Best Marathi Ukhane for Male 2023 |पुरुषांसाठी छान मराठी उखाणे

मित्रांनो, आज आम्ही या लेखामध्ये Marathi Ukhane for Male घेऊन आलोय. लग्न सभारंभाच्या वेळी परंपरेने किंवा आनंदाने नाव घेण्याची प्रथा आपल्याकडे आहे. तो क्षण लक्षात राहावा म्हणून आपण छान छान उखाणे घेत असतो आणि आपला उखाणा सर्वात भारी असावा असं सर्वांना वाटत असतं. केवळ फक्त लग्नासाठी नाही तर दुसऱ्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात कोणी तुम्हाला उखाणा घ्यायला सांगितले तर पटकन उखाणा घेऊन त्यांच्यावर तुमची छाप पडू शकता.  यासाठी, आम्ही घेऊन आलो आहोत Best Marathi Ukhane for Male या मधील तुमच्या आवडीचे उखाणे तरी नक्की पाठ करून जाऊ शकता !!

पुरुषांसाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane for Male

देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
****मा‍झ्या जीवनाची सारथी

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल
****चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल

Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले…
सौ.****आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले

बशीत बशी कप बशी
सौ.****ला सोडून बाकी सगळ्या म्हशी

सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर…
सौ.****आहे, माझ्या Life चा Server

उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग …
****माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग

माझं नाव घेताना****करते Blush…
Life मधले Tensions सारे, होणार आता Flush

चंद्राला पाहून भरती येते सागराला
***ची साथ मिळाली माझ्या जीवनाला

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना पहिला स्थान,
सौ.*** ने दिला मला पतिदेवाचा मान.

जुईच्या वेलीला आलाय बहार,
***ला घालतो २६ एप्रिल ला हार.

जाईचा वेल पसरला दाट
***बरोबर बांधली जिवनाची गाठ

खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन
आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन

ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली
तू ****माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली

चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली
पण **** कडेच होती मा‍झ्या हृदयाची किल्ली

अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम
****चं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम

दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते…
****च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते

नवरदेवाचे उखाणे | Marathi Ukhane for Groom

Marathi Ukhane for Male 1

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून…
****शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

दुर्वांची जुडी वाहतो गजाननाला
सौ. *****सारखी पत्नी मिळाली…
आनंद झाला मला

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ****ने दिला मला पतिराजांचा मान

परातीत परात चांदीची परात
****ची लेक आणली मी **** च्या घरात

जन्म दिला मातेने  पालन केले पित्याने
****च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने

तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधणारे होते कुशल
****चे नाव घेतो तुमच्या करिता स्पेशल

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट
****बरोबर बांधली साताजन्माची जीवनगाठ

उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात
नवनांचा हार****च्या गळ्यात

सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप
****मला मिळाली आहे खूपच अनुरूप

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
****चे नाव घेतो सर्वजण ऐका

निर्सगवार करु पाहत आहे आजचा मानव मात
अर्धागिनी म्हणुन***** ने दिला माझ्या हातात हात

गुलाबाच्या झाडाला आली सुगंधी नाजुक फुले,
*** नी दिली मला दोन गोंडस मुले.

आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कूजन,
सौ.*** सोबत करतो मी लक्षमीपूजन.

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
***ना आवडते मोगऱ्याचे फुल.

बुर्ज खलिफा बांधायला कारागीर होते कुशल
***चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

नवीन उखाणे | Modern Marathi Ukhane for Male

Marathi Ukhane for Male 2

दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ *** च्या संग !!!!!

समर्थांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा
***चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ,
सौ.*** ने दिला मला प्रेमाची साथ.

दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!

अग्नीच्या साक्षीने घेतले मी सात फेरे,
***चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

मंदिराला खरी शोभा कळसा ने येते
***मुळे माझे गृहसौख्य खुलते.

चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला,
सौ.*** चे नाव घेता पहिला आरंभ केला.

drone

Drone-with-4K-Camera-WiFi-FPV-1080P-HD-Dual-Foldable-RC-Quadcopter-Altitude-Hold-Headless-Mode-Hight-Hold-Color-quadcopter (MULTI)

आम्हला आशा आहे कि तुम्हाला हे Marathi ukhane for male funny , Marathi ukhane for male romanticस्मार्ट मराठी उखाणे , Smart marathi ukhane Male, आवडले असतील. आणि हे ukhane in marathi for male तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा सुंदर सुंदर उखाणे निवडण्यास मदत होईल.

हे देखील वाचा मराठी उखाणे नवरीसाठी । MARATHI UKHANE FOR FEMALE 2023

HEART TOUCHING BIRTHDAY WISHES IN MARATHI FOR WIFE | BIRTHDAY WISHES FOR WIFE IN MARATHI

1 thought on “Best Marathi Ukhane for Male 2023 |पुरुषांसाठी छान मराठी उखाणे”

Leave a Comment