छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी। Chhatrapati Shivaji Maharaj Biography Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Biography Marathi : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, जाणता राजा, मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती, आशा नाना बिरुदावल्यानी ज्यांचे चरीत्र सजले आहे, त्या महान मराठा राजाचे चरीत्र आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. भल्याभल्यांची भंबेरी उडवणारी छत्रपती शिवाजी महाराजांची छापामार रणनीती काय होती? त्यांचे पूर्वज कोण होते. महाराजांनी मराठा आरमार कसे उभे केले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण शोधणार आहोत, Chhatrapati Shivaji Maharaj Information in Marathi आजच्या लेखातून. चला तर सूरू करू या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरीत्र.

Chhatrapati Shivaji Maharaj Biography Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज

आईकडून जाधव

छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे घडले त्या राजमाता जिजाबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणामध्ये सिंदखेड राजा १२ जानेवारी १५९८ मध्ये झाला. त्यांच्या वडीलांचे नाव लखुजी जाधव आणि आई म्हासळाबाई जाधव होत. यांचे जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. नुकत्याच सिंदखेड राजा येथे लखुजी जाधव यांच्या समाधीजवळ उत्खननात सापडलेल्या विष्णू मुर्तीमुळे या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे.

लखुजी जाधव हे निजामशहीत मोठे सरदार होते.

वडिलांकडून भोसले

सन १६०९ साली जिजामाता यांचा विवाह भोसले घराण्यातील मलोजी राजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांच्याशी झाला होता. भोसले घराणे हे मूळचे राजस्थानचे सिसोदिया राजपूत घराणे असल्याचा दावा अनेक इतिहासकार करतात तर काही इतिहासकार भोसले घराणे हे मूळ कर्नाटकातील हौसाल घराणे असल्याचा दावा करतात.

शहाजीराजे हेही त्यावेळी निजामशाहीतील प्रमुख सेनापती होते. त्यांच्या आयुष्याचा बराच काळ हा निजाम, मोगल आणि आदिलशाहा यांच्या सेवेत गेला. तरीही त्यांनी स्वराज्याचे स्वप्न उरी बाळगले होते. ते पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुर्ण केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर नजिक शिवनेरी किल्ल्यावर झाला. १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचा दावा काही इतिहासकार करीत असले तरी त्यांच्या जन्मदिनाविषयी वाद अजूनही कायम आहेत. म्हणुन तर महाराष्ट्रात सुध्दा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दोन वेगवेगळया तारखांना साजरी केली जाते.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ ,शुक्रवार, दिनांक १९ फेब्रुवारी १६३०ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली व त्यानुसार शिवजयंतीची शासकीय सुट्टी जाहीर केली. इतर तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ , वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया ही एक जन्मतारीख मानली जात होती.

शिवाजी महाराजांचे नाव शिवनेरी किल्ल्यावर आसलेल्या शिवाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आले अशी अख्यायिका सांगितली जाते. राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी शिवाई देवीला पूत्र प्राप्तीसाठी नवस बोलला होता असेही सांगीतले जाते.

शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे जहागीर कायम आपल्या ताब्यात ठेवली. त्यामूळेच महाराजांच्या जन्माच्या वेळी शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरी गडावर ठेवले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj बालपण

शिवरायांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर झाला. चार महिन्यांनंतर शहाजी महाराजांनी आपल्या पुत्राचे मुख पाहिले. त्यानंतर जवळपास दीड वर्ष शहाजी राजे शिवनेरीवरच होते.

सन १६३२ ते १६३६ या काळात शहाजी महाराज आणि संभाजी राजे मोगलांशी लढण्यात मग्न होते. लढाईची अखण्ड धामधूम सुरू होती. १६३६ साली निजामशाही बुडाल्यावर शहाजीराजे आदिलशहाकडे बारा हजारी ‘फर्जंद’ वजीर म्हणून गेले तेव्हा शहाजी राज्यांनी बाल शिवाजी आणि जिजाऊना खेड शिवापूरला पाठविले. तिथे त्यांचा वर्षभर मुक्काम होता. पुढे १६३७ साली जिजाऊ बालशिवाजीसह कर्नाटकात शहाजी राजांकडे गेल्या.

