आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सद्गुरु असायलाच पाहिजे. सद्गुरु एक ही व्यक्ती आहे जी आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. सद्गुरु आपल्याला परमेश्वराची भक्ती कशी करावी हे आपल्याला शिकवते.
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:
Shri Gurucharitra Adhyay 14 -श्री सद्गुरू चरित्र ( ज्ञानविवरण ) क्रूरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीसद्गुरुभ्यो नमः ॥
नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका ।
प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्तें परियेसा ॥१॥
जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा ।
पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥
उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसीं ।
पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रति ॥३॥
ऐकोनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण ।
श्रीसद्गुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारें ॥४॥
ऐक शिष्या शिखामणि1 । भिक्षा केली ज्याचे2 भुवनीं ।
तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥
श्रीसद्गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरु ।
पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥
तया सायंदेव द्विजासी । श्रीसद्गुरु बोलती संतोषीं ।
भक्त हो3 रे वंशोवंशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥
ऐकोनि श्रीसद्गुरुचें वचन । सायंदेव विप्र करी नमन ।
माथा ठेवून चरणीं । न्यासिता4 झाला पुनःपुन्हा ॥८॥
जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारू ।
अविद्यामाया5 दिससी नरु । वेदां अगोचर6 तुझी महिमा ॥९॥
विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी7 ।
धरिला वेष तूं मानुषी8 । भक्तजन तारावया ॥१०॥
तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी ।
मागेन एक आतां तुम्हांसी । तें कृपा करणें श्रीसद्गुरुमूर्ति ॥११॥
माझे वंशपारंपरीं । भक्ति द्यावी निर्धारीं ।
इह9 सौख्य पुत्रपौत्रीं । उपरी10 द्यावी सद्गति ॥१२॥
ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनीं ।
सेवा करितो द्वारयवनीं11 । महाशूरक्रूर असे ॥१३॥
प्रतिसंवत्सरीं ब्राह्मणासी । घात करितो जीवेसीं ।
याचि कारणें आम्हांसी । बोलावीतसे मज12 आजि ॥१४॥
जातां तया जवळी आपण । निश्चयें घेईल माझा प्राण ।
भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैंचें आपणासी ॥१५॥
संतोषोनि श्रीसद्गुरुमूर्ति । अभयंकर13 आपुले हातीं ।
विप्रमस्तकीं ठेविती । चिंता न करीं म्हणोनियां ॥१६॥
भय सांडूनि तुवां जावें । क्रूर यवना भेटावें ।
संतोषोनि प्रियभावें । पुनरपि पाठवील आम्हांपाशीं ॥१७॥
जंववरी तूं परतोनि येसी । असों आम्ही भरंवसीं ।
तुवां आलिया संतोषीं । जाऊं आम्ही येथोनि ॥१८॥
निजभक्त आमुचा तूं होसी । पारंपर-वंशोवंशीं14 ।
अखिलाभीष्ट15 तूं पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥
तुझे वंशपारंपरीं । सुखें नांदती पुत्रपौत्रीं ।
अखंड लक्ष्मी तयां घरीं । निरोगी होती शतायुषी16 ॥२०॥
ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण ।
जेथें होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥
कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा ।
ब्राह्मणातें पाहतां कैसा । ज्वालारुप17 होता जाहला ॥२२॥
विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत ।
विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीसद्गुरुसी ध्यातसे ॥२३॥।
कोप आलिया ओळंबयासी18 । केवीं स्पर्शे अग्नीसी ।
श्रीसद्गुरुकृपा होय ज्यासी । काय करील क्रूर दुष्ट ॥२४॥
गरुडाचिया पिलियांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी19 ।
तैसें तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीसद्गुरुची ॥२५॥
कां एखादे सिंहासी । ऐरावत20 केवीं ग्रासी ।
श्रीसद्गुरुकृपा होय ज्यासी । कलिकाळाचें भय नाहीं ॥२६॥
ज्याचे ह्रुदयीं श्रीसद्गुरुस्मरण । त्यासी कैंचें भय दारुण ।
काळमृत्यु21 न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥
ज्यासि नाहीं मृत्यूचें भय । त्यासी यवन असे तो काय ।
श्रीसद्गुरुकृपा ज्यासी होय । यमाचें मुख्य भय नाहीं ॥२८॥
ऐसेपरी तो यवन । अंतःपुरांत जाऊन ।
