Mahamrutyunjay Mantra Marathi | महामृत्युंजय मंत्र

महामृत्युंजय मंत्र, Mahamrutyunjay Mantra Marathi हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा मंत्र आहे. “महामृत्युंजय मंत्र जप” हा महादेवाला सहज प्रसन्न करण्याचा सोपा मार्ग आहे. महामृत्युंजय मंत्र हा श्री शिवशंकराचा महामंत्र आहे. खूप वर्षा पूर्वी वसिष्ठ ऋषींनी या मंत्राचा महिमा श्री मृतसंजीवन स्रोतात वर्णन केले आहे. संत गुरूंनी नेहमी उपदेशून सांगितले आहे की कलियुगात नामस्मरण हा एकमेव मार्ग आहे देवांना प्रसन्न करण्याचा. शिव भोलेनाथ हे एकमेव देवता आहेत, जे अगदी सहज भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करतात.

महामृत्युंजय मंत्र जाप करून शिव शंकराला प्रसन्न करू शकतो. ह्या मंत्राचा उपयोग मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी आणि आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी जपला जातो.

Mahamrutyunjay Mantra Marathi

“ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनं ।
उर्वारुकमिव् बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्”

महामृत्युंजय मंत्राचा अर्थ – हे त्रिनेत्रधारी परमेश्वरा, आम्हाला मृत्यूच्या पाशातून मुक्त करून शाश्वत जीवन प्रदान कर. ज्याप्रमाणे परिपक्व झालेली काकडी अलगद झाडावरून खाली पडते अगदी त्याप्रमाणेच आम्हाला या संसारातून मुक्त करून तुझ्या पावन चरणी अमरत्व प्राप्त व्हावे असा वरदान दे.

महामृत्युंजय मंत्राचा शब्दार्थ –

– सर्वशक्तिशाली देवतेचे प्रतीक आहे.
त्र्यंबकं – तीन नेत्रांचा, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा समावेश करणारा.
यजामहे – आम्ही पूजन करतो.
सुगन्धिम् – आमच्या जीवनात सुगंधी द्यावी म्हणजेच त्रासातून सुटका द्यावी.
पुष्टिवर्धनं – आम्हाला निरोगी जीवन देऊन त्यास पोषण द्यावे.
उर्वारुकमिव् – ज्याप्रमाणे परिपक्व झालेली काकडी झाडावरून अलगद खाली पडते.
बन्धनान्मृत्योर्मुक्षीय – त्याचप्रमाणे आम्हाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करून
मामृतात् – अमृतमय जीवन प्रदान करावे

Mahamrutyunjay Mantra Marathi PDF

महामृत्युंजय जप कुणी आणि केव्हा केले पाहिजे?

  • जन्मपत्रिकेत काळसर्प दोष योग असेल अशा वेळी महामृत्युंजय जप केले जाते.
  • जेव्हा घरात कुणी व्यक्ती सतत आजारी असेल आणि वारंवार औषधे घेऊन देखील ठीक होत नसेल अशा वेळी हा मंत्र जप केल्यास लाभ होतो.
  • जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत अल्प आयुष्य असेल.
  • वाईट रोगांपासून संरक्षण प्राप्त होण्यासाठी महामृत्युंजय जप केले जाते.
  • जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत अकाली मृत्यूचा योग असेल.
  • अपघातांपासून सुरक्षा हवी असेल.
  • जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत पितृदोष असेल.
  • ज्योतिष शास्त्रानुसार जन्म, दशा, अंतर्दशा, स्थूलदशा इत्यादींमध्ये ग्रहदोष होण्याचा योग असेल अशा वेळी हा जप करणे आवश्यक आहे.
  • जन्मकुंडलीमध्ये ग्रहांमुळे दोष दिसत असेल तेव्हा याचे वाईट परिणाम दूर व्हावे यासाठी महामृत्युंजय जप केले जाते.
  • वारंवार आर्थिक नुकसान होत असेल, कर्ज वाढत असेल..
  • लग्न जुळवताना पत्रिकेत षडाष्टक योग असेल.
  • जेव्हा मन धार्मिक कार्यात लागत नसेल.
  • कुटुंबामधील लोकांमध्ये विचारांचा एकमत होत नसेल अथवा छोट्या कारणांवरून भांडणे होत असतील.

महामृत्युंजय जप केल्याने काय लाभ होतात?

