मित्रांनो आज आपण महेंद्र सिंग धोनी संपूर्ण माहिती । Mahendra Singh Dhoni Mahiti Marathi या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महेंद्र सिंग धोनी हे भारतीय क्रिकेट मधील एक यशस्वी कर्णधार होते. या Mahendra Singh Dhoni Mahiti Marathi लेख मध्ये आपण महेंद्र सिंग धोनी यांच्या वयक्तिक जीवनाबद्दल, क्रिकेट करिअर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Table of Contents
सुरुवातीचे जीवन | Mahendra Singh Dhoni Information in Marathi
महेंद्र सिंग धोनी यांचा जन्म ७ जुलै १९८१ साली झारखंड मध्ये रांची येथे राजपूत परिवारात झाला होता. त्यांच्या आईचे नाव रजनी आणि वडिलांचे नाव पान सिंग धोनी आहे. महेंद्र सिंग यांना एक मोठा भाऊ नरेंद्र आणि मोठी बहीण जयंती आहे. घरात त्यांचे लाडाचे नाव ‘माही’ होते, पुढे जाऊन साऱ्या जगात ते याच नावाने प्रसिद्ध झाले.
महेंद्र सिंग धोनी यांनी त्यांचे शालीय शिक्षण रांची मधील श्यामली येथील डीएव्ही जवाहर विद्या मंदिर येथून पूर्ण केले. लहानपणी शाळेत धोनीला फ़ुटबाँल आणि बॅटमिंटन हे खेळ आवडायचे. शाळेच्या फुटबॉल टीमचा धोनी गोलकीपर होता. शाळेतल्या क्रिकेट कोच ने धोनीची गोलकिपिंग बघून, त्याला क्रिकेट खेळण्यास विचारले , छोट्या बॉल ने खेळायला नाही आवडत म्हणून, धोनी ने क्रिकेट खेळण्यास नापसंती दर्शवली होती. पण नंतर तो विकेट किपर म्हणून खेळण्यास तयार झाला होता.
करिअरची सुरुवात
क्रिकेट खेळण्यास पसंती नसताना, क्रिकेट खेळायला सुरुवात तर केली, पण नंतर धोनीचे क्रिकेट हे एकमेव आवडते खेळ झाले. धोनी शाळेत असताना स्थानिक क्रिकेट टीम मधून खेळायला सुरुवात केली. विकेट किपर म्हणून त्यांची कामगिरी खूपच चांगली होत चालली होती.
साल १९९५ ते १९९८, धोनी स्थानिक कमांडो क्रिकेट क्लब तर्फे क्रिकेट खेळात होता. यादरम्यान त्याची विकेट किपींग आणि फलंदाजी खूप भहरात गेली. धोनीचे क्रिकेट प्रेम वाढत चाललं होता. धोनीला वेगवेगळ्या चॅम्पिअनशिप मध्ये खेळण्यास निवड होत राहिली. इंटरस्कूल कॉम्पिटिशन च्या एका मॅच मध्ये धोनी ने १५० बॉल मध्ये २१३ धावा केल्या होत्या. साल १९९७-९८, धोनीची विनू मंकड ट्रॉफी साठी अंडर १६ टीम मध्ये निवड करण्यात आली होती.
१६ डिसेंबर १९९९ ला कूच बिहार ट्रॉफी टोर्नामेंट मध्ये बिहार अंडर १९ Vs पंजाब अंडर १९ फायनल मॅच झाली होती, या मॅच नंतर अंडर १९ वर्ल्डकप साठी खेळाडूंची निवड होणार होती. या मॅच मध्ये युवराज सिंग सारखे दिग्गच खेळाडू पण होते. धोनी ने या मॅच मध्ये चांगली कामगिरी केले होती, पण मॅच हरले होते. धोनी चा सिलेक्शन झाला नाही.
या नंतर धोनीचा ईस्ट झोन तर्फे दुलीप ट्रॉफी मध्ये सिलेक्शन झाला होतं, पण या सिलेक्शन ची बातमी धोनी ला खूप उशिरा ने भेटली, एक रात्र अगोदर, या कारणामुळे धोनी या टोर्नामेंट ला पोहचू शकला नाही, आणि त्याने हा चान्स मिस केला.
