या दिवशी.

जडतो तो जीव, लागते ती आस,
***रावांसोबत सुरु झाला, माझा आयुष्याचा प्रवास.

सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,
***नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.

गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी,
***चे नाव घेते तिळसंक्रांतीच्या दिवशी.

Marathi Ukhane

घरावर परड परड्यात गहू, तुमच्या आग्रहासाठी,
*** रावांचे नाव, किती वेळा घेऊ.

नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी
***च्या जीवनात***ही गृहिणी.

अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो
***नी माझी जोडी.

सासरी आहे माझ्या, सुंदर हिरवा मळा,
*** रावांमुळेच लागला मला, त्यांचा लळा.

शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी,
***चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
***चं नाव घेते ***च्या बारशाच्या दिवशी.

दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी,
*** राव आले आयुष्यात, म्हणून आहे मी आनंदी.

आई वडिलांपेक्षा, नाही मोठी कोणाची माया,
*** रावांच्या सानिध्यात येऊन, भेटली मला छाया.

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
*** चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून. 

संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष,
***रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष.

रात्रीच्या आकाशात, चमचमते तारे,
*** रावांचे नाव घेते, लक्ष द्या सारे.

मराठी उखाने

वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,
***चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.

आषाढी कार्तिकी, पंढरपूरची वारी,
***च नाव घेतो, राम कृष्ण हरी.

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
*** रावांचं नाव घेते सोडा माझी वाट. 

चांदीच्या नक्षीदार ताटाला, सोन्याचा गिलावा,
*** रावांसारखा गुणी पती, जन्मोजन्मी मिळावा.

रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,
***च्या साथीने आदर्श संसार करीन. 

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
***च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
*** चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

इंग्रजीत म्हणतात मून,
*** चंं नाव घेते *** ची सून. 

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.
*** रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट. 

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
***चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला Marathi Ukhane | मराठी उखाने हि पोस्ट आवडली असेल. तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना हे छान मराठी उखाणे शेअर करू शकता.

धन्यवाद !

हे देखील वाचा Best Marathi Ukhane for Male 2023 |पुरुषांसाठी छान मराठी उखाणे

MARATHI UKHANE FOR MALE । नवरदेवासाठी मराठी उखाणे 2023

1 thought on “Marathi Ukhane | Best 100+ मराठी उखाने”

Leave a Comment