Best 100+ Motivational Status in Marathi | Inspirational Status in Marathi

मित्रानो आज आपण Best 100+ Motivational Status in Marathi बद्दल बोलणार आहोत. प्रेरणा ही आपल्यातील एका ठिणगीसारखी असते, जी आपल्याला कृती करण्यास आणि आपले ध्येय गाठण्यासाठी प्रवृत्त करते. हे आम्हाला आव्हानांवर मात करण्यास, चुकांमधून शिकण्यास आणि मजबूत होण्यास मदत करते. प्रेरणेने आपण यश मिळवू शकतो आणि स्वतःवर विश्वास ठेवू शकतो. हे इंधन आहे जे आपल्याला चालू ठेवते आणि आपल्याला आठवण करून देते की जेव्हा आपण आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवतो तेव्हा आपण काहीही साध्य करू शकतो.

Best Motivational Status in Marathi with Images

Motivational Status in Marathi

माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
💪

कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.
💪

Motivational Status

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
💪

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
कारण तुम्ही चांगले आहात म्हणून
.💪

Motivational Status

पराभवाची भीती बाळगू नका
तुमचा एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.
💪

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
💪

Motivational Status
motivational status

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही.
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
💪

प्रामाणिकपणा हि शिकवण्याची बाब नाही,
तर तो रक्तातच असावा लागतो,
त्यात टक्केवारी नसते ,
तो असतो किंवा नसतो.
💪

motivational status
Motivational Status in Marathi

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

Motivational Status in Marathi 1

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

जीवन हे बुद्धिबळाचा खेळ आहे
जर टिकून राहायचे असेल तर
चाली रचत राहाव्या लागतील.

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल.
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.

तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.

कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

Life Motivational Status in Marathi

Motivational Status in Marathi 2

जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.

उत्कृष्ट काम करण्याचा एकमेव मार्ग
म्हणजे तुम्ही जे करता त्यावर प्रेम करणे.

Motivational Status in Marathi 3

यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही.
आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे.
तुम्ही जे करत आहात त्यावर प्रेम असेल
तर तुम्ही यशस्वी व्हाल.

यश हे तुमच्याकडे काय आहे यात नाही
तर तुम्ही कोण आहात यात आहे.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते,
तर तुम्ही का नाही.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

आम्ही आशा करतो कि तुम्हाला Best 100+ Motivational Status in Marathi आवडले असतील. या लेखात आम्ही अजून Inspirational Status in Marathi, Motivational Status in Marathi with Images , प्रेरणादायी स्टेटस, घेऊन आलो आहोत.

हे देखील वाचा Best 50+ Friendship status in Marathi | फ्रेंडशिप स्टेटस मराठी मध्ये

MOTIVATIONAL STATUS IN ENGLISH | BEST INSPIRATIONAL STATUS IN ENGLISH 2023

2 thoughts on “Best 100+ Motivational Status in Marathi | Inspirational Status in Marathi”

Leave a Comment