बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा संदेश | Buddha Purnima Wishes in Marathi Text 2024

मित्रांनो , बुद्ध पौर्णिमा, Buddha Purnima Wishes in Marathi Text ज्याला बुद्ध जयंती किंवा वेसाक असेही म्हणतात, हा बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. हे सिद्धार्थ गौतमाच्या जन्म, ज्ञानप्राप्ती आणि मृत्यू (निर्वाण) चे स्मरण करून देते, ज्यांना नंतर भगवान गौतम बुद्ध म्हणून ओळखले जायला लागले.

बुद्ध पौर्णिमा हा बौद्धांसाठी चिंतन, ध्यान आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. गौतम बुद्धांच्या शिकवणींचे स्मरण आणि सन्मान करण्याची ही वेळ असते, जी आत्मज्ञान, आंतरिक शांती आणि दुःख दूर करण्याच्या मार्गावर जोर देते.

जगभरातील सर्व बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात बुद्धपौर्णिमा साजरी करतात. भारताप्रमाणेच श्रीलंका, नेपाळ, तिबेट, बांग्लादेश, भूतान या देशांमध्ये अनेक बौद्ध धर्मीय आहेत. हा दिवस अनेक राष्ट्रांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशावर बौद्ध धर्माच्या खोल प्रभावाची आठवण करून देतो. या दिवशी भगवान बुद्धांचे आर्शीवाद घेतेले जातात आणि समाजकार्याची कामे केली जातात.

बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा संदेश | Buddha Purnima Wishes in Marathi Text

buddha purnima (1)

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बुध्दं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि

अवघ्या जगाला शांततेचा
संदेश देणारे दया, क्षमा,
 शांतीची शिकवण देणारे
भगवान गौतम बुद्ध पैर्णिमा
निमित्त मंगलमय शुभेच्छा

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
महाल सुख सोडूनी घातला
भिक्षुकाचा वेश
नाकारले राजपुत्र असून युद्ध
असे होते तथागत गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा

सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य
उज्वल करु शकतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

जगाला युद्ध नको,
बुद्ध हवा बुद्ध पौणिमेच्या सर्व नागरिकांना
मनःपूर्वक शुभेच्छा

क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचारने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते..
बुद्ध पौर्णिमा निमित्त,
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

वाईटाने वाईटाचा नाश कधीच होत नाही,
तिरस्कार फक्त प्रेमानेच संपवता येतो
हेच एक अतूट सत्य आहे….
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमा निमित्त
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा

buddha purnima 1

पंचशील – बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली

१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

२) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

३) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी’
अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

५) सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

बुद्ध पौर्णिमेसाठी सुविचार । Buddha Purnima Quotes In Marathi

तुम्हाला तुमच्या क्रोधासाठी शिक्षा मिळत नाही
याउलट तुम्हाला क्रोधापासूनच शिक्षा मिळते
-भगवान गौतम बुद्ध

तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही
त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात
– भगवान गौतम बुद्ध

जे स्वतः बलवान असूनही
दुसऱ्यांचे अपराध सहन करतात
त्यांनाच क्षमाशील म्हणतात
– भगवान गौतम बुद्ध

जगात तीन गोष्टी कधीही
लपवल्या जात नाहीत
सूर्य, चंद्र आणि सत्य
– भगवान गौतम बुद्ध

आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही,
आनंदी राहणे हाच सुखी होण्याचा मार्ग आहे
– भगवान गौतम बुद्ध

आम्हाला आशा आहे की तुम्हाला  बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा संदेश, बुद्ध पौर्णिमा मराठी स्टेटस, बुद्ध पौर्णिमा मराठी सुविचार | Buddha Purnima Wishes in Marathi Text , Buddha Purnima Quotes In Marathi  हे नक्कीच आवडले असेल आवडले असतील आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.

धन्यवाद !

हे देखील वाचा Best 10+Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी Quotes मराठी मध्ये

NEW YEAR WISHES IN MARATHI | HAPPY NEW YEAR WISHES IN MARATHI 

1 thought on “बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा संदेश | Buddha Purnima Wishes in Marathi Text 2024”

Leave a Comment