क्रिकेट मध्ये चांगली कामगिरी केल्याने, २००१ ला धोनीला रेल्वे मध्ये स्पोर्ट्स कोटा मधून तिकीट चेकर ची नोकरी ऑफर करण्यात आली होती. इच्छा नसताना वडिलांचा खातीर त्याने हि नोकरी स्वीकारली. रेल्वे मध्ये काम करत असताना धोनीला क्रिकेट खेळणास मुभा होती, पण इथे त्याला आपला भविष्य काही चांगलं दिसत नव्हतं, कारण ना रेल्वे च्या कामात त्याला उत्सुकता होती आणि क्रिकेट ला वेळ देता येत नव्हतं. शेवटी त्याने नोकरी सोडण्याचा निर्धार केला, आणि क्रिकेट ला एक चान्स देण्याचं ठरवले.
क्रिकेट करियर
Mahendra Singh Dhoni Mahiti Marathi या लेखामध्ये आपण धोनीच्या क्रिकेट करियर बद्दल जाणून घेऊया. धोनी ने खूप मेहनत केली आणि त्याला या मेहनतीचा फळ भेटलं. धोनी केनिया च्या टूरसाठी इंडिया A टीम मध्ये सिलेक्ट झाला. इंडिया A संघाकडून धोनी ने चांगली कामगिरी केली, त्याला मन ऑफ द मॅच चा पुरस्कार सुद्धा भेटला. यानंतर धोनी ची भारताच्या संघामध्ये निवड करण्यात आली.
एक दिवसीय करियर । One-Day Career
२३ डिसेंबर २००४ ला धोनी ने बांगलादेश विरुद्ध पहिली वन दे मॅच खेळाला. या पहिल्याच मॅच मध्ये धोनी पहिल्याच बॉल वर रन आऊट झाला. भारत Vs बांगलादेश च्या ३ मॅच च्या सिरीज मध्ये धोनी फक्त १९ धावा काढू शकला होता.
या नंतर च्या पाकिस्तान Vs भारत सिरीज मध्ये धोनी ची निवड करण्यात आली, पण सुरवातीच्या ४ मॅच मध्ये धोनी ची कामगिरी खूप निराशाजनक झाली होती. ५ व्या मॅच मध्ये धोनी ने सेंचुरी मारली, आणि यानंतर त्याची कामगिरी एकदम उचांक गाठू लागली. भारताच्या पाकिस्तान दौऱ्यावर धोनी ने अप्रतिम कामगिरी केली. बाकी त्या नंतर इतिहास आहे. पुढे जाऊन धोनी ला वन डे टीमचा कॅप्टन करण्यात आले. धोनीच्या कॅप्टनशिप मध्ये भारताने 2011 ची ICC क्रिकेट विश्वचषक , 2013 ची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इतर तीन ICC ट्रॉफी जिंकली.
रिटायरमेंट ODI – 9 July 2019 |
एकूण एकदिवसीय सामने | 350 |
——————– | ——- |
ODI सामन्यांमधील एकुण धावा | 10773 |
—————————– | ——- |
ODI सामन्यांमधे लावलेले एकुण चौकार | 826 |
—————————– | ——- |
ODI सामन्यांमधे लावलेले एकुण षट्कार | 229 |
—————————– | ——- |
ODI सामन्यामधे बनविलेले एकुण शतक | 10 |
—————————– | ——- |
ODI सामन्यांमधे बनविलेले व्दिशतक | 0 |
—————————– | ——- |
ODI सामन्यांमधे बनविलेले एकुण अर्धशतक | 78 |
टेस्ट करियर । Test Career
2 डिसेंबर 2005 रोजी श्रीलंके विरुद्ध धोनीने आपली पहिली कसोटी मॅच खेळली. धोनीच्या नेतृत्वा मध्ये 2010 आणि 2011 मध्ये भारताने दोनदा ICC टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली.
रिटायरमेंट Test – 26 December 2014
एकुण खेळलेले कसोटी सामने | 90 |
---|---|
एकुण खेळलेल्या इनिंग | 144 |
—————————————– | ——- |
कसोटी सामन्यातील एकुण धावा | 4876 |
—————————————– | ——- |
कसोटी सामन्यांमधे मारलेले एकुण चैकार | 544 |
—————————————– | ——- |
कसोटी सामन्यात मारलेले एकुण षट्कार | 78 |
—————————————– | ——- |
कसोटी सामन्यांमधील शतकं | 6 |
—————————————– | ——- |
कसोटी सामन्यांमधे पुर्ण केलेले व्दिशतक | 1 |
टी-20 करिअर । T-20 Career
1 डिसेंबर 2006 रोजी धोनीने दक्षिण आफ्रिका विरूध्द खेळला गेलेला सामना हा धोनीचा पहिला T-20 सामना होता. महेंद्रसिंह धोनी च्या कॅप्टन शिप मध्ये 2007 मधील ICC T20 वर्ल्डकप जिंकला होता.
