मित्रांनो आज आपण Lobhi kutra story in marathi ह्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. लहान मुलांना गोष्टी ऐकायला खूप आवडतात. मुले आपल्या आजी आजोबांच्या मागे गोष्टी सांगण्यासाठी लागत असतात.
आपले आजी आजोबा, आई वडील आपल्याला या गोष्टी का सांगतात बरं ?, कारण कि आपल्याला चांगलं आणि वाईट यांच्यातला फरक समजावा म्हणून. आपल्यामध्ये चांगले गुण येऊन, आपण एक चांगले विध्यार्थी, चांगले नागरिक बनू, या साठी गोष्टी सांगल्या जातात.
आज आम्ही घेऊन आलोय एक अशी गोष्ट, ज्या गोष्टीतून तुम्हाला काहीतरी चांगली शिकवण भेटेल. तर चला मग गोष्टींच्या दुनियेत.
Lobhi Kutra Story in Marathi
एका गावात एक कुत्रा राहत होता. एक दिवस तो कुत्रा अन्नाच्या शोधात गावात फिरत होता. त्याला खूप भूक लागली होती. असाच अन्न शोधत असताना त्याला रस्त्यात एक हाडाचा तुकडा भेटला. हाडाचा तुकडा बघून तो खूप खुश झाला आणि त्याने तो तुकडा लगेच तोंडात घेतलं आणि तो पुढे निघू लागला.
घरी परत येत असताना वाटेत एक पाण्याचा ओढा होता आणि त्या ओढ्यावर एक छोटासा पूल होतं. जसा तो कुत्रा ओढा ओलांडण्यासाठी त्या पुलावर गेला, त्याला एक विचित्र दृश्य दिसलं ओढ्याचा पाणी शांत असल्यामुळे त्याला पाण्यामध्ये एक आणखी दुसरा कुत्रा दिसला त्याच्या तोंडात पण हाडाचा तुकडा होता. खरं तर ती त्याचीच प्रतिमा त्याला पाण्यात दिसली.
त्याला वाटलं की हा कुत्रा त्याच्या तोंडातून हाड हिसकावून घेईल, मग त्याने विचार केला की आपणच ते हाड त्याच्या तोंडातून घेतलं तर, आपल्याकडे दोन हाड होतील. हे विचार करून त्याने त्या दुसऱ्या कुत्र्यावर भूंकण्यासाठी तोंड उघडले. त्याच वेळी त्याच्या तोंडातील हाड पाण्यात पडले.
दोन हाड मिळवण्याच्या लोभात कुत्र्याने त्याच्या तोंडातला पण हाड गमवून घेतला. आता त्या कुत्र्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काही उरलं नव्हतं, त्याला समजलं होतं की ती पाण्यात त्याचीच सावली होती.
तात्पर्य
कधीही अति लोभ करू नये, जे आहे त्याच्यातच समाधानी राहावं.
आम्हाला आशा आहे कि लोभी कुत्रा मराठी गोष्ट । Lobhi Kutra Story in Marathi हि गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हि गोष्ट तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगू शकता किंवा शेअर करू शकता.
धन्यवाद!
Einstein Box Ultimate Electricity Kit | Science Project Kit | Electronic Circuits | Toys for Kids Ages 7-14 Years
हे देखील वाचा
Marathi Story for kids | Marathi Short Stories | मराठी गोष्टी
अकबर बिरबल ची गोष्ट । Akbar Birbal Story in Marathi
श्रीसद्गुरुचरित्र – अध्याय चौदावा | SHRI GURUCHARITRA ADHYAY 14