Marathi Story for Kids Pdf | Marathi Short Stories | मराठी गोष्टी

आज आपण Marathi Story for Kids Pdf म्हणजेच गोष्टी छोट्या मुलांसाठी या याबद्दल बोलणार आहोत. या लेखात आम्ही छोट्या मुलांसाठी छान छान गोष्टी घेऊन आलो आहोत. लहानपणी आपले आजी आजोबा आपल्याला खूप छान छान गोष्टी सांगत असत त्या ऐकायला खूप मज्जा येत असे. तशाच छान छान गोष्टी । Small story in marathi with moral आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

तर चला मग कशाची वाट पाहत आहात, आपण गोष्टी वाचायला सुरू करूया.

Marathi Story for Kids Pdf । Moral stories in Marathi

1. कावळ्याची हुशारी | Thirsty Crow Story in Marathi

Marathi Story for Kids

उन्हाळ्याचे दिवस होते. एक कावला खूप तहानलेला होता. त्याचा घसा कोरडा पडला होता. ज्या जंगलात तो राहायचा, तिथले सगळे नदी, तलाव उन्हाळ्यामध्ये सुकून गेले होते. एवढ्या उन्हात उडून लांब जाणे पण कठीण होते. तहान लागल्यामुळे तो व्याकुल झाला होता.

शेवटी न रहावुन तो पाण्याच्या शोधात उडू लागला. तो जंगलातून शहराच्या दिशेने गेला. तिथे एका घरावरून उडताना त्याला एका झाडाच्या खाली एक माठ ठेवलेले दिसला. तो माठावर जाऊन बसला. त्याने माठामध्ये वाकून बघितले त्याच्यात थोडेसे पाणी होते. त्याची चोच प्रयत्न करून सुद्धा पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. तो विचार करू लागला की आता काय करू?

तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. तो जमिनीवरून एक-एक दगडू उचलून माठात टाकू लागला हळू-हळू माठातले पाणी वर येऊ लागले. काही वेळाने पाणी वरती आले आणि आता त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचली.

कावल्याने पोट भरून पाणी प्याले आणि आनंदाने काव-काव करीत उडून गेला.

2. चपातीची वाटणी – Marathi Goshti

Marathi Story for Kids 10

दोन भुकेल्या मांजरी होत्या. एके दिवशी त्यांना एक चपातीचा तुकडा मिळाला. दोघी त्या तुकड्यावर आपापला हक्क सांगू लागल्या.

एका मांजरीने तो तुकडा उचलला. दुसरी मांजर म्हणाली, “चल मिळुन वाटून खाऊया.”

पहिली मांजर चतुर होती. तिला एकटीलाच पूर्ण चपाती खायची होती. तिने दुसऱ्या मांजरीला साफ नकार दिला. दोघींमध्ये भांडण झाले.

त्याच वेळी तिथून एक माकड जात होते. दोन्ही मांजरीने त्याला विनंती केली, “दादा, तुम्हीच आमचा निकाल द्या. आम्हाला चपातीचा तुकडा सापडला आहे. मी म्हणत आहे की, मिळून वाटून खाऊ, पण तिला चपाती एकटीलाच खायची आहे.”

माकड म्हणाले, “जर तुम्ही दोघी सोबत होत्या तर मग चपातीवर कोणा एकीचा हक्क कसा असू शकतो. याची जर समान वाटणी झालीच पाहिजे. हाच न्याय आहे. आणा, ती चपाती माझ्याकडे. मी त्याचे समान तुकडे करतो आणि एक एक तुकडा तुम्हा दोघींना देतो.”

माकडाने चपातीचे दोन तुकडे केले. मान हलवत म्हणाला, “दोन्ही तुकडे समान नाहीत. हा तुकडा दुसऱ्या तुकड्या पेक्षा मोठा आहे.” त्याने मोठ्या तुकड्यातून एक घास खाल्ला. तरीसुद्धा दोन्ही तुकडे एकसारखे झाले नाही.

माकडाने परत मोठ्या तुकड्या मधून थोडा घास खाल्ला. माकड अशा प्रकारे मोठ्या तुकड्यातून थोडे थोडे घास खात राहिला.

