क्रिकेट ची माहिती मराठी | Cricket Mahiti Marathi

मित्रांनो, आज आपण Cricket Mahiti Marathi बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. आपल्या भारतामध्ये सगळयात लोकप्रिय खेळ म्हणजे “Cricket”. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध, क्रिकेट हा सगळ्यांचा आवडता खेळ.

आजच्या या लेखात आपण Cricket Information in Marathi क्रिकेट बद्दल ची संपूर्ण माहिती घेणार आहोत जसे की क्रिकेटचा इतिहास क्रिकेट, कसे खेळले जाते, क्रिकेटचे नियम, अशा खूप सार्‍या क्रिकेटच्या विषयांवर माहिती देणार आहोत. ही माहिती विद्यार्थी तसेच प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी खूप फायदेशीर असेल.

क्रिकेट मराठी माहिती । Cricket Mahiti Marathi Madhe

क्रिकेट हा मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे, ज्यामध्ये दोन संघ असतात, प्रत्येकी संघामध्ये 11 खेळाडू असतात, हा खेळ चेंडू(Ball), चेंडू फळी(Bat) ने खेळला जातो. तर चला क्रिकेट ची माहिती घेऊया मराठीमध्ये, सर्वप्रथम आपण क्रिकेटच्या इतिहासापासून सुरुवात करूया.

क्रिकेटचा इतिहास । History of Cricket in Marathi

 • क्रिकेटची सुरुवात 1301 मध्ये झाली असे सांगण्यात येते पण त्याचे काही पुरावे नाही आहेत पुरावे असले तरी ते बनावट असल्याचे सांगण्यात येते याच्या उलट इंग्लंडमधील 16 व्य शतकातील ट्युडर काळापर्यंतचे क्रिकेट बद्दलचे पुरावे मिळतात.
 • सगळ्यात आधी क्रिकेट खेळले गेल्याचे पुरावे किंवा संदर्भ मिळाले होते, ते म्हणजे साल 1598 मधील न्यायालयीन कारवाई तील पुराव्यामध्ये, यामध्ये असं होतं की गिल फोर्ड नावाचा माणूस होता, त्याची एक सार्वजनिक जमीन होती त्या जमिनीवर 1550 च्या सुमारास क्रिकेट खेळ खेळल्या गेल्याची नोंद आहे.
 • प्रथमतः हा खेळ छोटी मुले खेळायची. साल १६११ मधील काही संदर्भ भेटले होते, ते असे दाखवतात की या सालापासून प्रौढांनी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली होती, त्यावेळी इंटर पॅरिस किंवा विलेज क्रिकेट सामना खेळवला गेला होता, अशी नोंद आहे.
 • सतराव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर अमेरिकेत एक इंग्लिश वसाहत होती, त्या इंग्लिश वसाहतीद्वारे त्या भागामध्ये क्रिकेटची ओळख झाली आणि त्यानंतर 18 व्या शतकात हा खेळ जगातील इतर भागात पोहोचले.
 • साल 1660 मध्ये जेव्हा इंग्लंडचा जिर्णोद्धार झाला, तेव्हापासून क्रिकेटला एक व्यावसायिक खेळ म्हणून ओळखले जाऊ लागले.
 • साल 1697 मध्ये एक क्रिकेट सामना खेळवला गेला होता, त्याचं नाव होतं “ग्रेट क्रिकेट मॅच” यामध्ये पहिल्यांदा प्रत्येकी 11 खेळाडूंच्या संघा दरम्यान खेळ खेळायला गेला होता.
 • साल 1707 पासून क्रिकेट लंडनमध्ये खूपच लोकप्रिय खेळ बनला होता आणि त्याच्या पुढच्या काही काळामध्ये हा खेळ लोक मोठ्या प्रमाणावर फिन्सबरीच्या आर्टिलरी मैदानावर नावाचा मैदान होतं तिथे खेळण्यासाठी जात असतात.
 • साल 1760 च्या अगोदर गोलंदाज चेंडू घरंगळत टाकत असत, पण साल 1760 नंतर गोलंदाजीच्या शैलीत खूप मोठा बदल केला गेला, ते म्हणजे ते आता चेंडूचा टप्पा टाकू लागले.
 • तसं गोलंदाजी मध्ये बदल करण्यात आलं, तसेच उसळणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी जुन्या हॉकी स्टिक सारख्या बॅट च्या आकाराच्या बॅटच्या बदले नवीन सरल बॅटची गरज लागली होती.
 • अठराव्या शतकाच्या नंतर क्रिकेट हा खेळपट्टीवर खेळण्यास सुरुवात करण्यात आली, ज्यामध्ये तीन यष्टी(Stumps) सुद्धा असायच्या आणि त्याच काळात पायचीत बाद(LBW) हा नवीन नियम लागू करण्यात.
 • 19 व्या शतकात गोलंदाजी मध्ये अजून खूप बदल करण्यात आले, जसे की अंडर आर्म फलंदाजीची जागा आता राऊंड आर्म आणि त्यानंतर ओव्हरआर्म गोलंदाजीने घेतली होती.
 • साल 1839 मध्ये ससेक्सची स्थापना झाली, त्यानंतर 1890 मध्ये काउंटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू करण्यात आली.
 • 19 व्या शतकाच्या मध्यावर क्रिकेट India, North America, Carribian, South Africa, Australia आणि New Zealand मध्ये खूप लोकप्रिय होत गेला.
 • सन 1963 पासून क्रिकेट मध्ये खूप बदल करण्यात आले, जसे की मर्यादित षटकांचे सामने सुरू करण्यात आले, त्यामुळे सामन्याचे निकाल लवकरात लवकर लागायला लागले म्हणून अशा सामन्यांमध्ये खूप वाढ झाली.
 • साल १९७५ ला पहिला मर्यादित षटकाच्या सामन्यांचा क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन केले गेले.

