मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला Sachin Tendulkar Marathi Mahiti या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. सचिन म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे सचिन. क्रिकेटच्या इतिहासा मधला एक उत्कृष्ट फलंदाज म्हणजेच आपला सचिन. भारतीय क्रिकेटमधील एक काळ असा होता की क्रिकेट मॅच मध्ये सचिन आऊट झाला की सगळे ती मॅच बघायचे सोडून द्यायचे. सचिनने खूप विश्वविक्रम बनवले आहेत, खूप मॅचेस भारतासाठी जिंकून दिले आहेत, खूप रन्स केलेत.
या लेखात आम्ही सचिन तेंडुलकरच्या लहानपणापासून ते क्रिकेटमधून निवृत्त झाल्या परत ची सर्व माहिती देणार आहोत.
प्रारंभिक जीवन आणि पार्श्वभूमी | Early Life – Sachin Tendulkar Information in Marathi
सचिनचा जन्म दादरच्या निर्मल नर्सिंग होम मुंबईमध्ये 24 एप्रिल 1973 मध्ये एका मध्यमवर्ग महाराष्ट्रीयन परिवारामध्ये झाला. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे एक मराठी लेखक व कवी होते आणि त्यांची आई रजनी तेंडुलकर एका इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत असत. सचिनला दोन मोठे भाऊ नितीन आणि अजित, व मोठी बहीण सविता, हे तिघे सचिनच्या वडिलांच्या पहिल्या बायकोची मुलं. सचिनच्या वडिलांनी सचिनचे नाव त्यांच्या आवडत्या संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांच्या वरून ठेवले होते.
सचिनचा भाऊ अजित हे कंगा क्रिकेट लीग तर्फे क्रिकेट खेळायचे. सचिनचे बालपण बांद्रा ईस्ट च्या साहित्य सहवास हाऊसिंग सोसायटी मध्येच गेला. सचिनची पहिली शाळा Indian Education Society’s न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा ईस्ट. शाळेमध्ये सचिनला खूप चिडवायची यामुळे तो रोज शाळेमधून भांडण करून यायचं. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की सचिनचे आवडते खेळ क्रिकेट नव्हते टेनिस होते. सचिनला लहानपणी टेनिस खूप आवडायचे. त्या वेळचे टेनिस क्रिकेट प्लेयर जॉन मॅकेनरो हे त्यांचे आयडॉल होते.
टेनिस बद्दल अवॉर्ड दाखवण्यासाठी ते नेहमी हातात रिस्टबँड, हातात रॅकेट आणि लांब केस वाढवले होते, तेव्हा ते सात की आठ वर्षाचे होते. नंतर शाळेत चिडवण्याचे प्रकार वाढत गेल्यामुळे सचिनचे भाऊ अजित तेंडुलकरने सचिनला क्रिकेट ट्रेनिंगला टाकण्याचे निर्णय घेतले. 1984 साली , शिवाजी पार्क येथे त्यांनी सचिनला क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांच्याशी भेट करून दिली. सचिन शिवाजी पार्क येथे सकाळी आणि संध्याकाळी, आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सराव करत असे.
सचिन तेंडुलकरच्या शाळेपासून शिवाजी पार्क खूप लांब होतो त्याचा अर्धवेल येण्या जाण्यात जात असे, म्हणून रमाकांत आचरेकर सरांनी सचिनची शाळा बदलण्याचा सल्ला दिला. सचिनला शिवाजी पार्क जवळच शारदाश्रम शाळेमध्ये प्रवेश करून दिले गेले. सचिनचे काका काकू शिवाजी पार्क जवळच राहत असेल म्हणून सचिन त्यांच्याकडे राहायला गेला.
साल 1984 मध्ये शारदाश्रम शाळेमध्ये सचिनचा क्रिकेटर म्हणून पदार्थ झाले. त्याच वर्षी सचिनने क्लब क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्यांनी कांगा क्रिकेट क्लब तर्फे खेळायला सुरुवात केली. सन 1988 च्या सुरुवातीला सचिनला क्रिकेट क्लब ऑफ इंडिया तर्फे खेळायला भेटले.