कर्नाटकात कंपिली या ठिकाणी शहाजी राज्यांच्या सोबत सन १६३७ ते सन १६४२ असे सलग पाच वर्षे बाल शिवाजी आणि जिजाऊ हे तिथेच होते. तिथे शिवाजीराजे अक्षर ओळख व जुजबी गणित शिकले. शिवाजी महाराजानी तलवारबाजी, घोडेस्वारी , युद्ध कौशल्य, राजकारण व प्रशासनाचे धडे आपल्या वडिलांकडून व गुरूंकडून घेतले. सन १६४० च्या अखेरीस शिवाजी महाराजांचे लग्न निंबाळकर पवारांच्या ‘जिऊबाई’ नावाच्या मुलीशी झाले. तिचे सासरचे नाव ‘सईबाई’ असे ठेवले.

१६४२ साली शाहजी राजांनी शिवाजी राज्यांना शिक्का व झेंड्यासोबत पेशवे, मुजुमदार, सबनीस व सैन्यासह पुणे प्रांती रवाना केले. अवघ्या बाराव्या वर्षी शिवाजी राज्यांना स्वतंत्र वाटचाल करावी लागली. अर्थात राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते.

शिवाजी महाराजांचे पहिले लग्न

१६ मे १६४० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले लग्न फलटणच्या निंबाळकर घराण्यातील मुधोजीराव नाईक निंबाळकर यांची मुलगी सईबाई याच्याशी झाले. हे तंजावरच्या पवार कुळातील घराणे होय. हा विवाह सोहळा पुण्यातील लाल महालात पार पडला होता. या समई महाराज अकरा वर्षाचे तर सईबाई सात वर्षाच्या होत्या. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी १४ मे १६५७ रोजी संभाजी महाराजांना जन्म दिला. त्यानंतर सईबाईंची तब्येत खालावली. संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना ५ सप्टेंबर १६५९ रोजी महाराणी सईबाईं यांचा मृत्यू झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या व मुलांची नावे

छत्रपती शिवाजी महाराजांची एकूण आठ लग्ने झाली होती. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, गुणवंतीबाई अशी त्यांच्या सर्व राण्यांची नावे होती.

तसेच छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती राजारामराजे भोसले, सखूबाई, राणूबाई, अंबिकाबाई, राजकुवरबाई, दीपाबाई, कमळाबाई अशी त्यांच्या मुलांची नावे होत.

स्वराज्य स्थापनेची शपथ

छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी बालवयापासून राजकारण आणि रजसत्तेसठी चाललेला संघर्ष पहिला होता. पण ज्यांच्या हातात सत्ता होती त्यापैकी कुणीही इथल्या मातीतील नव्हते. हे सर्व बाहेरून आलेले लोक आपल्या मातीतील शुर सरदारांना हाताशी धरून इथल्या लोकांचे राज्य बुडवून जुलमी राजसत्ता उपभोगीत होते. मोगल आणि इतर पटशाह्या रयतेवर जुलूम करीत होत्या. त्यामुळे रयतेच्या हिताचे राज्य निर्माण करायचे असल्यास इथल्या मातीतून जन्माला आलेला राजा सत्तेवर बसणे आवश्यक होते. या लेखात आपण आधीच बघितले आहे की राजमाता जिजाबाई या देवगिरीच्या यादवांच्या घराण्यातील.

ते राज्यही परकीय आक्रमकांनी बुडवले होते. शाहजी राजे हे कर्नाटकच्या हौसाल राजघराण्यातील. त्यामुळे आपले राज्य परत निर्माण करावे आणि रयतेच्या हिताचे, रयतेच्या सुखाचे राज्य निर्माण करायचे या ध्येयाने प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात २७ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली. शिवरायांनी कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडी यांच्या साथीने स्वराज्याची शपथ घेतली.

रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात.

स्वराज्याचे तोरण, तोरणा किल्ला

ज्याच्या ताब्यात गड कोट त्याचे राज्य हे सूत्र शिवजी महाराजांनी ओळखले होते. त्यामुळे स्वराज्य स्थापन करायचे तर आपल्या ताब्यात जास्तीतजास्त किल्ले असणे आवश्यक आहे हे जाणुन १७४७ साली तोरणा किल्ला ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यानंतर सर्वात आधी तोरणा किल्ला ताब्यात घेतला. हा किल्ला ताब्यात घेऊन महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. किल्ल्याची पाहणी करताना गडाचा प्रचंड विस्तार पाहून महाराजांनी या किल्ल्याचे नाव प्रचंडगड ठेवले. या किल्ल्याची डागडुजी करताना गडावर सापडलेल्या धनाचा उपयोग महाराजानी राजगडाच्या बांधणीसाठी केला.

येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा.

इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व गडावर काही इमारती बांधल्या.

तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल गड आहे. वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी तर उत्तरेला कानद नदी आहे.

अफजल खानाचा कोथळा काढला

स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली आणि महाराजांनी जास्तीतजास्त मुलुख आपल्या ताब्यात घेण्यास सुरवात केली. अनेक लहानमोठ्या शत्रूंचा पुरता बंदोबस्त केला. चंद्रराव मोरेंचा पराभव करून जावळीचे खोरे त्याब्यात घेतले.

अशात दिल्लीच्या मोगलांनी शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहवर दबाव टाकला. आदिलशहाने शिवजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अफझल खानाची निवड केली. अफझल खान हा भोसले घराण्याचा वैरीच होता. त्याने शहाजी महाराजांना अटक केले होते. शिवाजी महाराजांचे भाऊ संभाजी महाराजाना कर्नाटकच्या लढाईत ठार केले होते. तोच अफझल खान शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी मराठी मुलुखात येणार होता.

खानाजवळ बारा हजार घोडदळ , दहा हजार पायदळ होते. ७५ मोठ्या तोफा आणि ४५० पहाडी तोफा होत्या. खानाने मराठी मुलुखात उपद्रव करण्यास सुरवात केली.

शिवाजी महाराजांच्या वकिलांमध्ये आणि खानाच्या वकिलांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा शिवाजी महाराज आणि अफझल खान यांनी प्रत्यक्ष भेटून यावर तोडगा काढावा असे दोन्ही पक्षांचे ठरले.

प्रतापगडाच्या पायथ्याशी, माचीवर शामियाना उभारून त्या ठिकाणी दोघांनी भेट घेण्याचे ठरले. दोघांसोबत प्रत्येकी दोन सेवक आणि काही अंतरावर १० अंगरक्षक राहतील असे ठरले.

शिवाजी महाराजांनी आपल्या संरक्षणासाठी चिलखत आणि शिरस्त्राण घातले होते. सोबत जीवा महाला आणि संभाजी कावजी हे दोन अंगरक्षक होते. खानासोबत सय्यद बंडा होता. शिवाजी महाराजांनी त्याच्यावर हरकत घेत त्याला मंडपाबाहेर जाण्यास भाग पाडले.

शिवाजी महाराज आणि अफझल खान समोरासमोर आले तेव्हा शिवाजी महाराजांना अलिंगन देण्यासाठी खानाने हात पसरले आणि त्यांचे मस्तक काखेत दाबून त्यांच्यावर खंजिराने वार केला. पण शिवाजी महाराजांनी चिलखत घातलेली असल्यामुळे बचावले. खानाचा डाव लक्षात येताच महाराजानी वाघनखे काढून खानाच्या पोटात घुसवली. ” दगा दगा..” असे ओरडत खान खाली कोसळला तेव्हा सय्यद बंडा महाराजांच्या अंगावर धावून आला. जीवा महालेनी तलवारीच्या एकाच वाराने सय्यद बंडाने महाराजांवर उगारलेला हात तलवारी सकट उडवला. ईकडे खानाचा वकील कृष्णाजी भास्कर महाराजांच्या अंगावर धावून येताच महाराजानी त्याला कापून काढले.

अशा रीतीने दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी स्वराज्य निर्मितीच्या इतिहासातील सोनेरी पान शिवाजी लिहिले. महाराष्ट्रात हा दिवस शिव प्रताप दिन म्हणुन साजरा केला जातो.

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड .

रायरी किल्ला जावळीचा राजा चंद्रराव मोरे याच्या ताब्यात होता. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरेंचा पुरता पराभव करून रायरी हा किल्ला ताब्यात घेतला .

घाट व कोकण अशा दोन्ही भुभागाच्या मध्यावर असलेल्या या किल्ल्याचे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्व लक्षात घेऊन राजांनी येथेच राजधानी करण्याचे योजिले.

