50+ Aai Birthday Wishes in Marathi । Birthday Wishes for Mother in Marathi 2023

मित्रांनो, आज आपण Birthday Wishes for Mother in Marathi बद्दल बोलणार आहोत. आईचे प्रेम बिनशर्त, अटळ आणि Timeless असते. ती आपली पहिली शिक्षिका आहे, जी आपल्याला संयम आणि शहाणपणाने जीवनाचे धडे शिकवते. तिच्या मिठीत, आपल्याला आराम मिळतो, तिच्या हसण्यात, आपल्याला उबदारपणा मिळतो. आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आई ही आपल्या जीवनातील शक्ती आणि प्रेमाचा आधारस्तंभ आहे. सर्व लोक जेव्हा तुमच्या विरोधात असतील, तेव्हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई. म्हणून आपल्या आईचा वाढदिवस सुद्धा नक्कीच काहीतरी खास असायलाच हवा ना! म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी साठी घेऊन आलो आहोत आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Happy Birthday Wishes for Mother in Marathi).

Aai Birthday Wishes in Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes for Mother in Marathi

आई, तुझ्या चेहर्‍यावरचे हास्य हे
असेच गोड राहु दे,
तुझ्या मायेच्या वर्षावात
आम्हाला आयुष्यभर न्हाऊ दे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !!

प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगी माऊलीसारखी कोण आहे,
जिचे जन्मांतरीचे ऋण आहे,
असे ऋण हे ज्यास व्याज नाही,
त्या ऋणाविना जीवनास साज नाही,
जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत,
जिच्या यातनांना जगी तोड नाही,
तिचे नाव जगात आई,
आई एवढे कशालाच मोल नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

या मौल्यवान दिवशी,
तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या कोणत्याही अपेक्षांना सीमा न राहू दे,
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे,
आई तुला साठाव्या वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!

मा‍झ्या हृदयात तुझी जागा घेणारा
दुसरा कोणी नाही…
मी खूप भाग्यवान आहे की
मला जगातील सर्वोत्तम
आई मिळाली आहे.
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगातले सर्व सुख एकीकडे
आणि आईच्या कुशीत
झोपण्याचा आनंद एकीकडे
वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई | Aai Birthday Wishes in Marathi | Birthday Wishes for Mother in Marathi

Birthday Wishes for Mother in Marathi 2

माझ्या मनात असणाऱ्या
गोष्टी क्षणात ओळखणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
आईला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!

स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी
मा‍झ्या प्रिय आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू  माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जिने मला बोट धरून
चालायला शिकवले
अश्या मा‍झ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

wifi camera

CP PLUS 3 MP Full HD Smart Wi-fi CCTV Camera | 360° Pan & Tilt | View & Talk | Motion Alert | Night Vision | SD Card (Up to 128 GB) | Alexa & OK Google | 2-Way Talk | IR Distance 10Mtr | CP-E35A

हे सुद्धा वाचा: मराठी उखाणे नवरीसाठी । MARATHI UKHANE FOR FEMALE 2023

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

माझ्या प्रेमळ, समजदार,
सर्वांना सांभाळून घेणाऱ्या
आईला कशाचीच कमी पडू नये
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणार्‍या
मा‍झ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Mom Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes for Mother in Marathi 3

प्रत्येक येणारा क्षण तुझ्यासाठी
फक्त आनंद घेऊनच यावा
यासाठीच मी पूर्ण प्रयत्न करेल.
वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई.

आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही
असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जिथं पोरांचे सर्व गुन्हे माफ
आणि हट्ट पूर्ण केले जातात
ती जागा म्हणजे आई.
आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आई,
आयुष्यभर तुझ्या प्रार्थना नेहमीच
आमच्या आनंदासाठी असतात.
आज माझी प्रार्थना तुझ्यासाठी आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आयुष्यात त्यांना काहीच कमी पडत नाही,
जे आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई तुझ्या चेहर्‍यावरचे हे गोड हसू,
असेच कायम असू दे,
प्रत्येक दिवशी मला तुझे हे गोड रुप दिसू दे,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जेवढं तडकाफडकी ने मला
तू शाळेत पाठवते व त्यानंतर
त्यापेक्षा जास्त आतुरतेने माझी वाट
पाहणाऱ्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा.