1988 मध्ये शारदाश्रम काळे तर्फे इंटर स्कूल स्पर्धा सेंट झेवियर्स च्या विरुद्ध खेळत असताना, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी 664 धावांची भागीदारी करून विश्वविक्रम नोंदवला होता. या मॅच मध्ये सचिनने 326 धावा नोट आउट काढल्या आणि पूर्ण स्पर्धेत 1000 धावा काढल्या होत्या.
करिअरची सुरुवात | Early Career – Sachin Tendulkar Marathi Mahiti
वयाच्या चौदाव्या वर्षी 14 नोव्हेंबर 1987 मध्ये रणजी ट्रॉफी साठी सचिनचे मुंबईच्या संघामध्ये निवड करण्यात आली, पण 11 खेळाडूच्या लिस्टमध्ये सचिनला स्थान दिले गेले नाही. एक वर्षानंतर 11 डिसेंबर 1988 मध्ये मुंबईच्या संघातर्फे गुजरात च्या विरुद्ध वानखडे स्टेडियम मध्ये सचिनने नाबाद 100 धावा केल्या, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण सामन्यात शंभर धावा काढणारा सर्वात युवा खेळाडू म्हणून सचिनला मान भेटला.
भारतातील स्पर्धा दुलीप आणि देवधर ट्रॉफी मध्ये सचिनने शतके जडली होती. साल 1988 मधील रणजी ट्रॉफी, मुंबईतर्फे सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज सचिन ठरला होता.
करिअर | Career
प्रथम श्रेणी स्पर्धेमध्ये व क्लब मॅचेस मध्ये सचिन उत्कृष्ट कामगिरी करत होता. या कामगिरीच्या जोरावर त्याला जागतिक क्रिकेट स्पर्धेमध्ये भेटायलाच होत आणि ते भेटलं. आता सचिनची खरी खेळी सुरू झाली होती. पुढे आपण बघूया सचिनचा जागतिक क्रिकेटमध्ये पदार्पण, टेस्ट करिअर मध्ये परफॉर्मन्स, वन डे मधील परफॉर्मन्स इत्यादी.
जागतिक क्रिकेट पदार्पण | International Cricket Entry
सचिनचं जागतिक क्रिकेटमध्ये पदर पदार्पणाचा श्रेय जातं ते राजसिंग डुंगरपुरांना, 1989 च्या शेवटी सचिनचे पाकिस्तान विरुद्ध च्या स्पर्धेमध्ये सिलेक्शन झालं होतं. पाकिस्तान दौऱ्या अगोदर सिलेक्शन कमिटी सचिनला वेस्टइंडीज दौऱ्यासाठी सिलेक्ट करण्याचे विचार करत होते, पण शेवटी ते कॅन्सल करण्यात आले.
सचिन तेंडुलकर भारतातर्फे टेस्ट क्रिकेट खेळणारा सर्वात युवा खेळाडू ठरला होता, सचिन पहिली टेस्ट खेळला तेव्हा त्याचे वय 16 वर्ष 205 दिवस होते. भारतातर्फे वनडे क्रिकेट खेळणारा सर्वात खेळाडू पण सचिनच ठरला होता, सचिनने पहिली वन डे मॅच खेळली होती तेव्हा त्याचे वय १६ वर्ष 232 दिवस होते.
सचिन पहिली टेस्ट पाकिस्तान विरुद्ध खेळला होता त्या मॅच मध्ये त्यांनी 15 धावा काढल्या, त्यानंतर सचिनला वकार युनिस याने त्रिफलाचीत बात केले होते. या सिरीज मध्ये चौथ्या टेस्टमध्ये, वकार युनिस च्या एका बाऊन्सर बोलला खेळताना सचिनच्या नाकाला चेंडू लागल्याने सचिन पुन्हा रक्तबंबाळ झाला होता. एवढं लागला असताना सचिनने मेडिकल ट्रीटमेंट नाकारले होते आणि ती मॅच पूर्ण खेळला होता. पेशावर मध्ये वीस षटकांचे एक्जीबिशन मॅच खेळवण्यात आले होते त्या मॅच मध्ये सचिनने 18 चेंडू मध्ये 53 धावा केल्या होत्या, लेग स्पिनर अब्दुल कादिर च्या एका षटकांमध्ये त्यांनी 27 धावा ठोकल्या होत्या.
