संत तुकाराम महाराज माहिती मराठी । Sant Tukaram Information in Marathi

भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी.असे रोख ठोक बोलणारे, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना गुरुस्थानी मानले ते संत तुकाराम महाराज नेमके होते तरी कसे? अंधश्रध्देच्या जंजाळातून आणि जातीभेदाच्या जोखडातून सामान्य माणसांना बाहेर काढून त्यांना सोप्या नामस्मरणाने मोक्ष प्राप्ती करुन देणाऱ्या तुकाराम महाराजाच्या गाथा इंद्रायणीत कोणी बुडविल्या ?

चला,आजच्या या Sant Tukaram maharaj information in marathi लेखातून आपण सविस्तर जाणून घेऊ या, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे कार्य आणि जीवनपट संपूर्ण माहिती.

Sant Tukaram Information in Marathi

जन्म

विश्वंभर हे तुकाराम महाराजाच्या घराण्याचे मूळ पुरूष होते असे म्हणतात. विश्वंभर यांचे पोटी हरी यांचा जन्म झाला. हरीचा मुलगा विठोबा. विठोबाचा मुलगा पदाजी. शंकर हे पदाजी यांचे पूत्र. शंकर यांचे पोटी कान्होबा जन्मले व कान्होबा चे पुत्र म्हणजेच तुकाराम महाराजांचे वडील बोल्होबा. तुकाराम महाराजांच्या आईला सावजी, तुकाराम आणि कान्होबा असे तीन मुलगे झाले. तिला दोन मुलीही झाल्या, असे सांगतात.

तुकाराम महाराजांचा (Sant Tukaram Information in Marathi) जन्म पुणे जिल्ह्यातील देहू गावी सोमवार दिनांक २१ जानेवारी १६०८ , माघ शुद्ध पंचमी, शके १५३० या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा अंबिले व आईचे नाव कनकाई बोल्होबा आंबिले होते. जेथे तेथे जाती धर्म शोधणाऱ्या आजच्या जमान्यात हे सांगणे आवश्यक वाटते की तुकाराम महाराज वाणी समाजाचे होते. विठ्ठल भक्त विश्वंभरबुवा तुकाराम महाराजाच्या घराण्याचे मूळ पुरूष होते. घरात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांच्या घरात विठोबा रखुमाई चे मंदीर होते.

तुकाराम महाराजांचे शिक्षण चांगले झाले होते. घरीच विठ्ठल रखुमाई मंदीर असल्याने भजन किर्तन प्रवचन वगेरे लहानपणापासून त्यांच्या कानी पडत असतील त्याची कल्पना करता येईल. महाजनी हा घरचा परंपरागत व्यवसाय असल्याने लेखन, वाचन, गणित , नीतिशास्त्र ह्यांचे शिक्षण झालेच होते. त्यांचे क्रिडा विषयक सुन्दर अभंग ऐकुन ते लहानपणी चेंडूफळी, आट्यापाट्या, हुतूतू, विटीदांडू इत्यादी खेळ खेळले असावेत याची कल्पना येते. मुलींचे झिम्मा, फुगडी, टिपऱ्या वगेरे खेळ पाहण्यासाठी त्यांनी नक्कीच रस घेतला असावा याचा अंदाज त्यांच्या अभंगातून येतो.

अनेक खेळांचे सुंदर वर्णन तुकारामांच्या गाथेतून पाहायला मिळते ते काही अनुभवल्या शिवाय? विरक्त वृत्तीचा सावजी तुकारामांचा मोठा भाऊ होता. सावजी यांची पत्नी वारल्यावर ते विरक्त होऊन तिर्थाटनाचे निमीत्ताने घरातुन बाहेर पडले. त्यामुळेच घराची जबाबदारी आपोआपच तुकरामांवर पडली. त्यांच्या धाकट्या भावाचे नाव कान्होबा होते.

विवाह व आपत्य – Sant Tukaram Mahiti in Marathi

तुकाराम महाराजाच्या पहिल्या पत्नीचे नाव रखुमाई होते. त्यांच्या बद्दल फारशी महिती उपलब्ध होत नाही. पहिल्या पत्नीच्या मृत्यू पश्चात त्यांचा दुसरा विवाह पुण्यातील आप्पा गुळवी यांची मुलगी जिजाई उर्फ आवली हिच्याशी झाला होता.
(Sant Tukaram Information in Marathi) संत तुकाराम महाराजांना चार मुले होती. भागीरथी व काशी या दोन मुली व नारायण आणि महादेव अशी दोन्हीं मुलांची नावे होती. या पैकी दोन मुले आजारपणात मरण पावली.

कार्य

वयाच्या सतरा अठराव्या वर्षी मातृ पितृ छत्र हरपलेल्या तुकाराम महाराजांचे श्री केशव चैतन्य ( बाबाजी चैतन्य) हे सिद्ध पुरुष गुरू होते. आयुष्यात खूप मोठे कार्य घडण्याकरिता योग्य गुरूचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद प्राप्त होणे आवश्यक असते.
तुकाराम महाराजाच्या जीवनात विविधांगाने संघर्ष सूरू होता.(Sant Tukaram Mahiti Marathi)

प्रपंचात नानाविध कठीण प्रसंग सहन करीत असतानाच समाजात सूरू असेलल्या सोशनाबाबत ते अनाभिज्ञ नव्हतेच. त्यांना अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. ते १७ – १८ वर्षांचे असताना त्यांचे आई, वडील मरण पावले. मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला.

