दि.बा.पाटील संपूर्ण माहिती । DiBa Patil Information in Marathi

मित्रांनो आज आपण DiBa Patil Information in Marathi यांच्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. दि.बा हे असे नेते होते , ज्यांनी आपले संपूर्ण जीवन लोकांसाठी समर्पित केले होते. पनवेल, उरण, नवी मुंबई च्या लोकांसाठी दि.बा म्हणजे देवमाणूस. दि.बा.मुळे या सर्व लोकांचे अस्तित्व या भागात टिकून राहिले. नाहीतर त्या कालच्या सरकारने तर या भागातील लोकांना इथून विस्थापित करून महाराष्ट्राच्या कुठल्या तरी कोपऱ्यात टाकण्याचे ठरवले होते.

दिबांनी फक्त रायगड, ठाणे जिल्ह्यासाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी पण खूप काम केलं आहे. दि.बा. हे शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी आयुष्यभर झटणारे नेते होते. तर चला जाणून घेऊया DiBa Patil Information in Marathi ची संपूर्ण माहिती.

दि.बा.पाटील संपूर्ण माहिती । DiBa Patil Information in Marathi

दिबांच्या वयक्तिक जीवन आणि राजकीय जीवनाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया .

वयक्तिक जीवन

जन्म

दिनकर बाळू पाटील (दि.बा.पाटील ) यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ साली झाला. त्यांच्या वडिलांचा नाव बाळू गवरू पाटील आणि आईचे नाव नागीबाई बाळू पाटील होते. दिबांचे वडील हे शिक्षक होते.

शिक्षण

दिबा ५ वर्षाचे असताना , त्यांना ९ मार्च १९३१ मध्ये बिगरीत म्हणजेच पहिलीच्या अगोदरच्या वर्गात टाकला . हि शाळा जासई-बेलपाडा येथे होती.

त्यानंतर दि.बा. पहिली ते चौथीपर्यंत जसाई ला शिकले. त्या पुढील शिक्षणाकरिता ते त्यांच्या वडील आणि बंधूच्या प्रयत्नाने पनवेलला गेले. १९३७ साली दि.बा पनवेलच्या वि.खं.हायस्कूलला दाखल झाले.

१९४४ मध्ये दि.बा.पाटील म्याट्रिक झाले. त्यांना ६४.५०% गुण मिळाले. इंग्रजीमध्ये ६० टक्के,तर संस्कृत-भूगोल विषयात शाळेत पहिला क्रमांक व गणित या विषयात विशेष प्राविण्य मिळाले.

म्याट्रिक नंतर दिबांच्या वडिलांच्या व मोठ्या भावाच्या निर्धारामुळे , दिबांना पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.

ऑक्टोबर १९४८ ला ते बी.ए च्या परीक्षेला बसले.त्यानंतर १९५१ ला एल एल बी झाले. बाबांचे आणि बंधूंचे दिबांना शिकवण्याचे स्वप्न साकार झाले आणि दिबांचा बेलपाडा जसाई शाळेतून शिकण्याचा सुरु झालेला प्रावस पुणे येथील लॉं कॉलेजमधून संपला.

विवाह  

DiBa Patil Information in Marathi

दि.बा.पाटील हे वकिली पास होऊन आल्यानंतर त्यांचा १९५२ ला शिवाजी पार्क दादर येथे बालमोहन विध्यामंदिरात विवाह झाला. दादर येथील (गाव:पेण-वाशी ) तुकाराम हिरुजी म्हात्रे यांची कन्या सुशीलाताई यांच्याशी अगदी साध्या पद्धतीने विवाह झाले. पुढे त्यांना चार अपत्य झाली – दोन पुत्र म्हणजे अभय, अतुल व दोन कन्या अंजली, अनिता.

राजकीय जीवन

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधून एल.एल.बी केल्यानंतर त्यांनी १९५२ मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये वकिली सुरु केली.