क्रिकेट खेळाचे मैदान | Cricket Ground

क्रिकेट खेळ हा हिरवळ गवताळ मैदानावर खेळला जातो. क्रिकेटच्या नियमांमध्ये क्रिकेट ग्राउंड च्या मापा बद्दल काही निर्देश दिलेले नाही आहेत. क्रिकेटचा मैदान अंडाकृती किंवा गोलाकार असू शकतो. तरीही सांगायचं असल्यास मैदानाचा व्यास 400 फूट किंवा 500 फूट लांबीचा असू शकतो. मैदानाच्या मधोमध खेळपट्टी बनवण्यात येते, आणि मैदानाच्या बाहेर खेलपट्टीच्या लाईन मध्ये दोन्ही बाजूला दोन साइड स्क्रीन लावण्यात येतात.

Cricket Mahiti Marathi (4)

मैदानाच्या गोलाकार सीमेच्या सर्व बाजूंनी बाउंड्री आखण्यात येते, आणि मैदानाच्या मधोमध अजून एक गोलाकार मार्किंग 30 Yard पर्यंत केली जाते, जी पावर प्ले फिल्डिंग साठी वापरण्यात येते.

जगातला सर्वात मोठा स्टेडियम आपल्या भारतात अहमदाबाद मध्ये आहे, ज्याचं नाव आहे “नरेंद्र मोदी स्टेडियम”.

क्रिकेट पीच | Cricket Pitch

क्रिकेट मैदानाच्या मधोमध एक आयात आकाराची पट्टी बनवण्यात येते, तिला खेळपट्टी किंवा पीच असे बोलण्यात येते. खेलपट्टी खेळपट्टी की विशेष माती व दगड वापरून बनवण्यात येते. खेळपट्टी ची साईज साधारण 22 यार्ड लांबीला आणि 10 फूट रुंदीला असते. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला 3-3 स्टंप लावले जातात.

क्रिकेट पीच बनवण्याचा काम एक विशेष माणसाला दिला जातो, ज्याला पीच क्युरेटर असे म्हणतात.

