डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी । Dr APJ Abdul Kalam Information in Marathi

भारत रत्न, मिसाईल मॅन, इंजिनियर, अनुशास्त्रज्ञ भारताचे Dr APJ Abdul Kalam Information in Marathi माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या बद्दल आज आपण जाणुन घेणार आहोत संपुर्ण महिती.

भारताचे अकरावे राष्ट्रपती पद भूषवलेल्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे बालपण कसे गेले? शिक्षण कुठे झाले? त्यांना पीपल्स प्रेसिडेंट का म्हणतात? भारताला अणुशक्ती संपन्न कऱण्यात त्यांची काय भूमिका होती? या सर्वच प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखातून आपण सविस्तर जाणुन घेणार आहोत. चला तर सुरवात करु या मिसाईल मॅन ऑफ इंडिया डॉ ए पी जे अब्दुल कलाम Dr APJ Abdul Kalam Information in Marathi यांच्या जीवनपटाला.

Dr APJ Abdul Kalam Information in Marathi

जन्म व बालपण

तामिळनाडू येथिल प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असेलल्या रामेश्वरम् , पाबन येथे राहणारे व तमिळ मुस्लिम असलेले जैनुलब्दिन मारकायर यांच्या घरात डॉक्टर अबुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम यांचा जन्म झाला तो १५ ऑगस्ट १९३१ हा दिवस होता. चार भाऊ आणि तिन बहिणी आशा भावंडात अब्दुल सर्वात धाकटे होते.

त्यांचे पूर्वज मोठे श्रीमंत जमीनदार होते. मात्र त्यांच्या जन्मापर्यंत ही श्रीमंती लयास गेली होती. त्यांचे वडील जैनुलब्दीन स्थानिक मशिदीचे इमाम होते. शिवाय त्यांच्या मालकीची एक बोट होती. त्या बोटीने ते प्रवाश्यांची धनुष्यकोडी ते रामेश्वर दरम्यान ने आण करीत.

या व्यवसायातून त्यांना जेमतेम उत्पन्न मिळत असे. एकंदरीत कुटुंबाची आर्थिक परिस्थीती हलाखीची होती. त्यांच्या बहिणीचे यजमान रामेश्वरम् येथे वर्तमानपत्र वितरणाचा व्यवसाय करीत. वर्तमान पत्र घेऊन येणारी रेल्वे रामेश्र्वर स्थानकात थांबत नसे. तेव्हा चालू रेल्वेगाडीतून फेकलेले वर्तमान पात्रांचे गठ्ठे गोळा करण्याचे काम लहानपणी अब्दुल कलाम त्यांच्या भावोजी सोबत करीत असत. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांना लहानणापासूनच विवीध मेहनतीची कामे करावी लागली तरी त्यांना शिक्षणाची ओढ होती. ते शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणुन ओळखले जात. त्यांची गणित विषयात विशेष रुची होती. गणिते सोडवण्यात ते दिवसातील बराच वेळ खर्च करीत.

महाविद्यालय शिक्षणं

श्वार्ट्झ हायर सेकंडरी स्कूल, रामनाथपुरम येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठाचे सेंट जोसेफ कॉलेज, तिरुचिरापल्ली येथे प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून १९५४ साली भौतिशास्त्रातील पदवी मिळवली. त्यानंतर पैशा अभावी त्यांना हव्या असलेल्या तंत्र महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आर्थिक अडचणी येऊं लागल्या. यावेळी त्यांच्या बहिणीने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून दिल्याची घटना त्यांच्या अग्निपंख या आत्मचरित्र वजा ग्रंथात लिहिली आहे.

१९५५साली त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतराळयान अभियांत्रिकी शिकण्यासाठी प्रवेश मिळवला. येथे त्यांनीं शिष्यवृत्ती मिळवून आपले शिक्षणं सूरू केले.