शेवटी चपातीचे दोन छोटे छोटे तुकडेच शिल्लक राहिले.

हे बघून मांजर म्हणाली, “माकड दादा, आमची चपाती आम्हाला परत कर. आम्हाला काही निकाल नाही लावायचं.”

त्यांची गोष्ट ऐकून माकड हसला आणि म्हणाला, “अहो! आता एवढे छोटे छोटे तुकडे मी तुम्हाला कसे देणार? हे तर माझ्या कष्टाचे आहेत.” असे म्हणत माकडाने ते दोन्ही तुकडे पण आपल्या तोंडात टाकत पळ काढला.

3. नक्कल करणे वाईट – Goshti Marathi

Marathi Story for Kids ३

एका डोंगराच्या उंच टोकावर गरुडांची वस्ती होती. डोंगराच्या पायथ्याला एक मोठे झाड होते झाडावर एक कावळा आपलं बनवून राहत राहत होता. तो खूप चतुर होता. कष्ट न करता अन्न मिळो, अशी त्याची इच्छा असायची.

झाडाजवळच्या बिळात ससे राहात होते. जेव्हा ससे बाहेर येत तेव्हा गरुड जोरात झेप घेत आणि एकाच प्रयत्नात सशाला उचलून नेत आणि मजेने खात. कावळा जेव्हा हे बघत असे तेव्हा त्याच्या तोंडाला पाणी सुटायचे.

एके दिवशी कावळ्याने विचार केला की, हे चपळ ससे माझ्या हाती येणार नाहीत. त्यांचे मऊ मास मला खायचे असेल तर, मला पण गरुडासारखी करायला हवे. एकदम एका फटक्यात त्यांना पकडायचे.

दुसऱ्या दिवशी कावळ्याने ससा पकडण्याचा विचार केला आणि झाडावरून उंच झेप घेत आकाशात उंच उडत गेला. मग त्याने सश्याला पकडायचे म्हणून गरुडाप्रमाणे जोरात खाली झेप घेतली. आता कावळा तो, काय गरुडाची बरोबरी करणार? सशाने कावळ्याला बघितले आणि तो पटकन एका मोठ्या दगडाच्या मागे जाऊन लपला. कावळा आपल्याच जोराच्या वेगाने जाऊन त्या दगडाला धडकला. परिणाम, त्याची चोच आणि मान तुटली. कावळ्याने तेथेच तडफडून प्राण सोडले.

4. आंबट द्राक्षे कोण खाणार? – Marathi Short Story

Marathi Story for Kids ४

एके दिवशी हे उपाशी कोल्हा भुकेने व्याकुल होऊन भटकत होता. तो संपूर्ण दिवस जंगलात शिकार शोधत होता. त्याला कुठेही मांसाचा तुकडा मिळाला नाही. बिचारा जिथे तिथे फक्त पाणी पिऊन पुढे चालत होता.

असेच भटकत भटकत तो द्राक्षांच्या बागेत पोहोचला. तिथे वेलीवर पिकलेले द्राक्ष लटकत होते. ते बघून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले.

तो उड्या मारून द्राक्षांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला.

द्राक्षे भरपूर उंचीवर होतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस त्याचे प्रयत्न वाया जात होते, पण द्राक्षे मिळवण्यासाठी कोल्ह्याने खूप प्रयत्न केले. खूप उड्या मारल्या, पण तो द्राक्षांपर्यंत पोहोचू शकला नाही. आधीच भुकेने तो व्याळ झाला होता आणि खूप चालल्यामुळे व उड्या मारल्यामुळे त्याची हाडे खिळखिळी झाली होती.

शेवटी वैतागून व दमून त्याने अशा सोडून दिली आणि तो तिथून निघून गेला. जाता जाता स्वतःशीच म्हणाला, “द्राक्ष आंबट आहेत. आंबट द्राक्ष कोण खाणार?”