पाकिस्तान सिरीज नंतर लगेच न्यूझीलंड दौरा झाला होता त्यामध्ये सचिनने 117 धावा काढल्या होत्या. अशा प्रकारे सचिनने जागतिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
टेस्ट करिअर | Sachin Test Career
1989 मध्ये पाकिस्तान विरुद्ध सचिन ने टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. त्यानंतर 1990 इंग्लंड दौऱ्यावर, 14 ऑगस्ट ला ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टर मध्ये, दुसऱ्या टेस्टमध्ये सचिनने त्याचे पहिले शतक 119 धावा काढल्या होत्या, टेस्ट क्रिकेट मध्ये शतक करणारा सचिन दुसरा सर्वात यंग क्रिकेटर ठरला होता.
1992 वर्ल्ड कप च्या अगोदर 1991- 92 भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्या मध्ये सचिनने तिसऱ्या टेस्टमध्ये नाबार्ड 148 धावा काढल्या होत्या. ऑस्ट्रेलिया मध्ये शतक करणारा सचिन पहिला यंग क्रिकेटर ठरला होता. त्यानंतर फायनल टेस्टमध्ये सचिनने 114 धावा काढल्या होत्या, ही पीच खूप बाऊंसी होती, तरीही सचिनने ऑस्ट्रेलियाचे सर्व वेगवान गोलंदाजांना खेळला होता.
1998 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलिया भारता च्या दौऱ्यावर आला होता, त्या टेस्ट सिरीज मध्ये सचिन ने तीन शतके ठोकली होती. या टेस्ट सिरीज मध्ये शेन वॉर्न ला सळो कि पळो करून ठेवलं होतं.
1999 मध्ये भारत पाकिस्तान आणि श्रीलंका मध्ये एशियन टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा खेळवण्यात आली होती. या स्पर्धेच्या भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच मध्ये शोहेब अख्तर ने सचिनला लवकर बाद केलं होतं, तेव्हा दहा हजार प्रेक्षकांनी पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांवर बाटल्या व दगड फेकली होती, सचिन तेंडुलकर आणि आयसीसी अध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर मॅच पुन्हा सुरू झाली होती पण त्यानंतर मॅचला फक्त दोनशे लोक उरली होती.
2001 च्या भारतीय साऊथ आफ्रिका दौऱ्या दरम्यान दुसऱ्या टेस्ट मध्ये रेफ्री माईक डॅनेस यांनी चार खेळाडूंवर अति अपील करण्या है तू फाईन लावले होते. याच माइक डॅनेस या दौऱ्या दरम्यान सचिन वर बॉल टेम्परिंग केल्याबद्दल एक मॅच चे सस्पेन्शन केले होते. पण सचिन बोल टेम्परिंग न करता फक्त चेंडूला पॉलिश करत होता, हे सिद्ध झाले होते.
2001 मध्ये कलकत्ता टेस्ट मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सचिन तीन विकेट घेऊन मॅच जिंकून दिली होती.
2002 मधील वेस्टइंडीज दौऱ्यावर सचिन दुसऱ्या टेस्ट मध्ये 117 धावा केल्या होत्या, या 29 व्या शतकाने सचिनने डॉन ब्रॅडमनच्या 29 शतकांची बरोबरी केली होती. या मॅच नंतर या खेळीसाठी मायकल शुमेकर यांनी सचिनला फरारी गिफ्ट दिली होती.
2004 मधील भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्या मध्ये सचिनने एका मॅच मध्ये 241 धावा काढल्या होत्या व दुसऱ्या इनिंगमध्ये 60 धावा केल्या होत्या. पण या टेस्ट मॅच नंतर सचिन सलग सहा वेळा कमी धावा करून बाद झाला होता. हा वर्ष सचिन साठी खूपच निराशा जनक ठरला होता.