सुषुप्ति22 केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाहीं ॥२९॥
ह्रुदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसीं ।
प्राणांतक व्यथेसीं । कष्टतसे तये वेळीं ॥३०॥
स्मरण असें नसे कांहीं । म्हणे शस्त्रें मारितो घाई ।
छेदन करितो अवेव23 पाहीं । विप्र एक आपणासी ॥३१॥
स्मरण जाहलें तये वेळीं । धांवत गेला ब्राह्मणाजवळी ।
लोळतसे चरणकमळीं । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥
येथें पाचारिलें24 कवणीं । जावें त्वरित परतोनि ।
वस्त्रें भूषणें देवोनि । निरोप देतो तये वेळीं ॥३३॥
संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र25 ।
गंगातीरीं असे वासर । श्रीसद्गुरुचे चरणदर्शना ॥३४॥
देखोनियां श्रीसद्गुरुसी । नमन करी तो भावेसीं ।
स्तोत्र करी बहुवसीं । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥
संतोषोनि श्रीसद्गुरुमूर्ति । तया द्विजा आश्वासिती ।
दक्षिण देशा जाऊं म्हणती । स्थान-स्थान26 तीर्थयात्रे ॥३६॥
ऐकोनि श्रीसद्गुरुचें वचन । विनवीतसे कर जोडून ।
न विसंबें आतां तुमचे चरण । आपण येईन समागमें ॥३७॥
तुमचे चरणाविणें देखा । राहों न शके क्षण एका ।
संसारसागरतारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥
उद्धरावया सगरांसी27 । गंगा आणिली भूमीसी27 ।
तैसें स्वामीं आम्हांसी । दर्शन दिधलें आपुलें ॥३९॥
भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हां सोडणें काय निति ।
सवें28 येऊं निश्चितीं । म्हणोनि चरणीं लागला ॥४०॥
येणेंपरी श्रीसद्गुरुसी । विनवी विप्र भावेसीं ।
संतोषोनि विनयेसीं । श्रीसद्गुरु म्हणती तये वेळीं ॥४१॥
कारण असे आम्हां जाणें । तीर्थे असती दक्षिणे ।
पुनरपि तुम्हां दर्शन देणें । संवत्सरीं29 पंचदशीं ॥४२॥
आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करुं हें निश्चित ।
कलत्र पुत्र इष्ट भ्रात । मिळोनि भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥
न करा चिंता असाल सुखें । सकळ अरिष्टें30 गेलीं दुःखें ।
म्हणोनि हस्त ठेविती मस्तकें । भाक31 देती तये वेळीं ॥४४॥
ऐसेपरी संतोषोनि । श्रीसद्गुरु निघाले तेथोनि ।
जेथें असे आरोग्यभवानी । वैजनाथ32 महाक्षेत्र ॥४५॥
समस्त शिष्यांसमवेत । श्रीसद्गुरु आले तीर्थे पहात ।
प्रख्यात असे वैजनाथ । तेथें राहिले गुप्तरुपें ॥४६॥
नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी।
होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठें ठेविलें ॥४७॥
गंगाधराचा नंदनु । सांगे श्रीसद्गुरु कामधेनु ।
सिद्धमुनि विस्तारुन । सांगे नामकरणीस33 ॥४८॥
पुढील कथेचा विस्तारु । सांगतां विचित्र अपारु ।
मन करुनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥
इति श्रीसद्गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रूरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥
॥श्रीसद्गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥ ॥ श्रीसद्गुरुदेव दत्त ॥
॥ जय सद्गुरू ॥
काही शब्दांचे अर्थ – Shri Gurucharitra Adhyay 14
1.शिरोमणी, 2. ज्या सायनदेवाच्या घरी, 3. होवोत, 4. ठेविता, अर्पिता, 5. अज्ञानाने, 6. अगम्य, 7. शंकर, 8. मनुष्याचा, 9. या लोकात, 10. परलोकात, 11. यवन द्वारी, 12. आज मला बोलाविले आहे, 13. अभयहस्त, 14. वंश पारंपारि, 15. सर्व इष्ट मनोरथा, 16. शंभर वर्षे आयुष्य असणारे अर्थात दीर्घायुषी, 17. क्रोधाने लाल, 18. वाळविला, 19. गिळील, 20. मोठा हत्ती, 21. महामृत्यू, 22. गाढ निद्रा, 23. अवयव, 24. बोलाविले, 25. त्वरित, 26. ठिकठिकाणच्या, 27. सगर नामक राजाचे मुलगे कपिल महामुनीच्या शापाने भस्म झाले, त्यांच्या उद्धारा करिता भगीरथाने तपश्चर्या करून स्वर्गातून गंगा खाली आणली, 28. बरोबर, 29. पंधरा वर्षांनी, 30. संकटे, 31. वचन, 32. परली वैजनाथ असे वाटते?, 33. नामधारकास
आम्हाला आशा आहे की Gurucharitra Adhyay 14 हा लेख तुम्हाला आवडला असेल.
जय सद्गुरू.
boAt Airdopes 141 ANC TWS in Ear Earbuds with 32 Db ANC, 42 Hrs Playback, 50Ms Low Latency Beast Mode, Iwp Tech,Quad Mics with Enx,ASAP Charge,USB Type-C Port & Ipx5(Gunmetal Black)
Shri Gurucharitra Adhyay 14 PDF
हे देखील वाचा
जय श्री हनुमान चालीसा । Shri Hanuman Chalisa Lyrics
Mahamrutyunjay Mantra Marathi | महामृत्युंजय मंत्र
500+ ENGLISH SENTENCE MEANING IN MARATHI | इंग्रजी वाक्याचा मराठीत अर्थ