पंडित जवाहरलाल नेहरू माहिती | Pandit Jawaharlal Nehru Mahiti Marathi

मित्रांनो आज आपण Pandit Jawaharlal Nehru Mahiti Marathi बद्दल जाणून घेणार आहोत. भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव नक्कीच घेऊ शकतो. नेहरूंनी स्वतंत्र्य चळवळीमध्ये गांधीजींबरोबर खूप काम केले. स्वतंत्र्यानंतर नेहरूंनी भारताचे पंतप्रधान म्हणून उत्कृष्ट काम केले.

या लेखात आपण Pandit Jawaharlal Nehru Mahiti Marathi यांच्या प्रारंभिक जीवन, त स्वतंत्र चळवळ आणि पंतप्रधान म्हणून केलेले कामाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.

Pandit Jawaharlal Nehru Mahiti Marathi

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

Pandit Jawaharlal Nehru Mahiti Marathi

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये अलाहाबाद येथे झाला होता. पंडितजींचे वडील मोतीलाल नेहरू हे एक काश्मिरी पंडित आणि पेश्याने बॅरिस्टर वकील होते. नेहरूजींच्या आई स्वरूप राणी थुस्सू, या लाहोर मध्ये स्थायिक झालेल्या काश्मिरी पंडित कुटुंबात पैकी होत्या. मोतीलाल नेहरूंना तीन मुले होती त्यापैकी जवाहरलाल नेहरू हे सर्वात मोठे होते. त्यांच्या बहिणी चे नाव विजयालक्ष्मी पंडित आणि कृष्णा हुथीसिंग होते.

शिक्षण

पंडित जवाहरलाल प्राथमिक शिक्षण घरी खाजगी शिक्षकांद्वारे झाले. नेहरूजींना लहानपणापासून विज्ञान आणि थिऑसॉफी मध्ये खूप आवड होती. पुढील शिक्षण 1905 मध्ये त्यांनी इंग्लंडमधील हॅरो या उच्च शाळेमध्ये घेतले. नंतर च्या शिक्षणासाठी नेहरू ऑक्टोबर 1907 मध्ये ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज गेले, आणि तेथेच 1910 मध्ये त्यांनी नॅचरल सायन्स या विषयांमध्ये पदवी चे शिक्षण पूर्ण केले. याच काळात पंडित जवाहरलाल नेहरूंनी राजकारण, अर्थशास्त्र, इतिहास आणि साहित्याचा अभ्यास खूप आवडीने केलं. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नेहरू लंडनला वकिलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले.

वकिली

वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नेहरूजी 1912 मध्ये भारतात परतले आणि त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून नाव नोंदणी केली. वकिली बरोबरच नेहरूजी बॅरिस्टर चे अभ्यास करत होते. पंडित जवाहरलाल नेहरूजींचा या व्यवसायामध्ये मन लागत नव्हता. राष्ट्रीय चळवली मध्ये भाग हळूहळू वाढत गेल्यामुळे त्यांनी वकिली चे काम काळांतराने बंद केले.

स्वातंत्र्य चळवळीतील योगदान

वकिली करता करता नेहरूजी राजकीय चळवळीमध्ये पूर्ण वेळ देऊ लागले, ते प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सामील झाले व त्यानंतर 1920 च्या दशकात ते प्रथम पुरोगामी गटामध्ये सामील झाले आणि शेवटी काँग्रेसचे नेते म्हणून काम करायला लागले. नेहरूंचा काम बघून त्यांना महात्मा गांधींचे समर्थन प्राप्त झाले होते. पुढे जाऊन गांधीजींनी नेहरूंना त्यांचे राजकीय वारस म्हणून नियुक्त केले.

Pandit Jawaharlal Nehru Mahiti Marathi (1)

पुढे जाऊन नेहरू राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले. 1929 मध्ये नेहरूंनी ब्रिटिश राजवटी पासून संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होते. पुढील वर्षात म्हणजेच 1930 च्या दशकात नेहरूजींचा आणि काँग्रेस भारताच्या राजकारणावर वर्चस्व होतं. 1937 मध्ये भारतामध्ये निवडणूक घोषित केली होती या निवडणुकीमध्ये नेहरूंनी धर्मनिरपेक्ष भारत राष्ट्राची कल्पना केली होती, यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत मोठा विजय मिळवता आला आणि काँग्रेसने अनेक भारतातील प्रांतामध्ये सरकारी स्थापन केली होती.

सप्टेंबर 1939 मध्ये महायुद्ध सुरू झालं होतं, या युद्धामध्ये व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी भारतीयांशी संवाद न करता युद्धामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोध करण्यासाठी काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामा दिला होता.

8 ऑगस्ट 1942 ला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने भारत छोडो हा ठराव पारित केला होता. या ठरावानंतर काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना पकडून तुरुंगात टाकले होते, त्यामुळे काही वेळासाठी संघटना चिरडली गेली.

याच काळात मुस्लिम नेते मुहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीग मध्यंतरी मुस्लिम राजकारणावर वर्चस्व गाजवायला सुरू केले होते. साल १९४६ च्या प्रांतिक निवडणुकांमध्ये काँग्रेसने निवडणुका जिंकल्या परंतु मुस्लिम लीगने मुस्लिमांसाठी राखीव असलेल्या सर्व जागा जिंकल्या, याचा अर्थ पाकिस्तान राष्ट्र बनवण्याचा एक स्पष्ट आदेश असल्याचे ब्रिटीशांनी स्पष्ट केले. नेहरू हे सप्टेंबर १९४६ मध्ये भारताचे अंतरिम पंतप्रधान बनले आणि ऑक्टोबर १९४६ मध्ये लीग त्यांच्या सरकारमध्ये सामील झाली.

