Gudi Padwa Wishes in Marathi | गुडीपाडव्याच्या शुभेच्छा

मित्रांनो आज आम्ही Gudi Padwa Wishes in Marathi घेऊन आलो आहोत. गुढी पाडवा, ज्याला संवत्सर पाडवा असेही म्हणतात, हा एक पारंपारिक हिंदू सण आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्र मध्ये लोकांद्वारे साजरा केला जातो. हे मराठी नवीन वर्ष म्हणून हि साजरा केला जातो आणि हिंदू कॅलेंडरमध्ये चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येते, जे सामान्यतः इंग्लिश कॅलेंडरमध्ये मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला यतो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा शुभारंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो.

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस समजला जातो. रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र या दिवशी अयोध्येमध्ये दाखल झाले. त्यांचे स्वागत गुढ्या, तोरणे उभे करुन केले गेले. गुढी उभी करणे हे विजयाचे, आनंदाचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. गुढी पाडवा भारतातील इतर काही भागात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो, जसे की कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील उगादी आणि सिंधी समाजातील चेटी चंद.

चला तर या मंगलमय दिवशी, शुभेच्छा देणे हि मंगलमय असते, त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी Gudi Padwa Wishes in Marathi घेऊन आलो आहोत.

Happy Gudi Padwa Wishes in Marathi

Gudi Padwa Wishes in Marathi

तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना,

गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या

हार्दिक शुभेच्छा…

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

हा गुढीपाडवा तुमच्या जीवनात आनंद,
समृद्धी आणि यश घेऊन येवो.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दुःख सारे विसरुन जाऊ,

सुख देवाच्या चरनी वाहू,

स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,

नव्या नजरेने नव्याने पाहू…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष नवीन संधी आणि
नवीन सुरुवातींनी भरलेले जावो.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

शांत निवांत शिशिर सरला,

सळसळता हिरवा वसंत आला,

कोकिळेच्या सुरवातीसोबत,

चैत्र “पाडवा” दारी आला…

नूतन वर्षाभिनंदन!

Gudi Padwa Wishes in Marathi

Gudi Padwa Wishes in Marathi 2

येवो समृद्धी अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

नववर्षाच्या या शुभदिनी…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

या सणाची गोडी तुमचे
जीवन आनंदाने भरून जावो.
तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा…

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…

दिवस सोनेरी

नव्या वर्षाची सुरुवात…

गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

या वर्षी तुम्ही तुमची सर्व
उद्दिष्टे आणि स्वप्ने पूर्ण करोत.
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa Wishes in Marathi

Gudi Padwa Wishes in Marathi 3

हा गुढीपाडवा तुम्हाला
भरभराट आणि समृद्धी घेऊन येवो.
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

जल्लोष नववर्षाचा…

मराठी अस्मितेचा…

हिंदू संस्कृतीचा…

सण उत्साहाचा…

मराठी मनाचा…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…

नवे नवे वर्ष आले

घेऊन गुळासाखरेची गोडी…

गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…

काळोख्या रात्रीला सोनेरी किरणांचा स्पर्श
आपल्या जीवना नांदो कायम सुख, समाधान अन हर्ष
गुढी पाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा
साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा !
मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने
साजरा करा पाडव्याचा सण !
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

घरोघरी शोभेल जशी उंच गुढी
तशीच तुमच्या आयुष्यात येवो
आनंदाची गोडी
गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला नवीन आशा,
नवीन आकांक्षा आणि नवीन
आनंदांनी भरलेले वर्षाच्या शुभेच्छा.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

गुढीपाडवा सण तुम्हाला
शुभेच्छा आणि भाग्य घेऊन येवो.
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

गुढीचे तेज तुमच्या जीवनात
सकारात्मकता आणि प्रकाश आणू दे.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!

नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश
आणि परिपूर्णता घेऊन येवो.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आम्हाला आशा आहे कि Gudi Padwa Wishes in Marathi तुम्हाला आवडले असतील. आम्ही या लेखात Gudi Padwa Wishes in Marathi text, Gudi Padwa Wishes in Marathi images, गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सुद्धा दिले आहेत. तुम्ही या शुभेच्छा आपल्या मित्र,मैत्रिणीनी, प्रियजनांबरोबर शेअर करू शकता .

धन्यवाद !

हे देखील वाचा Marathi Ukhane | Best 100+ मराठी उखाने

50 Best Vakprachar in Marathi | मराठी वाक्प्रचार-अर्थ व वाक्यात उपयोग 2023

1 thought on “Gudi Padwa Wishes in Marathi | गुडीपाडव्याच्या शुभेच्छा”

Leave a Comment