5. चलाख लांडगा – Story in Marathi for Child

Marathi Story for Kids ५

एकदा एक मुलगा भाकरीचा तुकडा खात होता. कावल्याने त्या मुलाच्या हातातून भाकरीचा तुकडा पळवला आणि झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. एका लांडग्याने त्याला पाहिले आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने विचार केला की काहीतरी करून ही भाकरी आपण पळविली पाहिजे.

लांडगा अशा कामासाठी प्रसिद्धच आहे. त्यांनी विचार केला आणि तो झाडाखाली जाऊन उभा राहिला. त्याने कावळ्याला विचारले, “बंधू, तू कसा आहेस?” कावळ्याला काहीच उत्तर दिले नाही.

लांडगा म्हणाला, “अरे कावळे दादा, आज तू खूपच सुंदर आणि चमकदार दिसत आहेस. तुझी वाणी मधुर आहे. तू पक्षांचा राजा बनण्याच्या योग्यतेचा आहेस. पण जंगलातील मूर्ख पक्षांना कोण समजाविणार? जरा तुझ्या गोड आवाजात एक सुंदर गाणे म्हणून दाखव.”

आपली खोटी स्तुती एकूण कावळा खुश झाला. गाण्यासाठी त्याने आपली चोच उघडली अन भाकरी खाली पडली. लांडग्याने भाकरीवर झडप मारली. लांडगा भाकरी घेऊन क्षणार्धात दिसेनासा झाला. मूर्ख कावळा उदास झाला.

6. सिंह आणि उंदीर – Sinha aani Undir

एका जंगलात सिंह राहत होता. तो रोज शिकार करून आपल्या गुहेत झोपत असे. असेच त्याचे दिवस चालले होते. असेच एकदा गरमीचे दिवस होते, सिंह त्याच्या गुहेत आराम करत होता, तेव्हा अचानक तिथे उंदीर आला आणि तो सिंहाच्या अंगावर चालू लागला उड्या मारू लागला.

हे बघून सिंहाला राग आला, त्याला आपल्या पंजात पकडले आणि त्याला म्हणाला, “मी जंगलाचा राजा आहे, आणि तू माझ्या अंगावर उड्या मारत आहेस, तुला भीती नाही वाटत का”. दबलेल्या आवाजात उंदीर म्हणाला, “महाराज, मला सोडा माझ्याकडून चूक झाली.” सिंह म्हणाला, “मी तुला आता खाणार.” तेव्हा तो उंदीर म्हणाला, “महाराज मी एवढा छोटासा जीव, तुमच्यासमोर एक रंक आहे, मला खाऊन तुमचा पोट भरणार नाही, कृपया मला सोडा, मला सोडला तर मी तुमच्या कधी ना कधी कामे येईन, महाराज”.

सिंहाला हसू आले आणि त्याची दया पण वाटू लागली. सिंहाने त्या उंदराला सोडून दिले. असेच थोडे दिवस उलटून जातात. सिंह जंगलात शिकार करण्यासाठी फिरत होता. एका झाडाखाली पारध्याने जाळे मांडले होते. त्या जाळ्यात सिंह अटकतो. तो त्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करतो. त्याची पूर्ण शक्ती लावतो, पण काही होत नाही. त्याला त्या जाळ्यातून बाहेर पडता येईना, आणि तो जोर जोरात ओरडू लागतो.

तेव्हा तिथे उंदीर येतो. तो पाहतो की सिंह जाळ्यात अटकला आहे. तो लगेच सिंह जवळ जातो आणि त्या जाळ्याला आपल्या दाताने तोडू लागतो. उंदीर सर्व जाळे तोडून टाकतो आणि सिंहाला जाळ्यातून बाहेर आणतो. सिंह त्या उंदराला पाहून खूप खुश होतो. अशा प्रकारे उंदीर आपल्या जीवदानाची परतफेड सिंहाला जाळ्यातून बाहेर काढून करतो.