आजची तारीख शतदा यावी
ईश्वर चरणी हीच मागणी
सुख शांतीने समृद्ध व्हावा
सुखाचा ठेवा मनोमनी
साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !!

आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
मला आशा आहे की,
तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवस प्रेम
आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल..!

सूर्य डोंगरा आड जरी असला तरी
त्याचा प्रकाश दिसत राहतो.
जगात आपण कुठेही असलो तरी
आपल्या आईचा आशीर्वाद आपल्यावर कायम असतो.
अश्या या प्रिय आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

लहानपणापासून
मला चांगल काय वाईट काय
याची शिकवण देणाऱ्या माझ्या
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवा गंध नवा आनंद,
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी,
तुझा आनंद शतगुणित व्हावा,
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

Godrej Security Solutions Forte Pro 15 Litres Safe Locker for Home & Office with Mechanical Key Lock (Grey)

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes for Aai in Marathi | Birthday Wishes for Mother in Marathi

आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू,
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू,
तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात
नेहमी अशीच सावली प्रमाणेमाझ्या सोबत रहा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.

माझ्या अंधारलेल्या आयुष्यात
यशाचा प्रकाश आणण्यासाठी
रात्रंदिवस वात म्हणून जळत
असणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रिण असणार्‍या
मा‍झ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नवा गंध नवा आनंद,
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी,
तुझा आनंद शतगुणित व्हावा,
आई तुला वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा..!!

बघते प्रतिबिंब तुझ्यात
मिळतो मला दिलासा…
शोधू कुठे तुझ्यात मला,
मग दिसे मज एक आरसा…
आरशात शोधताना तुला,
आई मज तू जवळ भासे…
तुझ्याविना माझे आयुष्य,
म्हणजे पाण्याविना मासे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई…!!!

आयुष्यात त्यांना काहीच कमी पडत नाही,
जे आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नाही.
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्या माऊलीने दिला मला जन्म
जिने गायली माझ्यासाठी अंगाई
आज तुझ्या वाढदिवशी
नमन करतो तुज आई.
हॅपी बर्थडे आई!!

मा‍झ्या विषयी सांगताना,
तुला विसरणे शक्य नाही.
तुझ्या उल्लेखाशिवाय,
माझी ओळख पूर्ण नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!

माझे हात तुझ्या हातात आई,
मी चालतो ठाई ठाई,
अशीच थाप राहु दे राहु दे आई
तुझ्यामुळे मी हे जग जिंकेन,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आमच्या घराची अन्नपूर्णा,
माझी आई जणू परमेश्वराची करुणा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई | Happy Birthday Mummy In Marathi

Birthday Wishes for Mother in Marathi 4

आपली आई कुटुंबातील सर्वांची जागा घेऊ शकते,
पण कुटुंबातील कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही…
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आपल्या जन्मापासून ते आपल्या
शेवटच्या श्वासापर्यंत नि: स्वार्थ प्रेम
करणारी व्यक्ती असते आई!
अशा या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही
म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई…

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी…
‍तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…!!!

जसा सूर्य प्रकाशविना व्यर्थ
तसेच आईच्या प्रेमाशिवाय हे जीवन व्यर्थ.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

मा‍झ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही प्रेम करणारी,
नेहमी आशीर्वाद देणारी,
आणि हे सर्व करणारी,
ती फक्त आपली आईच असते.
हॅप्पी बर्थडे माय सुपर मॉम..!!

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे साक्षात परमेश्वर.
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आई तुला चांगले आरोग्य, सुख
आणि दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

तुझ्या आयुष्यातील किमती क्षणांचा त्याग तू करून
माझे आयुष्य उजळून काढले,
आई तुझे उपकार मी कसे फेडू…
आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!

