स्वामी विवेकानंद संपूर्ण माहिती मराठी | Swami Vivekananda Information in Marathi

” माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो… ” या एका हाकेने संपूर्ण जग जिंकणारे सन्यासी स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र आज आपण जाणुन घेणार आहोत. संपूर्ण जगात हिंदू धर्माची पताका फडकवणाऱ्या स्वामींचे मूळ नाव, गाव काय होते? ते कोणत्या समाजात जन्माला आले? त्यांचे शिक्षणं किती झाले होते? त्यांच्या गुरुचे नाव काय? का झाले ते सन्यासी? त्यांनी काय कार्य केले? या सर्व प्रश्नांची सविस्तर आज आपण जाणुन घेणार आहोत. चला तर सुरावत करु या स्वामी विवेकानंद Swami Vivekananda Mahiti Marathi यांच्या जीवनपटाला.

Swami Vivekananda Information in Marathi

Swami Vivekananda जन्म व बालपण

स्वामी विवेकानंद यांचा जन्म सोमवार दिनांक १२ जानेवारी १८६३ रोजी पहाटे ६ वाजून ३२ मिनिटांनी कोलकत्याच्या एका सुशिक्षित, सुसंस्कृत आणि श्रीमंत घरात झाला. तो संक्रांतीचा दिवस होता. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी तर वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते. जात ना पूछो साधू की असे म्हटले जाते.पण हल्ली जात जाणुन घेण्याच्या तीव्र कुतूहलाचा जमाना असल्याने ते कायस्थ समाजाचे होते हे सांगणे आवश्यक वाटते. त्यांचे मूळ नाव वीरेश्वर होते तर रूढ झालेले नाव नरेंद्रनाथ होय.

सामजिक आणि धार्मिक बाबतीत पुरोगामी विचारांचे आणि स्वभावाने दयाळू असलेले त्यांचे वडील कोलकत्ता उच्च न्यायालयात वकील होते. त्यांच्या आई धार्मिक संस्कारांचा पगडा असलेली गृहिणी होत्या.

बालपणापासून खेळ, व्यायाम, पोहणे, कुस्ती, नौकानयन, घोडेस्वारी, लाठी चालवणे इत्यादी बाबतीत ते तरबेज होते. त्यांना गायन, वाचन आणि चिंतनाची आवड होती. अगदी लहापणापासूनच त्यांनी रामायण महाभारत वेद उपनिषद्, स्मृती आदी धर्मीक ग्रंथांचा अभ्यास केला. त्यांना साहित्यात सुध्दा विशेष रस होता. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते उगीच नाही. बालपणीच त्यांच्यात सन्यासाची ओढ होती असे म्हटले जाते.

शिक्षण – Swami Vivekananda Information in Marathi

वयाच्या आठव्या वर्षापर्यंत नरेंद्र आपल्या घरीच शिकत होते. ते लेखन वाचन घरात बसून शिकले. नंतर १८७१ साली इश्र्वरचंद विद्यासागर मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्युट मध्ये पुढील शिक्षणाची सुरवात केली. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये सूरू झाले. पण इथे फार काळ त्यांचे मन रमले नाही. पुढे त्यांनी जनरल असेब्ली इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेऊन तेथे वेस्टर्न फिलॉसॉफी, लॉजिक, आणि युरोपचा इतिहास वगैरे विषयांचा अभ्यास केला.

१८८१ मधे त्यानी फाईन आर्ट आणि १८८४ मधे बी ए ची पदवी मिळवली. येथे शिकत असतानाच त्यांनी डेविड ह्युम, इम्यानुल कँट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बट स्पेंसर,जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेंसर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी स्पेंसर यांच्या एज्युकेशन या ग्रंथाचा अनुवाद केला होता. या सर्व घडामोडी दरम्यान त्यांनी स्पेंसर च्याशी संपर्क साधला होता.

याच काळात त्यांनी बंगाली व प्राचीन संस्कृत साहित्याचा अभ्यास सूरू केला होता. ते एक हुषार आणि प्रतिभावंत विद्यार्थी होते.

गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. त्याची स्मरणशक्ती विलक्षण होती. त्यांच्याशी चर्चा केलेले विचारवंत महेद्रलाल सरकार यांनी त्यांच्याबद्दल उच्चार करतांना म्हटले की ” या तरुण मुलाने ईतके वाचन केले असेल असे मला अजिबात वाटले नव्हते “

स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी नरेंद्र यांच्या बाबत म्हटले आहे की, “नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही. “

Swami Vivekananda यांची गुरुभेट

सुरेंद्र नाथ मित्र हे रामकृष्ण परमहंस यांचे भक्त होते. रामकृष्ण परमहंस अध्यात्मिक व्याख्याने देण्यासाठी कलकत्त्याला सुरेंद्र नाथांच्या घरी जात असत. असेच १८८१ सालच्या नोव्हेंबर महिन्यात रामकृष्ण परमहंस सुरेंद्र नाथ यांच्या शिमला मोहल्ला येतील घरी व्याख्यान देण्यासाठी आले होते. या कार्यक्रमात गायनासाठी येणारे गायक आयत्यावेळी येवू शकले नाहीत. म्हणुन सुरेंद्र नाथांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या नरेंद्र दत्त यांना गायनासाठी येण्याची विनंती केली. नरेन्द्र दत्त हे उत्तम गायक होते. त्यांनी काही भक्तिगीते रामकृष्ण परमहंस यांना ऐकुन दाखवली. त्यांचे गाणे ऐकुन रामकृष्ण परमहंस खुप प्रभावित झाले.

त्यांनीं नरेंद्र दत्त यांना दक्षिनेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. लौकिक अर्थाने ही त्यांची पाहिली भेट असली तरी आपण यापूर्वीही भेटलो आहोत हे रामकृष्ण परमहंस यांचे शब्द नरेंद्र दत्त यांच्या मानत कुतुहल निर्माण करण्यास पुरेसे ठरले होते. रामकृष्ण परमहंस यांनी नरेंद्र दत्त यांच्या देहात वसत असेलल्या स्वामी विवेकानंद यांना ओळखले होते. तसेही गुरु शिष्याच्या जोड्या जन्मजन्मातरीच्या आसतात असे म्हणतात. कारण कोणीही संपूर्ण ज्ञान एका जन्मात ग्रहण करु शकत नाही अशी अध्यात्मात धारणा आहे. नरेन्द्र दत्त यांच्या हातून भविष्यात होणाऱ्या अलौकिक कार्याची कल्पना रामकृष्ण परमहंस यांना आधीच आली होती. नरेंद्र दत्त यांना स्वस्वरुपाची ओळख करुन देण्यासाठी योग्य गुरूची भेट होणे आवश्यक होते. ती भेट येथे झाली होती.

गुरुकृपा

1882 साल सूरू होता होता नरेंद्र दत्त आपल्या दोन मित्रांसह दक्षिणेश्वरला जावून रामकृष्ण परमहंस यांना भेटले. ही अलौकिक भेट त्यांच्या आयुष्यातला कलाटणी देणारी ठरली. सुरवातीला नरेन्द्र दत्त यांनी रामकृष्ण परमहंस यांचा गुरु म्हणुन स्वीकार केला नसला तरी त्यांचा गुरूचा शोध घेणे सुरू होते. नरेन्द्र दत्त हे राजा राम मोहन रॉय यांच्या ब्राम्हो समाजाचे सदस्य असल्याने त्यांना मुर्ती पुजा, अनेक देवता वगैरे मान्य नव्हते. परमानंद आणि साक्षात्कार या त्यांना केवळ कवी कल्पना किंवा भ्रम वाटत.

तरीही त्यांच्यावर रामकृष्ण परमहंस यांचा प्रभाव वाढत चालला होता. नरेन्द्र दत्त यांनी आपल्या गुरूची परीक्षा घेतली. त्यांच्याशी शास्त्रार्थ केला. यावेळी रामकृष्ण परमहंस यांनी, ” सर्व कोनातून पाहीले तरच सत्याचे वास्तव रूप दिसते. ” असे सांगीतले. हे तत्त्व नरेन्द्र दत्त यांना मनापासून पटले.

वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे नरेन्द्र दत्त यांचे कुटुंब दिवाळखोर झाले. ते १८८४ साल होते. त्यांचे कुटूंब कर्जबाजारी झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांची आर्थिक पत ढासळली. त्यांनी नौकरी शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला तेव्हा जगात देव आहे की नाही याबाबत त्यांच्या मानत शंका उपस्थित झाली. अशावेळी रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना दक्षिनेश्वरला बोलावून घेतले. येथे नरेन्द्र दत्त यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी कली मातेला प्रार्थना करण्याची विनंती केली.

तेव्हां अशी प्रार्थना नरेंद्रने स्वतः करावी अशी इच्छा रामकृष्ण परमहंस यांनी व्यक्त केली. रामकृष्ण परमहंस यांच्या इच्छेनुसार नरेन्द्र दत्त देवीच्या मंदीरात प्रार्थना करण्यासाठी गेले. परंतू अनेक प्रयत्न करूनही ते स्वतच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रार्थना करू शकले नाहीत. शेवटी त्यांनीं देवीकडे खऱ्या ज्ञानाची मागणी केली. हिच होती नरेन्द्र दत्त यांची स्वामी विवेकानंद होण्याच्या प्रवासाची सुरुवात. इथूनच त्यांनीं सर्वस्वाचा त्याग करून रामकृष्ण परमहंस यांना गुरस्थानी मानले.