१९५२ मध्ये अप्पासाहेब पाटील यांनी पनवेल मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याचा त्यांना आग्रह केला,परंतु दिबांनी नुकतीच वकिली सुरु केल्यामुळे त्यांनी होकार दिला नाही.

मार्च १९५२ मध्ये कुलाबा जिल्हा लोकल बोर्डाची निवडणूक जाहीर झाली. उरण तालुक्यातून दोन जागा निवडून द्यायच्या होत्या. या वेळी मात्र लोकाग्रहास्तव त्यांना नकार देता आला नाही. जनतेच्या मनापासून असलेल्या पाठीम्ब्यामुळे दि.बा.पाटील भरघोस मतांनी निवडून आले.

दिबा काही काळ पनवेलचे नागराधक्ष्य्ही होते.

विधानसभा १९५७

दिबांनी १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न सोडविण्याच्या कामात पूर्णपणे सहभाग घेतला होता, त्यासाठी त्यांनी जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

या चळवळी नंतर दिबांच्या समाजसेवेच्या कार्याची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली होती. दिबांच समाजसेवेच्या कार्याची कीर्ती बघून भाऊसाहेब राऊत आणि आप्पासाहेब पाटील यांनी १९५७ ची विधानसभा निवडणूक लढविण्यास दिबांना सांगितले. त्यांच्या आग्रह खातर, दिबांनी हि निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा.

१९५७ मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती, त्यावेळी मुंबई राज्य होते, म्हणून हि निवडणूक मुंबई विधानसभेच्या माध्यमातून लढवली गेली.

दिबांचे मतदार संघ १५०-पनवेल हे होते. दिबांनी हि निवडणूक शेतकरी कामगार पक्षातर्फे लढवली. या निवडणुकीत दि.बा.पाटील १५६२१ मतांनी विजय झाले होते. तर त्यांचे विरोधी पराभूत उमेदवार हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदाशिव सखाराम पन्हाळे यांना १०२०८ मते मिळाली.

आमदार झाल्यावर दिबांनी संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न,सीमाप्रश्न व आर्थिक, सामाजिक दैनंदिन अडचणीच्या पप्रश्नांवर सतत आंदोलने केली.

१ एप्रिल १९५७ रोजी विधानसभेत कुळ कायदा मंजूर झाला, तेव्हा त्या कुळ कायद्यातील त्रुटींवर विधानसभेत साडेचार तास अखंडपणे मुद्देसूद भाषण करून, कॉंग्रेस सरकारला त्या दुरुस्त्या करण्यास दिबांनी भाग पडले.

दिबांची १९५७ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मंडळाचे सदस्यत्व म्हणून निवड झाली.

१९५८ मध्ये सीमा प्रश्नावर सत्याग्रह केल्यामुळे, दिबांना पोलिसांनी अटक केली व त्यांना १ वर्ष तुरुंगवास भोगावे लागले.

विधानसभा १९६२

दि.बा.पाटील हे १९६२ मध्ये दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत निवडून आले. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर हि पहिलीच निवडणूक होती.

दिबांनी हि निवडणूक ३६-पनवेल मधून लढवली होती. या निवडणुकीत दिबांना १८८५६ मते मिळाली, तर त्यांचे विरोधी उमेदवार भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे प्रतापसिंह विश्वासराव चव्हाण यांना १३७७२ मते मिळाली, या निवडणुकीत दिबा ५०८४ मतांनी विजयी झाले.

विधानसभेत दि.बा.पाटील हे अभ्यासू वृत्तीने व आक्रमकपणे भाषण करून शेतकरी,शेतमजूर आणि ग्रामीण तसेच नागरी प्रश्नांवर सरकारची कोंडी करीत असत.

विधानसभा १९६७

तिसऱ्यांदा दि.बा.पाटील यांनी २१-२-१९६७ रोजी, १९-पनवेल या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत शे.का.प उमेदवार दिबां १२१७१ मतांनी विजयी झाले. त्यांचे विरोधे उमेदवार भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे जी.एन.पाटील होते.

