मित्रांनो, आज आपण “मराठी वाक्प्रचार ( Vakprachar in Marathi)” या बद्दल जाणून घेणार आहोत. शाळेत अगदी लहानपणापासून आपण मराठीच्या पुस्तकातून वाक्प्रचार शिकत आलो आहोत. आपले गुरुजी आपल्याकडून वाक्प्रचार पाठ करून घेयायचे. परीक्षे मध्ये नेहमी वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा, वाक्प्रचार पूर्ण करा, असे प्रश्न विचारले जायचे. म्हणून जर आपल्याला सर्व Vakprachar in marathi पाठ असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आरामात लिहू शकतात.
वाक्प्रचार म्हणजे काय ?
जेव्हा एखाद्या शब्द समूहाचा शब्दश: अर्थ न होता त्यापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थ रूढ झालेला असतो, अश्या शब्द समूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. चला तर आज आपण असेच काही महत्त्वाचे मराठी वाक्प्रचार (Vakprachar in Marathi), त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग पाहूया!
चला तर आज आपण मराठी वाक्प्रचार – अर्थ व वाक्यात उपयोग Vakprachar in Marathi जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊया मराठी वाक्यप्रचार व अर्थ आणि त्यांचे वाक्यात उपयोग.
मराठी वाक्प्रचार, त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग | Vakprachar in Marathi
चारी दिशा मोकळ्या असणे – संपूर्ण स्वातंत्र्य असणे
वाक्यात उपयोग- सी.ए. च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने निलेशला यशाच्या चारी दिशा मोकळ्या झाल्या.
हाडाची काडे करणे – खूप कष्ट करणे
वाक्यात उपयोग- हाडाची कडे करून सुनील ने हे मोठं यश प्राप्त केले आहे.
हरभऱ्याच्या झाडावर चढविणे – खोटी स्तुती करणे
वाक्यात उपयोग- काही लोक आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून मज्जा घेत असतात.
एक घाव, दोन तुकडे करणे – तातडीचा निर्णय घेणे
वाक्यात उपयोग- बाबांनी आम्हा दोघा भावांबद्दल निणर्य घेऊन एक घाव, दोन तुकडे केले.
डाळ न शिजणे – काही उपाय न चालणे
वाक्यात उपयोग- सचिन ने प्राची ला खूप पटवायचे प्रयत्न केले, पण त्याची काही डाळ शिजेना .
कुंपणाने शेत खाणे – विश्वासू माणसाने घात करणे
वाक्यात उपयोग- सरपंचांनी गावाच्या पैश्या मध्ये केलेला भ्रष्टाचार उघडा पडल्यावर कुंपणानेच शेत खाल्ल्याची चर्चा रंगली होती.
अंगाची लाही लाही होणे – भयंकर राग येणे
वाक्यात उपयोग- आधीच रुसून बसलेल्या निशाची, मित्रांनी पुन्हा चेष्टा केल्याने तिच्या अंगाची लाही लाही झाली.
डोळ्यात प्राण आणणे – अतिशय आतुर होणे
वाक्यात उपयोग – आतच जन्मलेल्या आपल्या मुलाला पाहण्यासाठी किरण ने डोळ्यात प्राण आणला होता.
डोळ्यात खुपणे – यश सहन न होणे
वाक्यात उपयोग- सागर ला स्पर्धा परीक्षेत मिळालेले यश प्रतीकच्या डोळ्यात खुपत होते.
कान उघडणी करणे – दोषाची जाणीव करून देणे
वाक्यात उपयोग- खोटे बोलून दुसर्यांना फसवणाऱ्या अमितचे त्याच्या वडिलांनी कान उघडणी केली.
हे देखील वाचा Marathi Story for kids | Marathi Short Stories | मराठी गोष्टी
Vakprachar in Marathi
हात देणे– मदत करणे
पाठ दाखवणे– समोरून पळून जाणे
हात मारणे– ताव मारणे
हातातोंडाशी गाठ पडणे– जेमतेम खायला मिळणे
पोटावर पाय देणे– रोजंदारी बंद करणे
नाकाने कांदे सोलने– जास्तीचे शहाणपण दाखवणे
पोटाशी धरणे– माया करणे, कुशीत घेणे
प्राणापेक्षा जपणे– स्वतःच्या जिवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे
पदरात घालने– चूक पटवून देणे
बोटावर नाचवणे– हवे तसे खेळवणे
पाठबळ असणे– आधार असणे
मनात अढी धरणे– एखाद्याविषयी मनात राग निर्माण होणे
मांडीवर घेणे– दत्तक घेणे
दात धरणे– सूड घेण्याची भावना बाळगणे.
तोंड सुख घेणे– दोष देताना वाटेल तसे बोलणे.
दात विचकणे– निर्लज्जपणे असणे.
तोंड भरून बोलणे– मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे.
डोळ्याचे पारणे फिटणे– समाधान होणे किंवा पाहून आनंदित होणे.
दाताच्या कण्या करणे– वारंवार विनंती करणे.
डोळ्यात धूळ फेकणे– खोटेनाटे सांगून फसवणे.
दाती तृण धरणे– शरण जाणे.
नजर चुकवणे– न दिसेल अशी हालचाल करणे.
नवल वाटणे– आश्चर्य वाटणे, चकित होणे.
कानउघाडणी करणे– चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे.
उर भरून येणे– गदगदून येणे.
नाक उडवणे– थट्टा, उपास करणे
अंग चोरणे– फारच थोडे काम करणे.
फुशारकी मारणे – बढाया मारणे
अंगाची लाही लाही होणे-अतिशय संताप येणे.
शब्द झेलणे – आज्ञेचे तातडीने पालन करणे
अंगात वीज संचारणे– अचानक बळ येणे.
वाटाण्याच्या अक्षता लावणे – स्पष्टपणे नाकारणे
अंगवळणी पडणे– सवय होणे.
मात्रा लागू पडणे – उपाय बरोबर ठरणे
पाणी मुरणे – भानगड असणे
काढता पाय घेणे– विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे
दात ओठ खाणे – खूप रागवणे
कंबर कसणे– जिद्दीने तयार होणे.
गळा काढणे– मोठ्याने रडणे.
डोक्यावर बसवणे– फाजील लाड करणे.
हे होते मराठी भाषेतील काही प्रसिद्ध वाक्प्रचार तुम्हाला हे vakprachar in marathi कसे वाटले आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा. व आम्हाला आशा आहे कि हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल.
धान्यावाद !
हे देखील वाचा बुड बुड घागरी मराठी गोष्ट । Bud Bud Ghagri Story in Marathi
Marathi Story for kids | Marathi Short Stories | मराठी गोष्टी
1 thought on “50 Best Vakprachar in Marathi | मराठी वाक्प्रचार-अर्थ व वाक्यात उपयोग 2024”