Einstein Box Ultimate Earth & Crystal Science Kit | Science Kits for Kids Age 6-14 | STEM Projects | Learning & Education Toys for 6-8-10-12-14 Year Old Boys & Girls | Gift Ideas for Boys & Girls |

फलंदाजी | Batting

मैदानावर एका वेळी दोन फलंदाज उतरू शकतात. त्याच्यातला एक विकेट सुरक्षित करण्यासाठी व धावा काढण्यासाठी स्ट्रायकर एंडला उभा असतो आणि दुसरा फलंदाज जेथून गोलंदाजी केली जाते त्या साईडला म्हणजेच नॉन स्ट्रायकर एन्ड ला उभा असतो. जे फलंदाज चांगली फलंदाजी करतात त्यांना प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी उतरवण्यात येतो.

फलंदाजी करण्याची क्रमावरी ही कोच / प्रशिक्षकाद्वारे किंवा कर्णधारा द्वारे ठरवली जाते. जी क्रमावरी ठरवली जाते त्या क्रमावरी नुसार फलंदाज मैदानात बॅटिंगसाठी उतरतात. फलंदाजांचा मुख्य काम असतं आपल्या बॅटने उत्तम प्रकारे चेंडूला टोळवणे. यासाठी तो आपला खेल Defensive किंवा Aggressive करू शकतो.

फलंदाज आपल्या मनगटाच्या जोरावर अशा ठिकाणी चेंडूला टोळवतो जिथे क्षेत्ररक्षक नसतो आणि धावा काढतो. क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठी वेगवेगळे फटके आहेत जसे कट, ड्राईव्ह, पुल, हूक, कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, फ्लिक, इत्यादी.

Cricket Mahiti Marathi (3)

प्रत्येक फलंदाजाचे हॅन्ड आय कोअर्डीनेशन चांगले असले पाहिजे, ज्यामुळे ते चांगले फटके मारू शकतात.

गोलंदाजी | Bowling

गोलंदाजी म्हणजे गोलंदाज धाव घेऊन किंवा रन अप घेऊन येतो आणि चेंडू सरल फलंदाजाच्या दिशेने टाकतो. गोलंदाजाचा मुख्य काम असतं विकेट्स काढणे म्हणजे फलंदाजाला आउट करणे. गोलंदाजी करताना कमी धावा देणे, हे पण एक गोलंदाजाचा काम आहे. गोलंदाज ओवर्स मध्ये बॉलिंग टाकतो. एका ओव्हर मध्ये सहा चेंडू असतात.

Cricket Mahiti Marathi (2)

गोलंदाजाचे काही प्रकार आहेत, जसे की वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाज, मिडीयम पेसर गोलंदाज. वेगवान गोलंदाज गोलंदाजी करताना मोठा मोठा रन अप घेतात, त्याच उलट फिरकी गोलंदाज आणि मिडीयम पेसर कमी रन अप गोलंदाजी करतात.

वेगवान गोलंदाज आणि मिडीयम पेसर, इन स्विंग आणि आऊट स्विंग अशा प्रकारची गोलंदाजी करून फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करतात किंवा कमी रन्स देण्याचा प्रयत्न करतात.

फिरकी गोलंदाज चेंडू वळवून फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न करतात. फिरकी गोलंदाजी मध्ये ऑफ स्पिन, लेग ब्रेक, गुगली, टॉप स्पिन करून फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करतात किंवा कमी रन्स देण्याचा प्रयत्न करतात.

cricket shoes

DSC Jaffa 22 Cricket Shoes for Mens | Best Cricket Shoes for Men

Cricket Mahiti Marathi (1)

वर दिलेल्या छायाचित्रात तीन प्रकारचे चेंडू दिसत आहेत, त्यातील लाल चेंडू हा टेस्ट मॅच साठी वापरला जातो, सफेद चेंडू हा एक दिवसीय स्पर्धेसाठी वापरला जातो, आणि गुलाबी चेंडू हा प्रकाश झोतातील टेस्ट मॅच साठी वापरला जातो.

क्षेत्ररक्षण | Fielding

टॉस जिंकून जेव्हा कर्णधार क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतो तेव्हा टीम मधील 11 खेळाडू मैदानावर फिल्डिंग साठी उतरतात. त्या 11 पैकी एक खेळाडू यष्टी रक्षक म्हणजेच विकेट किपर असतो, जो स्टंप च्या मागे कीपिंग करतो आणि बाकीचे खेळाडू क्षेत्ररक्षण करतात आणि एक खेळाडू बॉलिंग करतो.