विधानसभा १९७२

५ मार्च १९७२ रोजी झालेली विधानसभा निवडणूक चवथ्यांदा दि.ब पाटील यांनी १९-पनवेल या मतदार संघातून लढवली.

या निवडणुकीत दिबांना ३२९८० मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी गोपाल गोविंद पाटील यांना २५२५५ मते मिळाली. हि निवडणूक दिबांनी ७७२५ मतांनी जिंकली.

हि निवडणूक जिंकल्यानंतर, दिबांची विरोधी पक्ष प्रमुखपदी निवड झाली. दिबांनी हे काम अत्यंत प्रभावीपणे केले. याच काळात देशात महागाई विरोधात आंदोलने चालू झाले , या आंदोलनातही दिबा सहभागी झाले. त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली, तेव्हा या काळात दिबांना पुण्याच्या येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध केले होते. त्यांची नंतर सहा महिन्यानंतर सुटका केली गेली.

लोकसभा १९७७

चार वेळा आमदारकी जिंकल्यावर दिबांची प्रसिद्धी वाढली होती. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी खूप जणांची इच्छा होती.

दि.बा.पाटील यांनी ३-कुलाबा या लोकसभा मतदार संघातून शेतकरी कामगार पक्षाचा नेता म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत दिबांना १९९४६२ मते मिळाली, तर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार शंकर सावंत यांना १४६१४२ मते मिळाली. हि निवडणुक दिबांनी ५३३२१ प्रचंड मतांनी जिंकली.

दि.बा.पाटील खासदार झाले, परंतु हि अल्पजीवी ठरली. अवघ्या अडीच वर्षात , ज्या चार पक्षांनी सत्तेसाठी एकत्र येवून जनता पक्ष स्थापन केले होते, त्याचे विघटन झाले आणि हि लोकसभा बरखास्थ झाली.

लोकसभा १९८०

१९८० मध्ये लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक जाहीर झाली. दिबांनी ३-कुलाबा या लोकसभेच्या मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस या पक्षाचे उमेदवार ए.टी.पाटील यांना १६०५२४ मते पडली, तर दिबांना ११११०४ मते मिळाली. दिबा ४९४२० मतांनी पराभूत झाले.

विधानसभा १९८०

१९८० च्या लोकसभेत पराभव पत्करावा लागला तरी, या निवडणुकीनंतर २८ मे १९८० मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली.

या निवडणुकीत दि.बा.पाटील यांना २९८१९ मते मिळाली, तर विरोधी उमेदवार भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे जयदास सीना पाटील यांना २७८०२ मते मिळाली. दिबांनी हि निवडणूक २०१७ मतांनी जिंकली.

२४ डिसेंबर १९८२ ते १४ डिसेंबर १९८३ या कालावधीत दिबांची निवड विरोधी पक्ष नेता म्हणून दुसऱ्यांदा झाली. या काळात दिबांनी जनतेच्या विविध प्रश्नांवर सरकारला सळो की पळो करून सोडले.

लोकसभा १९८४

१९८४ साली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली, या कारणास्तव १९८० ची लोकसभा बरखास्त करण्यात आली व मुदतपूर्व निवडणूक घेण्यात आली.

दिबांनी हि निवडणूक ३-कुलाबा या मतदार संघातून लढवली, या निवडणुकीत दिबांना २१११९४ मते मिळाली, तर विरोधी उमेदवार ए.आर.अंतुले यांना १७३२७० मते मिळाली. दिबांनी हि निवडणूक २७९२४ प्रचंड बहुमताने जिंकली आणि दुसऱ्यांदा खासदार झाले.