१८८५ साली रामकृष्ण परमहंस यांना घशाचा कर्करोग झाला. उपचारासाठी त्यांना आधी कलकत्त्याला आणि नंतर कोसीपोर येथे आणले. येथे रामकृष्ण परमहंस यांच्या शिष्यांनी त्यांची सुश्रुषा केली. याच काळात नरेन्द्र दत्त यांची अध्यात्माची शिकवनीं जोर धरु लागली होती. येथे नरेन्द्र दत्त यांना समाधी अवस्थेतील आनंदाची गोडी उमजली. त्यांना सारखे समाधी अवस्थेत रहावे असे वाटू लागते. परंतू त्यांच्या गुरूने त्यांना जनकल्यानाच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. आपली भगवी वस्त्रे त्यांनी नरेन्द्र दत्त यांना दिली. त्यांना आपल्या इतर गुरुबंधुंची काळजी घेण्यास सांगून सर्व शिष्यांची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. १६ ऑगस्ट १८८६ रोजी कोसीपुर येथे रामकृष्ण परमहंस ह्यांचे निधन झाले.

रामकृष्ण मठाची स्थापना

परमहंस यांच्या निधनानंतर गुरुबंधू तारक नाथ यांच्या मदतीने स्वामी विवेकानंदांनी कोलकात्याजवळील वराहनगरमधील एका भुताटकीने पछाडलेल्या पडक्या वाड्यात मठाची स्थापना केली. विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांच्या वापरातील वस्तू आणि त्यांचा अस्थी कलश यांची मठात स्थापना केली.

स्वामी विवेकानंदांचे भारत भ्रमण

परमहंस मठाची स्थापना करुन इतर शिष्यांना तिथे ठेऊन स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. भारत फिरताना त्यांनी भारतातील दुःख , दारिद्र्य, दैन्य, गरीबी उपासमार पाहिली. त्यांचे मन उद्विग्न झाले. ते भारताचे दक्षिण टोक असेलल्या कन्याकुमारी येथे पोहोचले तेव्हां त्यांनी समुद्रात झेप घेतली. समुद्राच्या पोटात असेलल्या शिळेवर जावून ध्यानस्थ झाले. ध्यानावस्थेत असताना त्यांना देशसेवा आणि समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असा विचार आला. जगाचे दुःख नाहीसे करण्याचे सामर्थ्य अद्वैत विचारात आहे असे वाटल्याने त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञान जगभरात पोहोचवण्याचा संकल्प करुन विश्व भ्रमण करण्यासाठी समाधी सोडली.

शिकागोतील सर्वधर्मपरिषद – Swami Vivekananda Information in Marathi

“अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो”

११ सप्टेंबर १८९३ हा दिवस संपूर्ण विश्र्वासाठी महत्वपूर्ण दिवस आहे. या दिवशी अमेरिकेतील शिकागो शहरात जागतीक सर्व धर्म परिषदेतील आपल्या भाषणाची सुरवात करताना स्वामी विवेकानंद यांनी उच्चारलेले शब्द ” अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो..”

संपूर्ण जगाच्या काळजाला हात घालणारे ठरले. हे शब्द सभागृहात ऐकू येताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमले. दोन मिनिट फक्त टाळ्या ऐकू येत होत्या. दुसरे काहीच नाही. जगभरातील. सभास्थानी ऐकु येणाऱ्या ” सभ्य स्त्री पुरुष हो..” या भावणाहीन शब्दांच्या जागी कुणीतरी पहिल्यांदा आपुलकीच्या भावनिक शब्दांचे उच्चारण केले होते.

“जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली , अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो” या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. त्यांच्या भाषणाने जगाला भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानाची ओळख करुन दिली. त्यांच्या वक्तृत्वाने धर्म परिषदेतील संपूर्ण जगातील प्रतिनिधी प्रभावित झाले. जगाची नजर भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्याकडे नव्या दृष्टीकोनातून बघण्यास मजबूर झाली.

अमेरिकेतील वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन ‘भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी’ असे केले.

” वेदान्त आणि योग ” या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. याच काळात त्यांनी अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.