तात्पर्य : कोणालाही छोटा समजू नये, कोण कधी कुणाच्या मदतीस येऊ शकतो कोणी सांगू शकत नाही

7. कोल्हा, रानमांजर, आणि ससा – Kolha, Ranmanjar, Ani Sasa

एक जंगल होतं. त्यामध्ये एक भित्रा ससा राहत होता. त्याच्या छोट्याशा बिळामध्ये राहत असे. एके दिवशी त्याने बघितले की एक कोल्हा त्याच्या बिळाच्या तोंडाजवळ बसला होता. सशाला वाटले की आता हा कोल्हा आपल्याला खाणार, पण त्याने नंतर विचार केला की, बिळाचा तोंड खूप छोटा आहे म्हणून त्या कोळ्याचा तोंड त्या बिळामध्ये घुसू शकत नाही. हे समजून त्याच्या मनातली भीती गेली.

असे थोडे दिवस गेले. एके दिवशी सशाने त्या कोल्ह्याला एका रान मांजराशी बोलताना बघितले. त्याला वाटले की, हे दोघे त्याच्याबद्दलच बोलत असतील. थोड्या वेळानंतर ते रान मांजर सशाच्या बिळाजवळ आले आणि त्या सशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला लागले. हे पाहून ससा पटकन बाहेर निघाला आणि पळू लागला.

तितक्यातच कोल्ह्याने त्याला आपल्या पंजात पकडले. सशाला पकडल्यावर त्या दोघांनी त्याच्यावर ताव मारायला सुरुवात केली आणि त्याला खाऊन टाकले. मरताना ससा म्हणाला की, “तुम्हा दोघांना एकत्र बघितले तेव्हाच मला समजलं होतं की माझं काही खरं नाही आणि तेच झालं तुम्ही मला मारून टाकला”.

तात्पर्य : दोन शत्रूंची एकी झाली म्हणजे समजावं की कोणी तिसरा संकटात येणार आहे

8. उंदराची टोपी – Undarachi Topi

Motivational Story in Marathi : एक राज्य होतं त्या राज्यांमध्ये एक उंदीर राहत. असे एके दिवशी उंदीर असाच फेरफटका मारत होता. तेव्हा त्याला रस्त्यात एक फडका मिळाला. तो फडका खूप घाण होता. म्हणून तो उंदीर फडका घेऊन धोब्याकडे गेला आणि त्या धोब्याला उंदीर म्हणाला “धोबी काका, धोबी काका, मला हा कपडा फडका धुवून द्या ना. त्या दोघांनी उंदराची विनंती ऐकून तो फडका होऊन दिला.

मग नंतर उंदीर मामा तो फडका घेऊन शिंप्याकडे गेला. तो उंदीर शिंप्याला म्हणाला “शिंपी काका, शिंपी काका, मला या फडक्याचे एक टोपी बनवून द्याल का आणि त्याला एक छोटासा गोंडाही लावा. शिंपी काका ने त्या फडक्याची एक छानशी टोपी बनवून उंदराला दिली.

उंदराने ती टोपी घातली आणि आणि गळ्यात ढोलकी टांगून तो राज्यात फिरू लागला. ढोलकी वाजवत, तो गाणे गाऊ लागला, ‘राजाची टोपी पेक्षा माझी टोपी छान आहे, डुम डुम डुमक”! राजाने हे ऐकले आणि त्याने आपल्या शिपायांना सांगितले. “जा रे त्या उंदराला पकडून घेऊन या”.

शिपायांनी उंदराला शोधून काढले आणि पकडले. त्या उंदराला पकडून त्यांनी दरबारात आणले आणि त्याची टोपी राजाकडे दिली. मग उंदीर मामा परत गाणे गाऊ लागला, “राजा भिकारी माझी टोपी चोरली घेतली, डुम डुम डुमक”! हे ऐकून राजा भडकला आणि त्याने ती टोपी उंदीर मामा कडे फेकून दिली. परत उंदीर मामा गाणे गाव लागला, “राजा मला घाबरला, मला माझी टोपी परत दिली, डुम डुम डुमक”! हे गाणे गात उंदीर मामा राजवाड्यातून बाहेर निघाला.