  • हा जप केल्यास आध्यात्मिक प्रगती प्राप्त होते.
  • रोज नित्य नियमाने हा जप केल्यास अपघात टळतात.
  • तुमच्या जीवनात कुठलेही कार्य सिद्ध होत नसेल तेव्हा जप केल्यास कार्यसिद्धी होऊन जीवनात सुलभता येते.
  • ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत ग्रह सुस्थितीत नसतील तेव्हा महामृत्युंजय जप केल्यास सर्व दोष दूर होतात.
  • सर्व तऱ्हेची नकारात्म ऊर्जा नष्ट होते.
  • महामृत्युंजय जप केल्याने त्यातून अनेक दिव्य अदृश्य लहरी प्रवाहित होतात ज्यात सर्व देवतांच्या शक्त्या असतात. ह्या शक्त्या शरीराभोवती एक कवच निर्माण करतात ज्यामुळे जपकर्त्याचे सर्व दुष्ट बाधांपासून रक्षण होते.
  • मनुष्य रोग मुक्त होतो.
  • जेव्हा मानसिक दडपण अथवा काल्पनिक भीती वाटत असेल तेव्हा महामृत्युंजय जप केल्यास त्वरित शांती लाभते.
  • जीवनातील आत्मविश्वास कमी होऊन नैराश्य येत असेल अशा वेळी महामृत्युंजय जप केल्याने अभिष्टसिद्धी प्राप्त होते.

Mahamrutyunjay Mantra महामृत्यूंजय मंत्र जप करताना काय काळजी घेतली पाहिजे?

  • महामृत्युंजय मंत्राचा जप हा मंदिरात शिवलिंगाच्या ठिकाणी केल्याने त्वरित लाभ देतो.
  • जो जप करणार आहे त्याने ब्रह्मचर्याचे पालन करावे. निर्व्यसनी राहूनच जप करावा अन्यथा त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात.
  • मंत्रजप करताना साधकाने आपले मुख पूर्व दिशेला ठेवावे.
  • मंत्रजप करण्याचे ठिकाण स्वच्छ, निर्मळ असावे. शिवलिंगाच्या ठिकाणी मंत्रजप केल्यास त्वरित फळ देतो.
  • मंत्रोच्चार शुद्ध असावा.
  • ब्रह्म मुहूर्तवर जेव्हा सुर्योदय झालेला नसतो आणि रात्र अस्ताला जाते त्यावेळी म्हणजेच पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान महामृत्यूंजय मंत्र म्हटल्यास खूप लाभदायक आहे
  • जलद गतीने अथवा खूपच हळूहळू मंत्र जप केल्यास लाभ होत नाही त्यामुळे साधकाने शांत मनाने मंत्र जप करावा
  • मंत्रजप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ असेल तर अधिक लाभ होतो; कारण शंकरांना रुद्राक्ष अतिप्रिय आहे. हि माळ सहजपणे उपलब्ध होते. हि माळ १०८ रुद्राक्षाची असल्यास अति उत्तम. गुरूंच्या सानिध्यात राहूनच मंत्र जप करण्याची विधी आत्मसात करावी.
  • मंत्रजप करताना गोमुखी (कापडी पिशवी) वापरावी जेणेकरून मंत्रजप करताना कुणी माळ पाहू नये.
  • एका व्यक्तीने एकच जपमाळ वापरावी, दुसऱ्या व्यक्तीची माळ वापरू नये.
  • मंत्रजप करताना मध्येच बोलू नये त्याने मंत्रजप खंडित होतो
  • जप पूर्ण झाल्यावर लगेच जागेवरून उठू नये. किमान ५-१० मिनिटे शांत बसावे
  • त्यानंतर शिवलिंगाला हात जोडावे मगच आसन सोडावे.

महामृत्युंजय मंत्र जपाची काय पद्धती आहे?

  • जपकर्त्याने शुचिर्भूत होऊन शिवलिंगासमोर बसावे.
  • जप सुरु करण्यापूर्वी महादेवाचे स्मरण करावे.
  • प्राणायाम करून जपाचा संकल्प घ्यावा.
  • विनियोग, न्यास, करन्यास, अंग न्यास इत्यादी करून जपाला सुरुवात करावी.
  • गोमुखींत रुद्राक्षमाळेने जपाची सुरुवात करावी.
  • शिवलिंगावर अभिषेक करावा.

Conclusion

आम्हाला आशा आहे कि Mahamrutyunjay Mantra Marathi | महामृत्युंजय मंत्र हि पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल.

धन्यवाद !

हे देखील वाचा

जय श्री हनुमान चालीसा । Shri Hanuman Chalisa Lyrics

2 thoughts on “Mahamrutyunjay Mantra Marathi | महामृत्युंजय मंत्र”

Leave a Comment