याच वर्षी सचिनला टेनिस एल्बो इंजरी झाल्यामुळे काही सिरीज खेळता आल्या नाही.
10 डिसेंबर 2005 ला फिरोज शहा कोटला मैदानावर श्रीलंकेच्या विरुद्ध सचिन ने आपली 35 वी सेंचुरी झलकवली. पण या इंनिंग नंतर पुढच्या शतकासाठी सचिन ला १७ इंनिंग्स थांबावे लागले. साल 2007 मध्ये सचिन ने बांगलादेश विरुद्ध 101 धावा करून 36 वी सेंचुरी केले.
2007-08 गावस्कर बॉर्डर ट्रॉफी मध्ये सचिन फॉर्म मध्ये होता त्याने चार टेस्टमध्ये 493 धावा केल्या होत्या.
जुलै 2008 भारताच्या श्रीलंका दौऱ्यामध्ये सचिनला ब्रायन लारा चा 11953 रेकॉर्ड तोडण्यासाठी तर 177 धावा पाहिजे होते, पण या सर्व सहा इनिंग्स मध्ये सचिनला हा रेकॉर्ड तोडता आला नाही.
नंतर ऑस्ट्रेलियाच्या भारताच्या दोऱ्यामध्ये सचिन परत फॉर्म मध्ये होता, यावेळी त्याने ब्राह्मण दाराचा रेकॉर्ड तोडला आणि आपल्या बारा हजार धावा पण पूर्ण केल्या.
सचिनने त्याच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये, सचिन एकूण 200 टेस्ट मॅचेस खेळला आहे ज्यामध्ये त्याने 53.78 च्या सरासरीने 15921 धावा काढल्या आहेत, ज्यात त्यांनी 51 शतक आणि 68 अर्धशतक बनवले आहेत.
वनडे करिअर | Sachin One-Day Career
सचिनचा वन डे करिअर बघितलं तर खूप मोठा आहे, इथे सांगायला गेलो तर लेख खूप मोठा होऊन जाईल. म्हणून आपण सचिनच्या वन डे करिअरमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडींवर बोलूया. 1992 च्या वर्ल्ड कप नंतर, 1994 मध्ये ऑफलाइन इथे न्यूझीलंड च्या विरुद्ध सचिन प्रथमच ओपनिंग ला आला होता त्या मॅच मध्ये त्याने 49 बॉल मध्ये 82 धावा ठोकल्या होत्या.
सचिनने आपला पहिला वन डे मधील शतक, 9 सप्टेंबर 1994 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका मध्ये केला होता. 1996 च्या वर्ल्ड कप मध्ये सचिन दोन शतके करून लीडिंग स्कोरर ठरला होता. याच वर्षे पाकिस्तान विरुद्ध सार्जामध्ये सचिन आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनी एका मॅच मध्ये दोघांनी शक्य बनवले आणि दुसऱ्या विकेटसाठी रेकॉर्ड पार्टनरशिप बनवली होती.
1998 मध्ये सारजा सीरीज मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिन ने त्याची उत्कृष्ट खेळी खेळला होता. या सिरीज मध्ये सचिनने एक हाती मॅचेस जिंकून भारताला फायनल मध्ये पोहोचवले होते आणि फायनल पण जिंकून दिली होती. सचिन ने सेमी फायनल आणि फायनल मध्ये शतकीय खेळी केली होती.
1998 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारताच्या दौऱ्यामध्ये ही सचिनने उत्कृष्ट कामगिरी केली होती. या सिरीज मध्ये सचिनने एक अष्टपैलू कामगिरी केली होती. सचिनने बॅटने धावा काढला तर होत्याच आणि एका मॅच मध्ये सचिनने ऑस्ट्रेलियाचे पाच गडी बाद केले होते. ह्या पूर्ण टेस्ट सिरीज आणि वन डे सिरीज दोन्ही मध्ये सचिनने शेन वॉर्न च्या विरुद्ध एवढ्या धावा काढल्या होत्या, की तो असाही म्हणाला होता की त्याला सचिन तेंडुलकर स्वप्नात दिसतो.