आपला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण कारीत नाही म्हणुन कॉलेजच्या डीनने त्यांना तीन दिवसात प्रोजेक्ट पूर्ण न केल्यास शिष्यवृत्ती रद्द करण्याची धमकी दिली. आधीच आर्थिक विवंचनेत असेलल्या कलाम यांना चिंता न पडती तरच नवल. आपल्यासाठी शिष्यवृत्ती मिळणे खुप महत्वाचे आहे हे जाणुन कलाम यांनी रात्रंदिवस मेहनत करून प्रोजेक्ट पूर्ण केला. कलाम यांनी आपला प्रोजेक्ट खुप कमी वेळात पुर्ण केल्यामुळे डीन त्यांच्या कामावर खूष झाले आणि त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीच्या जोरावर त्यांनी आपले अवकाश अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षणं पुर्ण केले. त्यानंतर त्यांना पायलट होण्याची इच्छा होती. परंतू निवड परीक्षेत त्यांचा नववा नंबर आला आणि फायटरच्या अठाच जागा उपलब्ध होत्या. या घटनेने आपण थोडे निराश झालो होतो तरी नियतीवर पुर्ण विश्वास होता असे मत त्यांनीं आपल्या अग्निपंख या आत्मचरित्रात व्यक्त केले आहे.

शास्त्रज्ञ डॉक्टर. ए पी जे अब्दुल कलाम

१९६०साली मद्रास इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मधून पदवी प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम संरक्षण संशोधन आणि विकास सेवा ( DRDS) या संस्थेचे सदस्य झाले. त्यानंतर ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये शास्त्रज्ञ झाले. आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीस त्यांनी एक लहान हावरक्रफ्ट डिझाईन केले होते. पुढे ते INCOSPAR समितीचे सदस्य झाले. त्या ठिकाणी ते डॉक्टर विक्रम साराभाई यांच्यासोबत काम करीत होते.

१९६९साली त्यांची बदली इस्रो मधे झाली तेव्हा ते लघु उपग्रह प्रक्षेपक वाहन – ३ ( SLV – 3) या प्रकल्पाचे संचालक झाले. जुलै १९८० साली या लघु उपग्रह प्रक्षेपक वाहन द्वारे रोहिणी उपग्रह यशविरीत्या पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित कऱण्यात आला. १९६५ मधे स्वतंत्रपणे सुरू केलेल्या विस्तारित रॉकेट प्रकल्पांना त्यांनी १९६९ मधे सरकारची मान्यता मिळविली आणि अधिक अभियंत्यांच्या सहकार्याने प्रकल्प पुढे नेला.

१९६३ ते ६४ दरम्यानचा डॉ कलाम यांनी नासाच्या व्हर्जिनियामधील हॅम्प्टन येथील लँगली संशोधन केंद्र, ग्रीनबेल्ट, मेरीलँडमधील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर आणि वॉलॉप्स फ्लाइट सुविधा या केंद्रांना भेटी दिल्या.

१९७० ते १९९० या दोन दशकांच्या कालावधीत डॉ कलाम यांनी पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) आणि SLV-III प्रकल्प यशस्वीरीत्या विकसित केले.

कलाम यांना राजा रामण्णा यांनी टीबीआरएलचे प्रतिनिधी म्हणून स्माइलिंग बुद्धा या देशातील पहिल्या अणुचाचणीचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले होते.

१९७०च्या दशकात इसरोचे संचालक जी. माधवन यांच्यासोबत डॉ कलाम यांनी प्रोजेक्ट डेव्हिल आणि प्रोजेक्ट व्हॅलिअंट या दोन प्रकल्पांचे संचालन केले.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विरोध असूनही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनी विशेषाधिकार वापरून कलाम यांच्या संचालकपदाखाली एरोस्पेस प्रकल्पांसाठी गुप्त निधी दिला होता. या विशेष एरोस्पेस प्रकल्पांचे खरे स्वरूप लपविण्याची गरज का आहे हे केंद्रीय मंत्रिमंडळाला पटवून देण्यासाठी महत्वाची भूमिका डॉ कलाम यांनी बजावली होती .

१९८० साली त्यांच्या देखरेखी खाली प्रगत क्षेपणास्त्र कार्यक्रम सूरू कऱण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील पुढाकारामुळे सरकारला हे करणे आवश्यक वाटले.

धातुशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक सल्लागार डॉ. व्ही.एस. अरुणाचलम आणि डॉक्टर कलाम यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री आर. वेंकटरामन यांना परदेशातून क्षेपणास्त्रे विकत घेण्याऐवजी आपल्या देशात क्षेपणास्त्रांचा विकास करण्याचां सल्ला दिला व त्या प्रस्तावावर काम केले.

इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम (IGMDP) नावाच्या मिशनसाठी ३.८८ अब्ज रुपये मिळवण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजूरी मिळवण्यात आर वेंकटरामन यांचा मोलाचा वाटा होता. आणि त्यांनी कलाम यांची या मिशनसाठी मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती केली.

