विराट कोहली संपूर्ण माहिती । Virat Kohli Marathi Mahiti

Virat Kohli Marathi Mahiti : आताच्या काळातला सर्वात श्रेष्ठ क्रिकेट पटू कोण आहे?, लगेच तुमचा उत्तर असेल “विराट कोहली”. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या शैलीसाठी तो जगात प्रसिद्ध आहे. विराट आपल्या फलंदाजीच्या जोरावर भारताला खूप सारे सामने जिंकून दिले आहेत. आजच्या घडीला विराट चे जगभरात करोडो चाहते आहे. या लेखात Virat Kohli information in marathi आपण विराट कोहली च्या लहानपणीच्या आणि क्रिकेट करिअर च्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

प्रारंभिक जीवन आणि पार्श्वभूमी | Early Life – Virat Kohli Marathi Mahiti

विराट कोहली चा जन्म 5 नोव्हेंबर 1988 साली दिल्लीमध्ये एका पंजाबी हिंदू परिवारामध्ये झाला. विराट कोहलीच्या वडिलांचे नाव प्रेमनाथ कोहली होते ते एक क्रिमिनल वकील होते, त्याच्या आईचे नाव सरोज , कोहली आहे आणि त्या एक ग्रहणी आहेत. विराट कोहलीला एक मोठा भाऊ विकास आणि मोठी बहीण भावना आहे. कोहलीचे बाळपण दिल्लीच्या उत्तम नगर मध्ये गेले. विराट कोहलीने आपले पहिली ते आठवी चे शिक्षण विशाल भारती पब्लिक स्कूल या शाळेमधून घेतले.

विराट कोहलीला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. जेव्हा तीन वर्षाचा होता तेव्हापासून तो क्रिकेटच्या प्रेमात होता, तो हातात क्रिकेट बॅट घ्यायचा आणि आपल्या वडिलांना बॉलिंग करायला सांगायचा.

करिअरची सुरुवात | Early Career – Virat Kohli Marathi Mahiti

जस जसा विराट कोहली मोठा होत होता, त्याची क्रिकेट ची आवड वाढत होते. 1998 मध्ये वेस्ट दिल्ली क्रिकेट अकॅडमी ची स्थापना झाली होती. विराट कोहलीच्या क्रिकेट बद्दलच्या प्रेमापोटी त्यांच्या वडिलांनी विराट कोहली ची भेट क्रिकेट कोच राजकुमार शर्मा शी केली होती आणि त्यांना विराट कोहलीला क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यास विनंती केली होती. विराट कोहली एवढा चांगला क्रिकेट खेळायचा की त्याच्या शेजाऱ्यांना पण त्याचा खेळ बघायला मजा यायची, शेजाऱ्यांनी तर कोहलीच्या वडिलांना सुचवले होते की, विराटला फक्त गल्ली क्रिकेट खेळण्या व्यतिरिक्त विराटला प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी मध्ये टाका असे सुचवले होते.

विराट कोहलीचे क्रिकेट प्रशिक्षण चालू होते आणि त्याचा खेळही खूप चांगल्या प्रकारे उभरत होता. विराट उत्तम क्रिकेट कौशल्य असून सुद्धा त्याचे दिल्ली अंडर-१४ संघामध्ये निवड झाली नाही. विराट कोहलीच्या वडिलांना प्रेम कोहलीला, त्याच्या मुलाला प्रभावशाली क्लबमध्ये स्थानांतरीत करण्याच्या ऑफर मिळाल्या, ज्यामुळे त्याची निवड निश्चित झाली असती, परंतु त्याने प्रस्ताव नाकारले. कोहलीने अखेरीस अंडर-15 दिल्ली संघात प्रवेश मिळवला. वसुंधरा एन्क्लेव्ह येथील सुमीत डोगरा अकादमीमधील सामन्यांमध्ये भाग घेत असताना, त्याने अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला पुढे नेण्यासाठी, त्याने नववी वर्गाच्या शिक्षणादरम्यान सेव्हियर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश केला.