1999 क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान सचिन तेंडुलकर चे वडील रमेश तेंडुलकर हे मृत्यू पावले होते. तेव्हा सचिन त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी भारतात परतला होता, सर्व विधी व अंत्यसंस्कार झाल्यावर सचिन वर्ल्ड कप खेळण्यास परत गेला आणि लगेच पुढच्या मॅच मध्ये केनिया विरुद्ध नाबार्ड 140 धावांची खेळी खेळली होती, हे शतक सचिनने त्यांच्या वडिलांना समर्पित केलं होतं.
2001 मध्ये पाच एक दिवसीय मॅच सिरीज मध्ये सचिन ने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विकेट घेऊन आपले शंभर विकेट पूर्ण केले होते.
2003 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये सचिन ने 11 मॅचेस मध्ये 673 धावा काढल्या होत्या. सचिनने उत्कृष्ट फलंदाजी करून भारताला फायनल मॅच मध्ये पोहोचवलं होतं, पण शेवटी फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. सचिनला या वर्ल्डकप मध्ये मॅन ऑफ द टूर्नामेंट चा पुरस्कार दिला गेला होता.
6 फेब्रुवारी 2006 मध्ये सचिन ने पाकिस्तान विरुद्ध वन डे मधील 39 वा शतक झलकवला. या सिरीज नंतर सचिनला खांद्याची सर्जरी करावी लागली होती यामुळेही सचिन क्रिकेटपासून थोडा वेळ लांब होता. सप्टेंबर 2006 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पण वनडे मध्ये सचिनने आपला 40 वा शतक झळकवला.
साल 2007, क्रिकेट वर्ल्ड कप पूर्वतयारी मध्ये सचिन आणि इयान चॅप्पेल वाद सुरू झाला होता. इयान चॅप्पेल नुसार सचिनने ओपनिंग सोडून चौथ्या या पाचव्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी यावं. या हंगामामध्ये सचिन च्या खूप यशस्वी खेळल्या झाल्या होत्या. म्हणून 2007 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये राहुल द्रविड च्या कॅप्टन सी मध्ये सचिनने डाउन द ऑर्डर खेळण्यास होकार दिला, पण चेंजेस करून या वर्ल्डकप मध्ये सचिन मोठा स्कोर करू शकला नाही. या वर्ल्डकप मध्ये बांगलादेश आणि श्रीलंका ने भारताला पराभव केला होता. यामुळेही सचिन डिप्रेशन मध्ये गेला होता.
वर्ल्ड कप नंतर सचिनने पुनरागमन केले, फ्युचर कप मध्ये साऊथ आफ्रिका विरुद्ध सचिनने 99 आणि 93 अशा धावा केल्या, दुसऱ्या मॅच मध्ये वनडे मध्ये पंधरा हजार धावा करणार तो प्रथम खेळाडू ठरला होता.
साल 2007 सचिन 90 आणि 100 च्या स्कोर मध्ये तीनदा आऊट झाला होता. सचिन आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये 27 वेळा 90 आणि 100 च्या मध्ये आऊट झाला होता.
2009 -10 मध्ये भारताच्या श्रीलंका दौऱ्यामध्ये भाताला पाच वनडे मॅचेस खेळायचे होते, या पाच मॅच पैकी पहिल्या तीन मॅच मध्ये सचिन खूपच कमी स्कोर करून बाद झाला होता. या तिन्ही मॅच मध्ये तो एलबीडब्ल्यू आऊट झाला होता.
2011-12 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये सचिनन 53.55 च्या सरासरीने 482 धावा काढून तो भारतासाठी सर्वोच्च रन काढणारा खेळाडू ठरला होता. फायनल मध्ये श्रीलंका ला पराभूत करून भारताने हा वर्ल्ड कप जिंकला होता.