रिटायरमेंट T20 – 27 February 2019
खेळलेले एकुण T20 सामने | 98 |
---|---|
एकुण धावा | 1617 |
————————— | —– |
एकुण चैकार | 101 |
————————— | —– |
एकुण षट्कार | 46 |
————————— | —– |
एकुण शतकं | 0 |
————————— | —– |
एकुण अर्ध शतक | 2 |
आय पी एल करिअर । IPL Career
धोनी ने आयपीएल मध्ये पदार्पण २००८ साली केले. धोनी आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघातर्फे खेळतो. चेन्नई सुपरसुपर किंग्स साठी ५ वेळा आयपीएल चषक जिंकला आहे.
एमएस धोनीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आजपर्यंत 250 सामने खेळले आहेत आणि 39.09 च्या सरासरीने 5082 धावा केल्या आहेत. त्याने 24 अर्धशतकेही झळकावली आहेत, ज्यात त्याचा सर्वोच्च आयपीएल स्कोअर 84* धावा आहे. एमएस धोनीने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 349 चौकार आणि 239 षटकार मारले आहेत.
वैयक्तिक जीवन । Personal Life
धोनी ची साक्षी बरोबर भेट एका हॉटेल मध्ये झाली होती, ती भेट नंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्री प्रेमात बदल झाले. धोनीने 4 जुलै 2010 रोजी डेहराडूनमध्ये साक्षी सिंह रावतसोबत प्रेम विवाह केले. धोनी आणि त्याच्या पत्नीला झीवा ही मुलगी आहे. तो रांचीच्या बाहेर त्याच्या फार्महाऊसमध्ये राहतो. धोनीच्या कलेक्शनमध्ये अनेक बाईक आणि कार आहेत.
पुरस्कार
- MTV युथ आयकॉन ऑफ द इयर: 2006
- डी मॉन्टफोर्ट विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी: 2011
- CNN-न्यूज18 इंडियन ऑफ द इयर: 2011
- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार: 2008
- राष्ट्रीय पद्मश्री: 2009
- मानद लेफ्टनंट कर्नल, पॅराशूट रेजिमेंट ऑफ इंडियन टेरिटोरियल आर्मी: 2011
- कॅस्ट्रॉल इंडियन क्रिकेटर ऑफ द इयर: 2011
- आयसीसी पीपल्स चॉइस अवॉर्ड: 2013
- राष्ट्रीय पद्मभूषण: 2018
- ICC ODI प्लेयर ऑफ द इयर: 2008, 2009
- ICC पुरूषांचा ODI टीम ऑफ द इयर: 2006, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014 (2009, 2011-2014 मधला कर्णधार)
- ICC पुरुषांचा दशकातील एकदिवसीय संघ: 2011–2020 (कर्णधार आणि यष्टिरक्षक)
- ICC पुरुष T20I दशकातील संघ: 2011–2020 (कर्णधार आणि यष्टिरक्षक)
- ICC स्पिरिट ऑफ द दशकातील क्रिकेट पुरस्कार: 2011-2020
MI Xiaomi Beard Trimmer for Men 2C With High Precision Trimming | 2 Beard Comb | USB Type-C | Fast Charging | 0.5mm Precision | 40 Length Settings | 90 Min Run Time, Black
Conclusion – Mahendra Singh Dhoni Mahiti Marathi
धोनी ची कारकीर्द वाचून तुम्हाला कळलं असेल कि त्यांना “Captain Cool” का म्हटलं जातं. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला Mahendra Singh Dhoni Mahiti Marathi हि पोस्ट नक्कीच आवडली असेल.
धन्यवाद!
हे देखील वाचा
सचिन तेंडुलकर यांची संपूर्ण माहिती | Sachin Tendulkar Marathi Mahiti
2 thoughts on “महेंद्र सिंग धोनी संपूर्ण माहिती । Mahendra Singh Dhoni Mahiti Marathi”