महाराजांचे विश्वासू सहकारी, मुख्य वास्तुविशारद व कुशल अभियंता हिरोजी इंदुलकर यांनी किल्ल्याचे बांधकाम केले. इतका प्रचंड किल्ला बांधताना त्यांना रक्कम कमी पडली तेव्हा त्यांनी आपले घर गहाण ठेवले. कारण तेव्हा शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते. पण निधीच्या अभावी स्वराज्याचे काम थांबता कामा नये ही राज्यांची शिकवण स्वराज्याच्या प्रतेक शिलेदारांच्या अंगी चांगलीच भिणली होती.

महाराज जेव्हा रायगडावर परतले आणि हिरोजींनी केलेले अद्भूत कार्य आणि त्याग पहिला तेव्हा त्यांनी भारावून जाऊन हिरोजींना विचारले, ” हिरोजी आम्ही तुम्हाला काय बक्षीस देऊ ?” तेव्हा हिरोजींनी विनंती केली की जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावरील एका दगडावर सेवकाचे नाव कोरले जावे जेणेकरून महाराज जेव्हा जेव्हा या मंदिराला भेट देतील तेव्हा त्यांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागेल. महाराजांनी हिरोजींची इच्छा पुर्ण केली.

पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील महाड शहराच्या उत्तरेस २५ किमी अंतरावर असलेल्या पाचाड गावाच्या उंच डोंगरावर हा किल्ला स्थित आहे. या किल्ल्याच्या नावावरून जिल्ह्याचे नाव रायगड ठेवले आहे.

आगऱ्याहून सुटका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्वाच्या घटना म्हणुन ज्यांच्याकडे पाहीले जाते त्या पैकी खुप महत्वाची घटना म्हणजे महाराजांची आग्र्याहून सुटका.

पुरंदरच्या तहात ठरल्या प्रमाणे ५ मार्च १६६६ रोजी

शिवाजी महाराजांनी आपल्या आई जिजाबाई यांच्याकडे राज्याची सूत्रं सोपवली आणि आग्र्याला जाण्यासाठी निघाले.

जयसिंहांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील संरक्षणाची जबाबदारी आपला मुलगा कुमार रामसिंहला दिली.

९ में १६६६ रोजी शिवाजी महाराज आग्र्याच्या बाहेरच्या परिसरात पोहोचले होते. १२ मे रोजी त्यांची औरंगजेबाशी भेट ठरवण्यात आली. परंतू औरंगजेबाच्या दरबारात मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल महाराजानी दरबाराचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे त्यांना आगऱ्यात नजरकैदेत ठेवण्यात आले.

तेथून सुटका करून घेण्यासाठी महाराजांनी आजारी असल्याची बतावणी करीत फकीर व सन्यासी यांना फळे पाठवण्याची परवानगी मागीतली. मोगल दरबाराची परवानगी मिळताच महाराजांच्या निवसातून रोज फळे व मिठाईचे पेटारे बाहेर जाऊ लागले. सुरवातीला पहाऱ्यावरील शिपाई पेटारे उघडून तपासणी करून पेटारे पुढे पाठवीत. नंतर मात्र पेटारे न तपासता पुढे जाऊ लागले. याच संधीची वाट पाहत महाराज थांबले होते.

१९ ऑगस्ट १६६६ रोजी बाहेर तैनात असलेल्या सैनिकांना महाराजानी संदेश पाठवला. ” आपण फार आजारी असून अंथरुणात पडून आहोत. आपल्या आरामात अडथळा आणू नये आणि कोणालाही आत पाठवू नये .”

महाराज व शंभू राजे मिठाईच्या पेटाऱ्यात बसून बाहेर पडले. त्यावेळी त्यांचे कपडे, मोत्याचा हार वगैरे घालून हिरोजी फर्जंद त्यांच्या जागेवर झोपले. सगळं शरीर पांघरुणाने झाकून घेतलं. फक्त एक हात बाहेर ठेवला होता. त्या हातात त्यांनी शिवाजी महाराजांचं सोन्याचं कडं घातलं होतं.

पेटारे शहराच्या एकाकी भागात आले. तिथं पेटारे वाहून नेणाऱ्या मजुरांना परत पाठवलं. शिवाजीराजे आणि संभाजीराजे आग्र्यापासून सहा मैल दूर एका गावात पोहोचले. तिथं त्यांचे मुख्य न्यायाधीश निराजी रावजी त्यांची वाट पाहात होते.

शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात येण्यासाठी अत्यंत हुशारीने उलट रस्ता निवडला. वायव्येस माळवा-खानदेशातून जाण्याऐवजी त्यांनी पूर्वेचा रस्ता निवडला. मथुरा, अलाहाबाद, बनारस, पुरी अशा मार्गाने ते गोंडवाना आणि गोवळकोंडा पार करुन राजगडावर आले.

या घटनेने स्वराज्यावर आलेले मोठे संकट टळले होते.

आरमाराची स्थापना

शिवरायांनी आरमाराची स्थापना केली तो दिवस म्हणजे २४ ऑक्टोबर, १६५६ . आश्विन वद्य द्वादशी अर्थात वसुबारस शके १५७९.

हिंदवी स्वराज्याचा विस्तार करणे व ते सुरक्षीत राखणे या साठी

स्वतःचे सामर्थ्यशाली आरमार हवे. हे शिवजी महाराजांनी ओळखले. त्याचबरोबर बळकट जलदुर्ग असलेच पाहिजेत. कारण आज व्यापारी म्हणुन आलेले इंग्रज डच फ्रेंच पोर्तगीज इथल्या राजकारणात ढवळाढवळ करू पाहात होते. शिवाय जंजिऱ्याचा सिद्दी सुध्दा वरचढ होऊ पाहत होता.

आरमार उभे करायचे, तर बंदर आणि गोद्या हव्यात. १६५६ साल पासून शिवरायांनी आरमाराच्या उभारणीला प्रारंभ केला. त्यांनी सिंधुदुर्ग, खांदेरी यांसारखे किल्ले उभे केले. विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यांसारखे बळकट किल्ले कोकणच्या किनार्‍यावर उभे करून अशा किल्ल्यांची माळ निर्माण केली. १६५६ मध्ये कल्याण आणि भिवंडीवर भगवा डौलाने फडकला तेव्हा शिवरायांनी कल्याणला लढाऊ नौका बांधण्याच्या कार्याला आरंभ केला. विजयदुर्गाजवळ गड नदीच्या खाडीत जहाज बांधणी, जहाज दुरूस्तीसाठी गोद्या बांधल्या.

महानायक भंडारी, कान्होजी आंग्रे, धुळप अशी अनेक निष्ठावान मंडळी समर्थपणे आरमाराची धुरा सांभाळन्यास तयात झाले. शिवरायांनी स्वराज्याच्या आरमारात गुराबा, तरांडी, गलबते, महागिर्‍या खोड्या, मचवे, पगार, तिरकटी, पाल अशा विविध प्रकारच्या नौका समाविष्ट झाल्या. त्यांची एकूण संख्या ७०० पर्यंत पोहोचली.

Chhatrapati Shivaji Maharaj राज्याभिषेक

Chhatrapati Shivaji Maharaj Biography Marathi

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्वाची घटना आहे . महाराजानी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला.

राज्याभिषेक करून शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली. राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला. युवराज म्हणुन संभाजी राजांच्या अभिषेकने राज्यांच्या उत्तराधिकाराचा प्रश्न निकाली निघाला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू

१६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या ६ वर्षात छत्रपती शिवाजी महाराज हे जग सोडुन गेले. ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज निधन पावले. त्यांच्या मृत्युच्या कारणांवर इतिहासकारांचे एकमत होत नसले तरी हा महान राजा, जाणता राजा निधन पावला होता ही अत्यंत दुःखद ऐतिहासिक घटना होती. आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात महान साम्राज्य निर्माण करणारा महाराजा छत्रपती शिवाजी महाराज हे जग सोडुन गेले होते. एका झंझावाताचा प्रवास थांबला होता.

Conclusion – Chhatrapati Shivaji Maharaj Biography Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या महान राजांची महती एका लेखात माववण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संपूर्ण भूमंडळ कागदाच्या पुडीत बांधण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. ते केवळ अशक्य आहे.

तरीहि आम्ही शक्य होईल तेवढी महिती या छोट्याश्या लेखात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा लेख छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी। Chhatrapati Shivaji Maharaj Biography MarathiInformation about chhatrapati shivaji maharaj in marathi आपणास कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. लेख आवडला असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. तुम्हाला अजुन काय वाचायला आवडेल ते आम्हाला सांगा.

शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष होणे आवश्यक आहे.

बोला छत्रपती शिवाजी महाराज की… जय!

हे देखील वाचा छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण माहिती । Chhatrapati Sambhaji Maharaj Marathi Mahiti

Leave a Comment