लोकसभा १९८९

दि.बा.पाटील यांनी १९८९ लोकसभा निवडणूक ३-कुलाबा मतदारसंघातून लढवली. या निवडणुकीत दिबांना २१८५१६ मते मिळाली , तर ए.आर.अंतुले यांना ३३३९५० मते मिळाली. दिबांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

या निवडणुकीनंतर दिबांना १९९२ मध्ये विधान परिषद चे सदस्यत्व मिळाले, ते १९९८ पर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते.

लोकसभा १९९९

१९९९ मध्ये दि.बा.पाटील यांनी ३-कुलाबा याच मतदारसंघातून निवडणूक लढवली. हि निवडणूक दिबांनी शे.का.प. च्या ऐवजी शिवसेनेच्या पक्षातर्फे लढवली.

या निवडणुकीत दिबांना २३१२६४ मते मिळाली, तर शे.का.प चे उमेदवार रामशेठ ठाकूर यांना २७४३६१ मते मिळाली. या निवडणुकीतही दिबांना पराभव पत्करावा लागला.

या पराभवामुळे दिबांना जरा धक्का बसला आणि त्यांनी पुढे राजकीय सन्यास घेवून, प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून काम सुरु ठेवले.

दि.बा.पाटील साहेब यांच्या उपसुचनांमुळे घडलेले कायदे

  • महाराष्ट्राचा महसूल कायदा.
  • कुळ कायदा.
  • सैनिकांच्या नावावरील जमिनी कुळ म्हणून ठेवण्याचा कायदा.
  • सातबाराच्या उताऱ्यात तलाठ्याचे अधिकार काढून घेण्याचा कायदा.
  • वरच्या शेतातील पाणी खालच्या शेतात सोडण्याचा कायदा.
  • गर्भजल परीक्षेला विरोध करणारा कायदा.
  • सिडकोसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा कायदा.
  • एम.आय.डी.सी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा कायदा.

फक्त शेतकऱ्यांचेच प्रश्न नव्हे, तर मुंबईतील घरदुरुस्ती कायद्याला दिबांनी २०० उपसूचना मताला टाकून पाहते पाच पर्यंत विधानसभेचे कामकाज चालीवले होते.

उत्कृष्ट भाषण पुरस्कार

DiBa Patil Information in Marathi

दिबांनी आपल्या अभ्यासू व परखड भाषणाने सामन्य जनतेचे विविध प्रश्न सरकार दरबारी मांडले. दि.बा.पाटील यांची विधानसभा, विधान परिषद व लोकसभेतील भाषणे अत्यंत अभ्यासपूर्ण असत, त्यांची बोलण्याची शैलीही आक्रमक असे. ते वैधानिक पातळींवर व इतरत्रही अत्यंत शिस्तीने वागत असत, म्हणूनच महाराष्ट्र शासनाने “राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शासन” तर्फे डिसेंबर १९९६ मध्ये “उत्कृष्ट भाषण पुरस्कार” सुरु केला, व हा पहिल्याच वर्षी दि.बा,पाटील साहेबांना मिळाला.

मृत्यू

DiBa Patil Information in Marathi

२४ जून २०२३ रोजी जासई पनवेल येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले. दि.बा गेल्याने भूमिपुत्रांवर दुःखाचा डोंगर कोसळलं होतं.

दि.बा. नेहमी म्हणायचे, “हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते. नव्हे, ते जाऊ द्यायचे नसते”.

Conclusion

आम्हाला आशा आहे कि DiBa Patil Information in Marathi हा लेख तुम्हाला नकीच आवडली असेल.

धन्यवाद !

हे देखील वाचा अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती | Ashtavinayak Ganpati Names and Places in Marathi

सचिन तेंडुलकर यांची संपूर्ण माहिती | Sachin Tendulkar Marathi Mahiti

शेअर मार्केट म्हणजे काय ?, मराठी माहिती । SHARE MARKET IN MARATHI 2023

1 thought on “दि.बा.पाटील संपूर्ण माहिती । DiBa Patil Information in Marathi”

Leave a Comment