23 डिसेंबर 2012 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळत असताना सचिनने आपला वन डे क्रिकेट मधून निवृत्ती घोषित, पण तो टेस्ट क्रिकेट खेळत राहील असे सांगितले.
नंतर दहा ऑक्टोबर 2013 मध्ये सचिनने सर्व क्रिकेट फॉर्मेट मधून निवृत्ती घोषित केली.
सचिनने त्याच्या वनडे कारकीर्दीमध्ये , सचिन एकूण 463 वनडे मॅचेस खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 44.83 च्या सरासरीने 18426 धावा काढल्या आहेत, ज्यात त्यांनी 49 शतक आणि 96 अर्धशतक बनवले आहेत.
टी २० करिअर | T-20 Career
इंटरनॅशनल टी ट्वेंटी क्रिकेट सचिन खूपच कमी खेळला. २००६ मध्ये साऊथ आफ्रिका विरुद्ध खेळल्यानंतर सचिनने म्हटले होते की तो आता कधीही इंटरनॅशनल टी-ट्वेंटी मॅचेस खेळणार नाही.
आयपीएल | IPL
आयपीएल पैसा सीजन 2008 सुरू झाले, त्या आयपीएल मध्ये सचिन ला मुंबई इंडियन्स संघाने आयकॉन प्लेयर म्हणून सिलेक्ट केले होते. 2010 च्या आयपीएल सीझन मध्ये मुंबई इंडियन्स तर्फे सचिनने 14 एमिंग मध्ये 618 धावा केल्या होत्या. त्याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बेस्ट बॅट्समन बेस्ट कॅप्टन म्हणून ही सन्मानित करण्यात आले.
2011 च्या आयपीएल मध्ये सचिनने केरला तस्कर च्या विरुद्ध आपले पहिले आयपीएल शतक नोंदवले. यानंतर 2014 मध्ये सचिनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आणि तो मुंबई इंडियन्सच्या मेंटॉर म्हणून करत होता.
PMG Poplar Willow Wooden Cricket Bat with Tennis Cricket Ball Combo for Boys Red (Size 6 for Age 12-14 Years) and Bag Cover
वैयक्तिक जीवन | Personal Life
क्रिकेटनंतर ज्या गोष्टींवर सचिनचं खूप प्रेम होतं ते म्हणजे त्याची आई त्याची बायको आणि त्याची दोन पोरं. 24 मे 1995 मध्ये सचिनने एका गुजराती मुलगी अंजली मेहता बरोबर लग्न केलं. अंजली मेहता या प्रोफेशनली लहान मुलांच्या डॉक्टर होत्या, पण लग्नानंतर त्यांनी हे प्रोफेशन सोडून दिले.
त्यांना दोन मुले आहेत- सारा आणि अर्जुन. सचिन बांद्रामध्ये एका बंगलो मध्ये राहतो. सचिन श्री गणेशाचा खूप मोठा भक्त आहे.
निवृत्ती | Retirement
23 डिसेंबर 2012 मध्ये मधून निवृत्ती घोषित केले.
दहा ऑक्टोबर 2013 मध्ये टेस्ट बरोबर इतर सर्व फॉर्मेट मधून निवृत्ती जाहीर केली
पुरस्कार | Awards
राष्ट्रीय सन्मान भारत
- 1994 – क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकार तर्फे अर्जुन पुरस्कार देण्यात आलं.
- 1997-98 – खेलरत्न पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जाणारा भारताचा सर्वोच्च सन्मान.
- 1999 – पद्मश्री, भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार.
- 2001 – महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
- 2008 – पद्मविभूषण, भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार.
- 2014 – भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
Conclusion
ही संपूर्ण माहिती वाचल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की का सचिनला क्रिकेटचा देव बोलला जातो. आपण या लेखांमध्ये सचिनचे संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे Sachin Tendulkar Marathi Mahiti पोस्ट आवडली असेल.
धन्यवाद !
4 thoughts on “सचिन तेंडुलकर यांची संपूर्ण माहिती | Sachin Tendulkar Marathi Mahiti”