Swami Vivekananda यांचे कार्य

स्वामी विवेकानंद वयाच्या तिसाव्या वर्षी, म्हणजेच १८९३ साली शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेत भारताचे प्रवक्ते म्हणून गेले, जवळपास ४ वर्षे अविरत प्रवास करून जगभर फिरले. आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने, ज्ञानाने आणि वक्तृत्वकौशल्याने जगभरात भारताचं नाव पोचवलं, पाश्चिमात्यांचे भारताबद्दलचे आणि हिंदू धर्माबद्दलचे गैरसमज दूर केले. जगभरात भारताबद्दल कुतूहल जागृत केलं. जगाला धर्म, कर्म, वेद आणि योग सोप्या भाषेत समजावले .

१८९७ साली भारतात परतल्यावर त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यानंतर दोन वर्षे संपुर्ण भारत फिरून आपले कार्य सुरु ठेवले. सततच्या प्रवासाने आणि धावपळीने त्यांची तब्येत खालावली. तरीहि १८९९ साली ते दुसऱ्या दौऱ्यासाठी परत परदेशी गेले. तेथें त्यांनी लागोपाठ व्याख्याने दिली. सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क मध्ये वेदांत सोसायटीची स्थापना केली. कॅलिफोर्नियात शांती आश्रमाची स्थापना केली.

१९०० साली ते भारतात परतले तेव्हा दमा, मधुमेह आणि निद्रानाशाने त्यांना पुरतं ग्रासलं होतं. शारीरिक आणि मानसिकरीत्या ते थकले होते.

भारत आणि भारतीय तत्त्वज्ञान यांच्या प्रसारासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट उपसले. ‘Complete Works of Swami Vivekananda’ या पुस्तकात त्यांनी केलेल्या कामाची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

“१५०० वर्षे या भारतीयांना पुरून उरेल एवढं काम मी करून ठेवलं आहे” असं ते एकदा म्हणाले होते.

समाधी

आपले इतिकर्तव्य संपल्यावर सिद्ध कधीही आयुष्याचे ओझे वाहत या मर्त्य जगात वावरत नाहीत. आपले कर्तव्य संपले आहे असे विवेकानंदांना वाटले तेव्हां त्यांनी आपला निर्वाणाचा दिवस ठरवला होता. कॅलेंडरवर तशी खूण त्यांनी करून ठेवली होती. शुक्रवार दिनांक ४ जुलै १९०२.

त्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. मग ते ध्यानाला बसले. ध्यान करत असताना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली.

स्वामी विवेकानंद स्मारक

ऊन्यापुऱ्या अवघ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात समुद्रायेवढे काम करुन ठेवलेल्या या सिद्ध योगी सन्यासी महापुरुषाचे स्मारक भारताच्या दक्षिण टोकावर वावातुराई, कन्याकुमारी येथील समुद्रातील दोन खडकांवर बांधलेले आहे. स्वामी विवेकानंद डिसेंबर १८९२ मध्ये याच खडकांवर ध्यानास बसले होते.

विवेकानंद स्मारक समितीने १९७० साली स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ हे स्मारक बांधले. दक्षिण भारतातील हे एक पवित्र तीर्थस्थान व पर्यटन केंद्र आहे.

Conclusion – Swami Vivekananda Information in Marathi

मानवाच्या अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.

कर्म, संयम आणि तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून अविनाशी आनंद म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती करता येते. ईश्वर अनेक रूपाने आपल्या समोर उभा आहे. तिकडे दुर्लक्ष करुन आपण भलतीकडेच ईश्वराला शोधतोय. जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात, तेच ईश्वराची खरी सेवा करतात.

अशी मानवतावादी शिकवण जगाला देणारे महान सन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल आज आपण जाणुन घेतले. समुद्राचे पाणी ओंजळीत मावने शक्य नाही तद्वतच महापुरुषांच्या कार्याचे वर्णन करता येणे अशक्य आहे.

आजचा लेख स्वामी विवेकानंद संपूर्ण माहिती मराठी | Swami Vivekananda Information in Marathi । Swami Vivekananda Mahiti Marathi आपल्याला कसा वाटला ते कमेंट करुन अवश्य सांगा. लेख आवडला असल्यास नक्की शेअर करा. आपल्याला काही प्रश्न असल्यास अवश्य विचारा. काही सूचना असल्यास आम्हाला कळवा. आपल्या सूचनांचे आम्ही स्वागत करु.

FAQs

स्वामी विवेकानंद चे गुरु कोण ?

रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरू होते.

स्वामी विवेकानंद यांची समाधी कुठे आहे?

स्वामी विवेकानंद यांनी शुक्रवार दिनांक ४ जुलै १९०२, या दिवशी कोलकत्याजवळील बेलूर मठात घेतली.

हे देखील वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi

1 thought on “स्वामी विवेकानंद संपूर्ण माहिती मराठी | Swami Vivekananda Information in Marathi”

Leave a Comment