कलाम यांनी मिशन अंतर्गत अनेक क्षेपणास्त्रे विकसित करण्यात प्रमुख भूमिका बजावली व मौलिक यश मिळवले,

या मिशन अंतर्गत विकसीत केलेल्या क्षेपणास्त्रांत मध्यवर्ती श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र पृथ्वी यांचा समावेश होतो.

राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुढाकाराने ६ जुलै २००५ रोजी तामिळनाडूतील कोईम्बतूरजवळील एट्टीमडाई येथे संयुक्त इस्रो-अमिर्था व्हिलेज रिसोर्स सेंटर (VRC) प्रकल्पाचां शुभारंभ कारण्यात आला होता.

Dr APJ Abdul Kalam यांचे आरोग्य क्षेत्रातील संशोधन

जुलै १९९२ ते डिसेंबर १९९९ या कालावधीत पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे सचिव म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम यांनी काम केले. यादरम्यान पोखरण-II या अणुचाचण्या या केल्या गेल्या. या प्रकल्पात त्यांनी महत्वाची राजकीय आणि तांत्रिक भूमिका बजावली. कलाम यांनी अणूचाचणी प्रकल्पात राजगोपाल चिदंबरम यांच्यासह मुख्य प्रकल्प समन्वयक म्हणून काम केले. या काळात कलाम देशातील सर्वात प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ बनले.

१९९८साली भारतातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ सोमा राजू यांच्यासमवेत कलाम यांनी “कलाम-राजू स्टेंट” नावाचा कमी किमतीचा कोरोनरी स्टेंट विकसित केला. हृदविकाराच्या रुग्णांना यामुळें मोठा दिलासा मिळाला.

२०१२ साली या जोडीने ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी एक रफ टॅबलेट तयार केला होता. त्याला “कलाम-राजू टॅब्लेट” असे नाव देण्यात आले.

राष्ट्रपती डॉ कलाम President Dr APJ Abdul Kalam Mahiti Marathi

भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची निवड करण्यात आली होती. १० जुन २००२रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने डॉ कलाम यांचे नामनिर्देशन केले होते. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. १८ जुलै रोजी मतमोजणी झाली तेव्हां डॉ कलाम यांच्या प्रतिस्पर्धी लक्ष्मी सैगल यांना १०७,३६६ मते मिळाली होती तर डॉ कलाम हे ९२२, ८८४मते मिळवून स्वतंत्र भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणुन राष्ट्रपती पदी निवडून आले होते .

२५ जुलै रोजी त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. भारतरत्न मिळालेले डॉक्टर अब्दुल कलाम हे तिसरे राष्ट्रपती होते. राष्ट्रपती पदी निवड होण्यापूर्वी त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. तसेच ते स्वतंत्र भारताचे मुस्लीम समाजाचे असलेले तिसरे राष्ट्रपती होते. तसेच भारताचे राष्ट्रपती होणारे ते पाहिले शास्त्रज्ञ होते.

त्यांच्या कार्यकाळात ” जनतेचे राष्ट्रपती ( peoples president) म्हणूनही संबोधले जायचे.

आपल्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात त्यांनी २१ दयेच्या अर्जापैकी २० अर्ज प्रलंबित ठेवले होते. याबद्दल त्यांना टिका देखिल सहन करावी लागली होती. २००५ साली बिहार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या त्यांच्या निर्णयांवर देखील टिका झाली होती.

२००७ व २०१२ साली त्यांना पुन्हा राष्ट्रपती निवडणूक लढण्याची विचारणा झाली होती. मात्र त्यांनी पुन्हा निवडणूक लढण्यास नकार दिला.

माजी राष्ट्रपती Dr APJ Abdul Kalam Information in Marathi

राष्ट्रपती म्हणुन निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शिक्षकाची भूमिका स्वीकारली होती. कलाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदूर येथे ते व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणुन काम पाहू लागले होते.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरचे मानद फेलो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी तिरुवनंतपुरमचे कुलपती, अण्णा विद्यापीठातील एरोस्पेस अभियांत्रिकीचे प्राध्यापक, भारतभरातील इतर अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये सहायक अशा कितीतरी भूमिकांमधून ते वावरले.

