बुड बुड घागरी मराठी गोष्ट । Bud Bud Ghagri Story in Marathi

Bud Bud Ghagri Story in Marathi : एक उंदीर होता, तो एकदा असाच फिरत फिरत जंगलात पोहचला. तिथे रस्त्यात त्याला एक माकड आणि एक मांजर भेटले. त्या तिघांची फार मैत्री झाली. एकदा त्यांनी खीर बनवायचे ठरवले. त्याप्रमाणे तिघे कामाला लागले. माकडाने एक पातेले आणले. उंदराने खीर बनवण्यासाठी रवा आणि साखर आणली. मांजराने दूध आणले. सगळ्यांनी मिळून जंगलातून लाकडे गोळा केली. मांजराने चूल पेटवून , खीर बनवायला सुरु केली. थोड्या वेळाने छान खीर तयार झाली. (Bud Bud Ghagri Story).

माकड म्हणाला ” खीर तयार झाली आहे, तर खीर खाण्याअगोदर आपण नदीवर अंगोला करून येऊया “. उंदीर अंघोळी साठी तयार झाला, मांजर बोलली मी इथेच आराम करते . तर मग माकड आणि उंदीर दोघे नदीवर आंघोळ करायला गेले. जाताना ते मांजरीला म्हणाले, ”मनीमावशी, तू खिरीची राखण पण कर. आम्ही नदीवर अंघोळ करून येतो, मग सर्वांनी मिळून खीर खाऊ.”

मांजर खिरीची राखण करायला थांबली. खिरीचा छान वास सुटला होता. मांजरीला भूकही लागली होती. तिला वाटले, ‘आपण थोडी खीर खाल्ली, तर कोणाला काय कळणार आहे ?’

म्हणून मांजरीने थोडीशी खीर खाल्ली. तिला खीर फार आवडली. मग मांजरीला राहवेना. तिने अजून थोडी खीर खाल्ली. असे करता करता तिने संपूर्ण खीर खाऊन टाकली. मग पातेवाल्यावर झाकण ठेवून ती झोपेचे सोंग करून झोपली. 

काही वेळाने माकड आणि उंदीर दोघे आंघोळ करून आले. पातेले उघडून पाहतात तर काय, पातेले रिकामे होते . 

त्यांनी मांजरीला विचारले, ”मनीमावशी, खीर कोणी खाल्ली ?” 

मनीमाऊ म्हणाली, ”मी नाही बाई खीर खाल्ली. मी तर गाड झोपले होते.” 

माकडाला मांजरीवर संशय आला. त्याने एक घागर आणली. ते म्हणाले, ही घागर आपण नदीत पालथी ठेवू. आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे, ‘मी खीर खाल्ली असेल , तर बुडबुड घागरी.’ ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल.” 

अगोदर माकड घागरीवर बसले. ते म्हणाले, 

“हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी.” पण घागर बुडाली नाही. 

मग उंदीर घागरीवर बसला. तो म्हणाला,  “चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी.” पण घागर काही बुडाली नाही.

मग मनीमाऊ भीत भीत घागरीवर बसली. तिचे पाय लटलटू लागले. घागर हलू लागली. ती म्हणाली, 

“म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी.” आणि हळूहळू घागर बुडू लागली. मनीमाऊ गटांगळ्या खाऊ लागली. घाबरून ती ओरडू लागली, ‘“मला वाचवा ! वाचवा! मी परत खोटे बोलणार नाही. मित्रांना फसवणार नाही.” 

प्रिय बालमित्रांनो, तर अशा प्रकारे मनीमाऊची खिरीची चोरी पकडली गेली.चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. अशी झाली मांजरीची फजिती !

बुड बुड घागरी मराठी Bud Bud Ghagri Story in Marathi गोष्ट सारांश:

माकड, उंदीर आणि मांजर यांच्या मैत्री मध्ये मांजरीला आपल्या हावरटपणाचा मोह आवरता आला नाही. माकड आणि उंदीर अंघोळ करायला गेले असता, थोडीशी खीर चाखून पाहता-पाहता संपूर्ण खीर फस्त करून टाकली. त्यावरून ‘मी खीर खाल्ली नाही’ हा मांजरीचा खोटारडापणा माकडाने जास्त वेळ टिकू दिला नाही.  

बुड बुड घागरी गोष्ट

तात्पर्य: Marathi Story for kids

तात्पर्य

नेहमीच खरे बोलावे.

हे देखील वाचा Maharashtra Din Best Wishes । महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 2023

MARATHI STORIES FOR KIDS WITH MORAL | लहान मुलांच्या मराठी गोष्टी | MARATHI GOSHTI 2023