Cricket Mahiti Marathi (5)

टीमचा कर्णधार जेव्हा त्याच्या प्लॅनिंग नुसार गोलंदाज ठरवतो, मग तो गोलंदाज आपल्या बॉलिंग प्लान नुसार क्षेत्ररक्षण लावतो. क्षेत्ररक्षक बॉल अडवून फलंदाजाला धावा काढून देत नाहीत आणि क्षेत्ररक्षक कॅच घेऊन किंवा रन आउट करून फलंदाजाला बाद करू शकतात.

Cricket Mahiti Marathi (5)

विकेटकीपर हा स्ट्राइक एंड ला असलेल्या फलंदाजाच्या मागे उभा असतो. विकेटकीपर हा एकमेव क्षेत्ररक्षक आहे, ज्याला ग्लोज आणि पॅड घालण्याचा अधिकार आहे. विकेटकीपर कॅच घेऊन किंवा स्टंपिंग करून फलंदाजालाबाद करू शकतो.

धावा | Runs

जेव्हा स्ट्रायकर एन्ड ला असलेला फलंदाज आपल्या बॅटने चेंडूला अशाप्रकारे टोलवतो की, तो दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून पुढे जातो आणि क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवून परत फेकण्याआधी, ते दोन फलंदाज एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजेच क्रिजमध्ये पोहोचतात तेव्हा एक धाव पूर्ण झाली अशीच समजली जाते. धावांचे काही वर्गीकरण केलेले आहे, ते खाली दिलेल्या प्रमाणे,

 • 1s, 2s, 3s : जेव्हा फलंदाज चेंडूला आपल्या ठेवावतो आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक तो चेंडू परत विकेटकीपर या बॉलर कडे फेकत नाही तोपर्यंत फलंदाज भावाकडे धावा काढत असतो, त्या धावा एक, दोन, तीन किंवा चार ही असू शकतात.
 • 4s, Boundary, चौकार : जेव्हा फलंदाज चेंडूला टोळवतो आणि तो चेंडू टप्पे पडून सीमेरेषा च्या बाहेर जातो तेव्हा त्याला चौकार असे म्हटले जाते.
 • 6s, Sixer, षटकार : जेव्हा फलंदाज चेंडूला टोळवतो आणि तो चेंडू सरळ सीमारेषाच्या बाहेर जातो तेव्हा त्याला षटकार असे म्हटले जाते.
 • 5s, 5 धावा : कधी कधी विकेटकीपर त्याचा हेल्मेट त्याच्यामागे पाठीमागे ठेवतो, आणि जर तेव्हा बॅटला लागून तो चेंडू ते हेल्मेट ला लागला तर पाच धावा दिल्या जातात, आणि त्या पाच धावा फलंदाजाच्या खातात खात्यात जमा केले जातात, जर बॅट ला न लागता बॉल डायरेक्टली हेल्मेटला लागलं, तरी पाच धावा दिल्या जातात, पण त्या अवांतर धावांमध्ये जमा केल्या जातात.

अवांतर धावा | Extra Runs

ज्या धावा गोलंदाजाच्या किंवा क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे विरुद्ध संघाला मिळतात त्यांना अवांतर धावा असे म्हणतात. अवांतर धावांचे वर्गीकरण खालील दिल्याप्रमाणे आहे,