एक हार करण्यासाठी शेकडो फुलांची गरज असते
दिव्य आरती करण्यासाठी हजारो दिव्यांची गरज असते
महासागर तयार होण्याकरिता लाखो थेंबांची गरज असते
पण आपल्या लेकराच्या जीवनाला स्वर्ग बनवण्यासाठी
त्याची आई पुरेशी असते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई !!

boAt Wave Call Smart Watch with Bluetooth Calling, 1.69” HD Display with 550 NITS & 70% Color Gamut, 150+ Watch Faces, Multi-Sport Modes,HR,SpO2, IP68(Active Black)

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस | Birthday Quotes for Mother in Marathi

अशी व्यक्ती जी नेहमी
मा‍झ्या बाजूने उभी असते
मला भक्कम आधार देते
मला नेहमी चांगला सल्ला देते
अश्या माझ्या आईला
आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

जिने प्रत्येक वेळी माझी खंबीरपणे साथ दिली,
काय चांगले काय वाईट हे ओळखण्याची दृष्टी दिली,
मा‍झ्या स्वप्नांचा जी आधार झाली ती आई….
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई !!

आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात मा‍झ्या एकच इच्छा की
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!!

सर्वांना एकाच मायेच्या बंधनात बांधून ठेवून,
सर्वांची काळजी घेणार्‍या,
मा‍झ्या आईस…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझे प्रेम माझी एकमेव आशा आहे!!
तुझे प्रेम म्हणजे माझा विश्वास आहे !!
आणि तुझे प्रेम माझे जग आहे !!
माझी प्रिय आई,
मी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो !!

आपल्या मनमिळाऊ स्वभावाने
सर्वांना एकत्रित आणून ठेवणार्‍या
मा‍झ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मैत्रिण असणार्‍या
मा‍झ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

आई आधार आहेस तू मा‍झ्या जीवनाचा
दिलास तू आकार या मातीच्या गोळ्याला
आई थोर तुझे उपकार मी फेडू कसे…
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!

तुझ्या असण्यात जिवंत मी
तुझ्या हसण्यात आनंदी मी
देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो
तुझ्या जगण्यात धन्य मी !
आई… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

मा‍झ्या यशाचे सर्वात मोठे
रहस्य माझी आई आहे.
धन्यवाद आई नेहमी
मला पाठिंबा दिल्याबद्दल.
जन्म दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

सर्व कुटुंबाला एका मायेच्या
बंधनात बांधून ठेवणाऱ्या
सर्वांवर प्रेम आणि सर्वांची
काळजी करणाऱ्या
माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

mini cooler

Portable-Ac-Mini-Cooler-Fan-for-Room-Cooling-Rechargeable-Fan-Portable-Ac-for-Home-Portable-Air-Conditioners-Water-Cooler-Mini-Ac-for-Room-Cooling-Mini-Humidifier-Hanging-Closet-Shelves (BLACK)

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई | Birthday Wishes for Mother in Marathi

आई तू माझ्या आयुष्यात आहेस
हेच माझ्यासाठी सर्वकाही आहे
तुला आयुष्यात जे पाहिजे ते
भरभरून मिळत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

आम्हाला आशा कि Birthday Wishes for Mother in marathi ही पोस्ट तुम्हाला आवडली असेलच. या लेखा मध्ये आम्ही Heart touching Birthday Wishes for Mother in MarathiBirthday messages for Mother in Marathi, Birthday wishes for Mom in Marathi, Happy Birthday Aai, Birthday messages for mother in Marathi, Birthday Wishes in Marathi for Aai, चा देखील समावेश केलेला आहे. या शुभेच्छा Wishes बद्दल तुमचे मत कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

धन्यवाद!!

हे देखील वाचा Birthday Wishes in Marathi | Vadhdivas Shubhechha | वाढदिवस शुभेच्छा

Heart touching Birthday Wishes in Marathi for Mother | Happy Birthday wishes for mother in Marathi

Leave a Comment