तात्पर्य : कधीही शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असते

9. कबुतर आणि मुंगी ची गोष्ट – Kabutar Ani Mungi chi Goshta

Marathi Stories with Moral : एक मुंगी होती. तिला तहान लागल्या कारणामुळे, ती पाणी पिण्यासाठी नदीच्या किनारी जाते. पाणी पीत असताना तिचा पाय घसरतो आणि ती पाण्यात पडते, हे सर्व नदी काठी झाडावर बसलेला कबूतर पाहतो. त्याला मुंगीची दया येते तो लगेच झाडावरचा एक पान नदीमध्ये मुंगीच्या बाजूला पाडतो मुंगी लगेच त्या पानावर चढते आणि नदीच्या पाण्याच्या बाहेर येते.

जशी मुंगी किनाऱ्यावर येते, ती बघते की एक पारधी कबुतरावर जाळ फेकणार असतं. ती मुंगी लगेच जाते आणि त्या पारध्याच्या पायाला चावते. पायाला चावल्यामुळे तो पारधी जोरात ओरडतो. त्याच्या आवाजामुळे कबूतर सतर्क होतो आणि उडून जातो. अशा प्रकारे कबुतराचाही जीव वाचतो.

तात्पर्य : नेहमी सर्वांनी एकमेकांना मदत केली पाहिजे.

10. लाकूडतोड्याची गोष्ट – Lakudtodyachi Gosht

छान छान गोष्टी : एका गावात एक गरीब लाकूडतोड्या राहत होता. घरात जेवण बनवण्यासाठी लाकडाची गरज होती, म्हणून तो नदीकाठच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी गेला. फांदी तोडताना त्याची कुराड नदीत पडली. त्याच्याकडे ती एकच कुऱ्हाड होती. दुसरी कुऱ्हाड घेण्या साठी त्याच्याकडे पैसेही नव्हते.

तो तसाच नदीकाठी रडत बसला. तेव्हा अचानक नदी मधून देवी त्याच्यासमोर प्रकट झाली, आणि त्याला विचारू लागली की, “तू का रडत आहेस?, तेव्हा लाकूडतोड्याने त्याची संपूर्ण गोष्ट सांगितली. देवी पुन्हा नदीमध्ये केली आणि थोड्यावेळाने सोन्याची कुराड घेऊन बाहेर आली आणि लाकूडतोड्याला सांगितले की, “घे, तुझी कुऱ्हाड.” लाकूडतोड्या म्हणतो की, “माझी कुऱ्हाड नाही आहे”.

देवी परत नदीमध्ये जाते आणि थोड्या वेळात चांदीची कुराड घेऊन बाहेर येते आणि लाकूडतोड्याला सांगते की, “हे घे तुझी कुराड”. लाकूडतोड्या बोलतो, “ही माझी खुराड नाही आहे”. देवी पुन्हा एकदा नदीमध्ये जाते आणि लोखंडाची कुऱ्हाड घेऊन बाहेर येते आणि लाकूडतोड्याला सांगते की, “हि घे तुझी कुऱ्हाड.” लाकूडतोड्या कुऱ्हाड बघून बोलतो की, “ही माझी कुऱ्हाड आहे.”

लाकूडतोड्याची प्रामाणिकपणा बघून देवी खुश होते आणि त्याला त्या बाकीच्या दोन्ही कुऱ्हाडी पण बक्षीस म्हणून देऊन टाकते.

तात्पर्य : नेहमी खरे बोलावे.

Marathi Story for Kids Pdf

आम्हाला आशा आहे की तुम्हाला या सर्व Marathi Story for Kids | Marathi Short Stories गोष्टी आवडल्या असतील. या Moral Stories in Marathi | Story in Marathi for Child | Short stories for kids in marathi तुम्ही तुमच्या मुलांना मुलींना वाचण्या साठी सांगू शकता.

धन्यवाद !

हे देखील वाचा

बुड बुड घागरी मराठी गोष्ट । Bud Bud Ghagri Story in Marathi

ससा आणि कासवाची गोष्ट | Sasa aani Kasav Story in Marathi Gosthi

25 MARATHI STORY FOR KIDS | MARATHI SHORT STORIES FOR KIDS IN MARATHI | लहान मुलांच्या मराठी गोष्टी