१६३० ते १६३१ साली महाराष्ट्रात भयाण दुष्काळ पडला होता. शेती, गुरेढोरे, सर्वांचा नाश झाला. किड्या मुंग्यांसारखी माणसे मरू लागली. यातून देहू परिसरही सुटला नव्हता. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, लोकांचे हाल तुकाराम महाराजांना पहावले नाहीत. त्यांनीं आपल्या घरचे अन्नधान्य लोकांना वाटले. घरची सावकारी होती. घरातली शेतकऱ्यांच्या कर्जाची गाहणखते तुकारामांनी जाळून नष्ट केली व लोकांना कर्जमुक्त केले. सामान्य माणसाचा कळवळा हेच खऱ्या संताचे लक्षण आहे.

सभोवतालचे दुःख पाहून त्यांचे मन उदास झाले. मनात विरक्ती येवू लागली. परंतू दुःखाकडे पाठ फिरवली म्हणजे दुःख नाहीसे होत नाही याची जाण त्यांना होतीच. हे दुःख, हया वेदनांचा नाश करण्याचा उपाय सापडावा म्हणुन त्यांनी आपली विठ्ठल भक्ती चालू ठेवीत भंडारा डोंगरावर उपासना सुरू केली. येथे त्यांनी गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेवांचे अभंग, रामायण, महाभारत , वेद, उपनिषद्, श्रुती, स्मृती,दर्शने वगैरेंचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या घोर उपासनेचा प्रसाद म्हणून त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला. त्यांना अभंग रचना स्फुरू लागली. आणि या अभंगातून त्यांनी जगाला दुःखमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन सूरू केले. ते गावोगावी भजन किर्तन प्रवचन करु लागले. भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या सामान्य माणसांना बाहेर काढून त्यांना नाम स्मरण हा परमार्थाचा सोपा मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी सुरू केले.

तुकाराम महाराजांना समाजकंटकांचा विरोध

आपल्या दैनंदिन जीवनातून आणि अभंगातून तुकाराम महाराज जनसामान्यांना दुःखमुक्त आदर्श जीवनाचे धडे देऊ लागले होते.
समाजातील आणि धर्मातील एकहाती वर्चस्व त्यांना मान्य नव्हता. धर्मग्रंथांचा अर्थ आणि ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे हे त्यांचे म्हणने अगदी ठासून मांडीत.

त्यांच्या अलौकिक अमृतवाणीने सामान्य जनांचा त्यांच्याप्रती ममत्व न वाटते तरच नवल होते. अगदी समाजातील प्रतिष्ठित, सुसंस्कृत लोक सुध्दा तुकाराम महराजांच्या शिकवणीकडे आकर्षित होऊ लागली. समाजसुधारणावादी, संत कवी म्हणुन त्यांची किर्ती चौबाजुने पसरू लागली. परंतु याचा अहंकार मात्र त्यांना जडला नाही. ” मी आहे मजूर विठ्ठलाचा ” असे म्हणुन ते करता करविता परमेश्वर आहे याची शिकवण लोकांना देत.

समाजात तुमचा लौकिक वाढला की शत्रू आपोआप तयार होतात. तसेच तुकाराम महाराजांचा द्वेष करणारे शत्रू निर्माण झाले. ” वेदांचा तो अर्थ अम्हसीच ठावा| येरांनी वहावा भार माथी||” असे म्हणत धर्माच्या तथाकथित ठेकेदारांना उघड आव्हान देणाऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना विरोध न होता तरच नवल.

त्यांचा हेवा आणि द्वेष करणारे दुर्बुद्धी शत्रू वाढले. सालोमालो हे कीर्तनकार, मंबाजीबुवा, देहूगावाचा पाटील, वाघोलीचे रामेश्वरभट हे त्यांत प्रमुख होते. तुकारामांच्या अभंगांच्या वह्या इंद्रायणीत बुडविण्यात रामेश्वरभटांचा प्रमुख हात होता. तुकोबा शूद्र असून सामान्य जनांना वेद सांगतात हा विरोधकांचा त्यांच्यावर मुख्य आरोप होता. असे असूनही सालोमालो तुकारामांचे अभंग स्वतःच्या कीर्तनांत स्वतःच्या नावावर वापरीत. याचाच अर्थ साहित्याची चोरी तेव्हाही होत होती.