पंतप्रधान म्हणून महत्त्वाची भूमिका

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र झाले. नेहरूंनी भारताचे प्रथम पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि लाल किल्ल्यावर भारताचा झेंडा फडकवला. नेहरूंनी पंतप्रधान बनल्यानंतर खूप सारे आर्थिक सामाजिक आणि राजकीय सुधारणांचे महत्त्वाचे कार्यक्रम राबवले. जसं नेहरूंचं कार्यकाल वाढत होतं तसं काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत होता. नेहरूंनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकारणामध्ये वर्चस्व ठेवले होते यामुळेच 1951,1957, आणि 1962 मध्ये काँग्रेसने सर्व निवडणुका जिंकल्या होत्या.

1947 ते 1950 या कालखंडात जे प्रदेश राज्य होते जे भारतामध्ये सामील होण्यास नकार देत होते त्यांना नेहरूजींनी आणि सरदार पटेल यांनी एकत्र केले होते. 1962 मध्ये भारत आणि चीन मध्ये युद्ध होते, त्या युद्धात भारताचा पराभव झाला होता, पराभव होऊनही भारताच्या जनतेमध्ये इंग्रजी लोकप्रिय राहिले होते.

नेहरूंनी भारताचे पंतप्रधान म्हणून 18 वर्षे काम केले, प्रथम अंतिम पंतप्रधान म्हणून 1947 ते 1950 पर्यंत आणि त्यानंतर 1950 पासून भारतीय प्रजासत्ताक चे पंतप्रधान म्हणून काम केले.

हत्येचा प्रयत्न

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूजींवर एकूण चार हत्येचे प्रयत्न झाले. नेहरूनवर पहिला हत्येचा प्रयत्न झाला तो 1947 मध्ये फाळणीच्या वेळी, ते कारमधून प्रवास करत असताना हा प्रयत्न झाला होता. दुसरा हत्येचा प्रयत्न 1955 मध्ये महाराष्ट्रात नागपूर जवळ एका रिक्षा चालक बाबुराव लक्ष्मण पोचले याने चाकूने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. नेहरूजींवर तिसरा हत्येचा प्रयत्न 1956 मध्ये मुंबईमध्ये झाला होता. चौथा हत्येचा प्रयत्न 1961 मध्ये महाराष्ट्र रेल्वे ट्रॅक वर बॉम्बस्फोटद्वारे करण्यात आला होता.

एवढे हल्ले होऊन सुद्धा नेहरूजींनी कधी त्यांच्या आजूबाजूला जास्त सुरक्षा रक्षक ठेवण्यास मनाई केली होती. त्यांच्या प्रवासामध्ये वाहतूक विस्कळीत होणे त्यांना कधीच आवडत नसायचे.

मृत्यू

1962 चीन भारत युद्धानंतर ने रोजींची तब्येत ढासाळू लागली होती. दिल्लीमध्ये त्यांची तब्येत काही बरी होत नव्हती काय डॉक्टरांच्या सल्ल्याने 1963 पर्यंत नेहरूजी बरे होण्यासाठी काश्मीरमध्ये गेले तेथे त्यांनी खूप महिने घालवले. नंतर 26 मे 1964 रोजी ते डेहराडून वरून परत आल्यावर त्यांना खूप आराम वाटले होते. नेहरूजी नित्य नेहमीप्रमाणे 23.30 वाजता झोपायला गेले, सकाळी साडेसहा पर्यंत शांतपणे झोपले, नंतर अंघोळ करून आल्यावर त्यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यांनी डॉक्टरांना फोन केले आणि लगेच तिथे जमिनीवर कोसळले, ते बेशुद्धच होते, दुपार 01:44 वाजता, नेहरूजींचे मृत्यू होईपर्यंत तसेच बेशुद्ध पडून राहिले होते.

27 मे 1964 रोजी दुपार दोन वाजता लोकसभेत नेहरूजींच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली. त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले होते.

पुरस्कार

साल १९४८ मध्ये, जवाहरलाल नेहरूंना म्हैसूर विद्यापीठा तर्फे मानद डॉक्टरेट देण्यात आली होती. नंतर नेहरूजींना मद्रास विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि केयो विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त झाली होती.

साल १९५५ मध्ये, नेहरूंना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी पंतप्रधानांचा सल्ला न घेता त्यांना हा सन्मान दिला, ही सामान्य घटनात्मक प्रक्रिया होती कारण नेहरू स्वतः पंतप्रधान होते. 

साल २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये नेहरू चौथ्या क्रमांकावर होते.

Conclusion – Pandit Jawaharlal Nehru Mahiti Marathi

जवाहरलाल नेहरू हे खूप महान व्यक्ती होते. त्यांनी भारताच्या आर्थिक सामाजिक राजकीय साठी खूप अतुलनीय काम केले होते. नेहरूजींना छोटी मुलं खूप आवडायची. सर्व मुले त्यांना चाचा नेहरू म्हणून संबोधायचे. या लेखात आपण Pandit Jawaharlal Nehru Mahiti Marathi यांची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे.

धन्यवाद !

FAQs

पंडित जवाहरलाल नेहरू किती वर्ष पंतप्रधान होते?

पंडित जवाहरलाल नेहरू 18 वर्ष पंतप्रधान होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन कधी झाले?

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन 27 मे 1964 झाले.

हे देखील वाचा

सचिन तेंडुलकर यांची संपूर्ण माहिती | Sachin Tendulkar Marathi Mahiti

2 thoughts on “पंडित जवाहरलाल नेहरू माहिती | Pandit Jawaharlal Nehru Mahiti Marathi”

Leave a Comment