 • नो बॉल, No Ball : जेव्हा गोलंदाजी करताना गोलंदाजाचा पाय पॉपिंग क्रीजच्या बाहेर पडतो त्या चेंडूला नो बॉल म्हणून म्हटले जाते. गोलंदाजाने जर चेंडू फलंदाजाच्या कंबरेच्या वर टाकले तरीही त्या चेंडूला नोबॉल म्हटले जाते. या चेंडू नंतर संघाच्या धावसंख्येमध्ये अतिरिक्त एक धाव जोडण्यात येते. नो बॉल टाकल्यानंतर फलंदाजाला फ्री हिट दिला जातो, ज्यामध्ये फलंदाजाला धावचित सोडून दुसऱ्या कुठल्याही प्रकारे बाद केला जाऊ शकत नाही.
 • वाईड बॉल, Wide Ball : जेव्हा गोलंदाज फलंदाजाच्या कक्षे बाहेर चेंडू टाकतो तेव्हा त्याला वाईट असे म्हटले जाते. या चेंडू नंतर संघाच्या धावसंख्येमध्ये अतिरिक्त एक धाव जोडण्यात येते आणि त्या गोलंदाजाला पुन्हा तो चेंडू टाकावा लागतो.
 • बाय, Bye : जेव्हा गोलंदाज चेंडू फेकतो पण फलंदाजाला तो खेळता येत नाही आणि विकेट किपर च्या हातून पण निसटून जातो, तेव्हा ज्या धावा पळून काढल्या जातात, त्या धावांना बाय असे म्हटले जाते.
 • लेग बाय, Leg Bye : जेव्हा गोलंदाज चेंडू फेकतो आणि तो चेंडू फलंदाजाच्या अंगाला लागून पुढे जातो आणि फलंदाज तेव्हा पळून भावा काढतो, त्यांना लेग बाय रन्स असे म्हणतात.

पंच | Umpire

मैदानावरील घडामोडी बघून क्रिकेटच्या नियमानुसार जो निर्णय घेत असतो त्याला पंच असे म्हणतात. पंच तीन प्रकारचे आहेत,

 • पहिला पंच हा पंच नॉन स्ट्रायकर एन्ड ला उभा असतो हा पंच सर्व महत्वपूर्ण निर्णय घेत असतो.
 • दुसरा पंच हा पंच स्ट्रायकर एन्ड फलंदाजाच्या दहा ते पंधरा मीटर लांब उभा असतो हा पंच मुख्य पंचाला निर्णय घेण्यासाठी मदत करत असतो आणि तो स्वतःही काही निर्णय घेऊ शकतो.
 • तिसरा पंच हा पंच मैदानाच्या बाहेर टीव्ही स्क्रीन समोर बसून निर्णय घेत असतो, जेव्हा मैदानावरील दोन्ही पंचांना निर्णय घेण्यास कठीण वाटतात तेव्हा तिसऱ्या पंचायत ची मदत घेतली जाते.

हे सर्व पंच ICC आयसीसी तरफे दिलेले सर्व नियमांचे पालन करतात.

बाद होण्याचे प्रकार | Types of Dismissals

आता आपण फलंदाज ज्या ज्या प्रकाराने बाद होऊ शकतो असे बाध होण्याचे प्रकार जाणून घेऊया

 • त्रिफळाचीत : जेव्हा गोलंदाज चेंडू फेकतो आणि तो सरल यष्टिंवर जाऊन आढळतो तेव्हा त्याला त्रिफळाचीत बाद असे म्हणतात.
 • झेल : जेव्हा फलंदाज चेंडू आपल्या बॅटने मारतो आणि तो चेंडू जमिनीवर न पडता क्षेत्ररक्षक पकडतो तेव्हा त्या फलंदाजाला झेलबाद असे म्हणतात.
 • पायचीत : जेव्हा गोलंदाज चेंडू टाकतो आणि तो चेंडू फलंदाजाच्या बॅट किंवा बॅटला पकडलेला हाताला न लागता पायाला किंवा शरीराच्या कुठल्याही भागाला लागला आणि जर तो चेंडू स्टम्स च्या लाईन मध्ये असेल तर पंच त्या फलंदाजाला पायचीत बाद म्हणून देऊ शकतात.
 • धावचीत : जेव्हा फलंदाज चेंडूला कळवतो मारतो आणि धाव घेण्याचा प्रयत्न करतो, पण जर फलंदाज क्रिज मध्ये पोहोचण्या अगोदर क्षेत्ररक्षकाने तो चेंडू स्टम्प्सला लावला, तर तो फलंदाज धावचित म्हणून बाद दिला जातो.
 • यष्टिचित : जेव्हा फलंदाज फेकलेला चेंडू खेळण्यास अयशस्वी होतो, आणि तो चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात जातो, त्यावेळी जर फलंदाज क्रिजच्या बाहेर असेल आणि जर विकेटकीपर ने तो चेंडू स्टॅम्प्सला लावला, तर तो फलंदाज यष्टीचीत म्हणून बाद दिला जातो.
 • हिट विकेट : फलंदाजी करताना जर फलंदाजाचा कुठलाही अंग स्टंप्सला लागला तर त्या फलंदाजाला हिट विकेट म्हणून बाद दिला जातो.
 • चेंडू हाताळणे : जर चेंडू फलंदाजाच्या बॅटला किंवा अंगाला लागून स्टम्प्स च्या दिशेने जात असेल आणि जर तो चेंडू फलंदाजाने हाताने अडवण्याचा प्रयत्न केला तर त्या फलंदाजाला बाद म्हणून घोषित करण्यात येतो.
 • चेंडूला दोन वेळा टोळवणे : जर चेंडूला फलंदाजाने दोन वेळा टोलवण्याचे प्रयत्न केला तर त्या फलंदाजालाबाद म्हणून घोषित करण्यात येतो.
 • टाईमड आऊट : फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येण्यासाठी तीन मिनिट दिले जातात, जर त्या तीन मिनिटात नवीन फलंदाज क्रीज वर हजर नाही झाला, तर त्या फलंदाजाला टाईमड आऊट म्हणून घोषित करण्यात येतो.