(Sant Tukaram Information in Marathi) संत तुकाराम महाराजांना या समाज कंटकानी खुप त्रास दिला, खुप छळ केला. त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडविल्या. मात्र गाथांचे चोपडे कोरडेच्या कोरडेच वर आले.तुकाराम महाराज बधत नाहीत म्हटल्यावर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. पण संपूर्ण समाजच तुकाराममय झाला होता. मंबाजी भटाने तर पुण्यातील विख्यात राजयोगी आपाजी गोसावी ह्यांस पत्र पाठवून ह्या शूद्राचा ब्राह्मणसुद्धा अनुग्रह घेत असल्याची तक्रार केली होती. तेव्हा आपाजी गोसाव्यानी तुकोबा रायांना शिक्षा देण्याचा निश्चय केला होता, अशी हकीकत तुकोबांच्या शिष्या संत बहिणाबाईंच्या अभंगांत आलेली आहे.

तुकोबांची शिकवण व शिष्य

तुकोबा रायांनी मठाचा उद्योग सावधपणे टाळला. त्यांनी अंधानुकरण करणारी शिष्य परम्परा प्रकर्षाने टाळली.
यांनी प्रत्यक्ष शिष्य केलाच नाही. त्यांच्या काळातील रामेश्वरभट वाघोलीकर, बहिणाबाई सिऊरकर आणि त्यांच्या पश्चात कचेश्वरभट ब्रह्मे चाकणकर, निळोबाराय पिंपळनेरकर किंवा महिपती ताहाराबादकर ह्यांनी तुकाराम महाराजांना गुरू मानले.
रामेश्वरभटांना सोडून बाकीच्यांना स्वप्नात येऊन त्यांनी दीक्षा दिली असे मानले जाते.
शिवाजी महाराज आणि तुकाराम ह्यांच्या भेटीबद्दलही ऐतिहासिक पुरावा मिळत नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराजांना गुरु मानीत अशी अनेकांना खात्री आहे.

तुकारामाची अभंग गाथा

वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माचा पाया ज्ञानदेवांनी रचला आणि तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला असे वारकरी संप्रदाय मानतो. (Sant Tukaram Maharaj Mahiti Marathi)
वारकरी संप्रदायाची शिकवण ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी पासुन सुरु होते आणि तुकारामांच्या अभंग गाथेवर पुर्ण होते असे मानले जाते.
तुकारामांच्या अभंग गाथेत पाच हजारांहून अधिक अभंगांचा सामावेश आहे. यात सामान्य माणसांना दुःखमुक्त दैनंदिन जीवन जगण्याचा उपदेश आहे. तसेच धार्मिक ढोंग आणि अंधश्रध्दा यांच्यावर कडाडून केलेली टिका देखिल आहे.
मराठी साहित्यात तुकारामांच्या अभंग–गाथेने अढळ स्थान मिळविले आहे. तुकारामांची गाथा हा शेकडो प्रबांधांचा विषय झालेला आहे. यापुढेही होईल. तुकारामांची गाथा अनन्यसाधारण आहे. मराठी काव्य जगतात तुकारामांची गाथा एक तेजस्वी तारा आहे.

निर्वाण

फाल्गुन वद्य द्वितीया, शा.शके १५७२, दिनांक १९मार्च १६५०. वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. वारकरी संप्रदायात हा पवित्र आणि पूजनीय दिवस मानला जातो.
या दिवशी स्वर्गातून पुष्पक विमान येऊन तुकाराम महाराजांना सदेही स्वर्गाला घेऊन गेले असे चित्र तुकाराम महाराजांचे चरित्रकार रंगवताना दिसतात. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटातून देखिल हेचं दाखवले जात असले तरी, आजच्या विज्ञान युगात हे सहजासहजी स्विकारले जात नाही. त्यामुळे याबाबत उलट सुलट चर्चा घडत असते . त्यातून वादही निर्माण होतात.

असे असले तरी आज संत तुकाराम महाराज आपल्यात त्यांच्या गाथेचा रूपाने वावरत आहेत हे निश्चित. बाकी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना पुष्पक विमान येऊन सदेह वैकुंठाला गेले हा वादाचा विषय टाळून ज्याच्या त्याच्या भावनेनुसार ज्याला त्याला विचार करण्याची मुभा देऊ या.

Conclusion – Sant Tukaram Information in Marathi

तुकाराम महाराजांचे कार्य अफाट आहे. उण्या पुऱ्या बेचाळीस वर्षाच्या आपल्या आयुष्यात समाजाची योग्य पद्धतीने पुनर्रचना करणाऱ्या या महान संतास सहस्र कोटी प्रणाम.

मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा ।पुनरपी संसारा येणे नाही ॥
मन हे शेवंती देऊ भगवंती । पुनरपी संसृती येणे नाही ॥
मन हे तुळशी देऊ हृषिकेशि । पुनरपी जन्मा येणे नाही ॥
तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तुझा वास व्हावा वैकुंठासी ॥

असे खऱ्या निवृत्तीचे नेमके बोल नेमक्या शब्दात लिहिणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे बद्दलचा आजचा लेख संत तुकाराम महाराज माहिती मराठी । Sant Tukaram Information in Marathi आपणाला कसा वाटला ते कमेंट करुन अवश्य सांगा. लेख आवडल्यास नक्की शेअर करा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

हे देखील वाचा श्री स्वामी समर्थ संपूर्ण माहिती । Shree Swami Samarth in Marathi

1 thought on “संत तुकाराम महाराज माहिती मराठी । Sant Tukaram Information in Marathi”

Leave a Comment