हैदराबादच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी , बनारस हिंदू विद्यापीठ आणि अण्णा विद्यापीठात त्यांनी तंत्रज्ञान विषय शिकवले.

२०११ मध्ये त्यांच्या कूडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पावरील भूमिकेवरून नागरिकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला मात्र स्थानीक लोकांची मते जाणुनघेतली नसल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता .

२०१२ साली त्यांनी भ्रष्टाचाराला विरोध दर्शवणारा ‘ व्हॉट कॅन आय गीव्ह टू नेशन मूव्हमेंट ‘ नावाचा एक कार्यक्रम सुरू केला,

मानसन्मान – Dr APJ Abdul Kalam Information in Marathi

१५ ऑक्टोबर हा डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.

‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्च किताब देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला आहे

तसेच त्यांना

१९८१ साली पद्मभूषण , १९९० साली पद्मविभूषण पुरस्कााने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांना मिळालेले इतर पुरस्कार –

१९९७ साली इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार.

१९९८ साली वीर सावरकर पुरस्कार ,२००० साली रामानुजन पुरस्कार, २००७ साली किंग चार्ल्स (दुसरा) पदक , २००७ साली डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी ( वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठ ), २००८ साली डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग (नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर ) , २००९ साली हूवर पदक(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स),

२००९ साली आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कार ( अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ) ,२०१० साली डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग (वॉटरलू विद्यापीठ )

निधन – Dr APJ Abdul Kalam

ए.पी.जे. अब्दुल कलाम २७ जुलै २०१५ रोजी कलाम भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे व्याख्यान देण्यासाठी गेले होते . तेथे त्यांना पायऱ्या चढताना अस्वस्थ वाटू लागले. थोड्या विश्रांतीनंतर

संध्याकाळी सुमारे साडेसाहा वाजता व्याख्यान देत असताना ते स्टेजवरून कोसळले. त्यांना जवळच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची नाडी व हृयस्पंदन बंद झाले होते. त्यांना आयसीयूत ठेवले. नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव शरीर शिलॉंगमधुन गुवाहाटीला भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमधून नेण्यात आले.

तेथून त्यांचे पार्थिव शरीर १० राजपथ मार्ग येथे दिल्लीच्या निवासस्थानी नेण्यात आले. पुढे त्यांचे पार्थिव शरीर हेलिकॉप्टरने मांडपम येथे नेण्यात आले. तेथून ते सैन्याच्या ट्रकमध्ये त्यांच्या जन्मगावी रामेश्वरम शहरात नेले गेले. रामेश्वरम येथे पोहचल्यावर त्यांचे पार्थिव शरीर स्थानिक बस स्टेशनच्या समोर खुल्या भागामध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले.

३० जुलै २०१५ रोजी पंतप्रधान, तामिळनाडुचे राज्यपाल आणि कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशचे मुख्य मंत्री यांच्यासह सुमारे तीन लाखहून अधिक लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या पर्थिवास मूठमाती देण्यात आली.

भारताचा मिसाईल मॅन या देशाच्या मातीत चिरनिद्रा घेता झाला.

Conclusion

भारताला अणुशक्ती समार्थ्याशिल बनवणाऱ्या, शेजार शत्रूंच्या काळजात धडकी भरवणाऱ्या एका सच्या देशभक्त शास्त्रज्ञांची प्रेरणादायी जीवन कहाणी आज आपण वाचली. हाडाचा शिक्षक, प्रामाणिकपणाची मिसाल, साधेपणाचे कोंदण, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या एका दुर्मिळ हिऱ्याची शक्य होईल तेवढी माहिती आजच्या लेखातून देण्याचा प्रयत्न आज आपण केला आहे.

आपणास आजचा लेख डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी । Dr APJ Abdul Kalam Information in Marathi कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्याला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करु.

तर आजच्या पुरता आपला निरोप घेतो. पुन्हा भेटू नव्या महिती सहीत.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आई वडिलांचे नाव काय?

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन मारकायर आणि आई चे नाव आशिअम्मा होते.

अब्दुल कलाम किती वेळा राष्ट्रपती झाले?

डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी 2002 ते 2007 पर्यंत एक वेळा भारतीय प्रजासत्ताकचे राष्ट्रपती म्हणून काम केले.

हे देखील वाचा स्वामी विवेकानंद संपूर्ण माहिती मराठी | Swami Vivekananda Information in Marathi

Leave a Comment