क्रिकेट करिअर । Cricket Career

क्रिकेट करिअर । Cricket Career
xr:d:DAFrCSKyBS0:602,j:3756425997937858884,t:24040510

विराट कोहलीने आपल्या खेळाच्या जोरावर 2006 साली डोमेस्टिक क्रिकेट मध्ये पदार्पण केले. विराटचा खेळ खूपच चांगला होत चालला होता. त्याचवेळी 2008 च्या अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप मध्ये विराट कोहली ची कॅप्टन म्हणून निवड झाली. या वर्ल्ड कपमध्ये भारताने शेवटच्या सामन्यात साउथ आफ्रिकेला हरवून, हा वर्ल्ड कप जिंकला होता. फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये विराट कोहली 145 सामने खेळला आहे, त्यामध्ये त्याने 11097 धावा केल्या आहेत, त्यात 36 सेंचुरी आणि 38 हाफ सेंचुरी आहेत.

18 ऑगस्ट 2008 मध्ये विराट कोहलीने वन डे क्रिकेट मध्ये आपला पहिला सामना श्रीलंके विरुद्ध खेळला होता. वन डे क्रिकेट मध्ये विराट कोहलीने 292 सामने खेळला आहे, त्यामध्ये त्याने 58.67 च्या सरासरीने 13848 धावा काढल्या आहेत, त्यात 50 सेंचुरी आणि 72 हा सेंचुरी आहेत.

20 जून 2011 मध्ये विराट कोहलीने टेस्ट क्रिकेट मध्ये आपला पहिला सामना वेस्टइंडीज विरुद्ध खेळला होता. टेस्ट क्रिकेटमध्ये विराटने 113 सामने खेळला आहे, त्यामध्ये त्याने 49.15 च्या सरासरीने 8848 धावा केल्या आहेत, त्यात 29 सेंचुरी आणि 30 हाफ सेंचुरी आहेत.

12 जून 2010 मध्ये विराट कोहलीने t20 क्रिकेट मध्ये आपला पहिला सामना झिंबाब्वे विरुद्ध खेळला होता.

विराट कोहली नेहमीपासून सचिन तेंडुलकरचा फॅन होता, म्हणून त्याच्या खेळीमध्ये सचिन तेंडुलकरची अदा दिसते. एकदा एका प्रोग्राम मध्ये सलमान खानने सचिन तेंडुलकरला एक प्रश्न विचारले होते की, त्याचे क्रिकेट मधले रेकॉर्ड कोण तोडणार?, तेव्हा सचिनने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे नाव घेतले होते.

हे देखील वाचा सचिन तेंडुलकर यांची संपूर्ण माहिती | Sachin Tendulkar Marathi Mahiti

वैयक्तिक जीवन | Personal Life

11 डिसेंबर 2017 रोजी, इटलीतील फ्लॉरेन्स येथे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे विवाह संपन्न झाले होते, जे देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक बनले. 11 जानेवारी 2021 रोजी विराट आणि अनुष्काला पहिले मूल झाले, एक मुलगी, तिचे नाव वामिका ठेवण्यात आले. मुलीचे नाव वामिका हे संस्कृतमधून घेण्यात आले आहे, ज्याचा अर्थ “छोटी देवी” आहे. 15 फेब्रुवारी 2024 रोजी, जोडप्याने त्यांच्या दुसऱ्या मुलाचे, अकाय नावाच्या मुलाचे स्वागत केले.

फिटनेस च्या कारणांमुळे 2018 पासून विराट कोहली पूर्णपणे शाकाहारी डायट घ्यायला सुरुवात केली.

पुरस्कार । Awards

राष्ट्रीय सन्मान

2013 – अर्जुन पुरस्कार, दुसरा सर्वोच्च क्रीडा सन्मान.
2017 – पद्मश्री, भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
2018 – मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान.

Conclusion

विराट कोहलीचे क्रिकेट कारकीर्द ही खूपच मोठी आहे, या लेखांमध्ये आम्ही विराट कोहली बद्दल च्या सर्व गोष्टींबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की विराट कोहली संपूर्ण माहिती । Virat Kohli Marathi Mahiti हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

FAQs – Virat Kohli Marathi Mahiti

विराट कोहली कुठे राहतात?

विराट कोहली दिल्लीमध्ये मीरा बाग परिसरात राहतात.

विराट कोहलीचा पहिला सामना कधी झाला?

विराट कोहलीचा पहिला वनडे सामना 18 ऑगस्ट 2008, झिम्बाबवे विरुद्ध झाला.

Leave a Comment