क्रिकेट स्पर्धेचे प्रकार | Types of Competition in Cricket

क्रिकेटच्या खेळाच्या स्वरूपानुसार व वेळेच्या मर्यादेनुसार, क्रिकेट स्पर्धांना काही प्रकारांमध्ये विभागले आहे, ते खाली दिल्याप्रमाणे आहेत

 • कसोटी स्पर्धा : या क्रिकेट स्पर्धेच्या प्रकारामध्ये सामना पाच दिवसा मध्ये (मॅच) खेळला जातो, प्रत्येकी संघाला दोन इनिंग दिल्या जातात. या प्रकाराला म्हणजेच कसोटी स्पर्धेला एक उच्च मान दिला जातो.
 • एक दिवसीय स्पर्धा : या क्रिकेट स्पर्धेच्या प्रकारामध्ये एका दिवसात पूर्ण खेळ(मॅच) खेळला जातो, ही स्पर्धा पन्नास ओव्हर्स ची असते आणि प्रत्येक संघाला एक एक इनिंग दिली जाते.
 • T20 स्पर्धा : ही क्रिकेट स्पर्धा खूपच कमी वेळ खेळाची स्पर्धा आहे साधारण तीन ते चार तासात मॅच संपवली जाते, ही स्पर्धा 20 ओवर्सची असते आणि प्रत्येक संघाला एक एक इनिंग दिले जाते.

Conclusion

आम्ही या लेखात क्रिकेट बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा लेख क्रिकेट ची माहिती मराठी | Cricket Mahiti Marathi | Cricket essay in marathi आवडला असेल.

धन्यवाद !

FAQs

क्रिकेटच्या खेळाचा शोध कधी लावला गेला?

क्रिकेटची सुरुवात 1301 मध्ये झाली असे सांगण्यात येते पण त्याचे काही पुरावे नाही आहेत पुरावे असले तरी ते बनावट असल्याचे सांगण्यात येते याच्या उलट इंग्लंडमधील 16 व्य शतकातील ट्युडर काळापर्यंतचे क्रिकेट बद्दलचे पुरावे मिळतात.

पहिला कसोटी सामना कधी खेळला गेला?

पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्नमध्ये 1877 मध्ये खेळला गेला.

क्रिकेट मध्ये प्रत्यक्ष किती खेळाडू खेळतात?

क्रिकेट मध्ये प्रत्यक्ष अकरा खेळाडू खेळतात.

क्रिकेट ला मराठी मध्ये काय म्हणतात?

लंब दंड गोल पिंड धर पकड

हे देखील वाचा

200+ Modern Baby Boys Name in Marathi with Meaning | २००+ छोट्या मुलांची नावे

3 thoughts on “क्रिकेट ची माहिती मराठी | Cricket Mahiti Marathi”

Leave a Comment