मित्रांनो, आज आपण Ashtavinayak Ganpati Names and Places in Marathi बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. श्री गणेशाचं नाव घेतल्याशिवाय कुठलंच कार्य सुरू करता येत नाही, म्हणून या लेखाची सुरुवात ही बाप्पाच्या नावाने केली आहे. अष्टविनायक म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच येतात, आठ गणपती ज्यांच्या दर्शनाने सर्वजण तृप्त होऊन जातात.
Ashtavinayak Ganpati Mandir अष्टविनायक गणपती मंदिरे हे खूप जुने प्रसिद्ध गणपती चे मंदिरे आहेत. पेशवाई काळात पेशवा द्वारे या अष्टविनायक गणपतीच्या मंदिरांचा सांभाळ केला जात होता.
आपण सर्वांनी कधीतरी अष्टविनायक दर्शन केलच असेल. अष्टविनायक यात्रा करत असताना जो सुखानंद भेटतो त्याला शब्दात सांगता येणार नाही. अष्टविनायक यात्रा ही दोन ते तीन दिवसात पूर्ण करता येते. तर चला मग अष्टविनायक गणपती यात्रेची संपूर्ण माहिती घेऊया.
Table of Contents
अष्टविनायक गणपतीची नावे | Ashtavinayak Name List in Marathi
अष्टविनायक गणपतीचे संपूर्ण माहिती घेण्या अगोदर आपण अष्टविनायक गणपती ची नावे जाणून घेऊया, ते खालील दिल्याप्रमाणे आहेत,
- श्री मोरेश्वर गणपती मंदिर, मोरगाव, पुणे
- श्री चिंतामणी मंदिर, थेऊर, पुणे
- श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक, अहमदनगर
- श्री महागणपती मंदिर, रांजणगाव, पुणे
- श्री विघ्नहर मंदिर, ओझर, पुणे
- श्री गिरिजात्मक मंदिर, लेण्याद्री, पुणे
- श्री वरदविनायक मंदिर, महड, रायगड
- श्री बल्लाळेश्वर मंदिर, पाली, रायगड
अष्टविनायक गणपती संपूर्ण माहिती । Ashtavinayak Ganpati Places List in Marathi
वर आपण अष्टविनायक गणपतीचे नाव आणि ठिकाण याच्याबद्दल माहिती घेतली, आता आपण अष्टविनायक गणपती मधील प्रत्येक गणपतीची सविस्तर माहिती घेऊया.
श्री मोरेश्वर गणपती मंदिर, मोरगाव । Ashtavinayak Ganpati Mandir
श्री मोरेश्वर गणपती ला मयुरेश्वर गणपती असं हि म्हटलं जातं. अष्टविनायकापैकी मोरेश्वर गणपती हा पहिला गणपती मानला जातो. पुणे जिल्ह्यात, बारामती तालुक्यात, मोरगाव गाव आहे, तिथे श्री मोरेश्वर गणपती चे मंदिर आहे. हा मंदिर कधी बांधला याचे संदर्भ भेटत नाहीत पण गणेश भक्त मोरया गोसावी यांनी हा मंदिर बांधला असे म्हटले जाते. हे मंदिर गाणपत्य संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान मानले जाते. श्री गणेशाने मोरावर बसून सिंदुरा राक्षसाचा वध केला होता, म्हणूनही ह्या गणपतीला मयुरेश्वर ही म्हणतात.
हे गणेशाचं पवित्र तीर्थक्षेत्र कऱ्हा नदीच्या किनारी वसलेलं आहे. मंदिराच्या सर्व भोवती तटबंदी आहे आणि चार कोपऱ्यात चार मिनार सारखे खांब आहेत. मंदिराच्या चार दिशेला चार दरवाजे आहेत आणि चारही दरवाजांवरती गणेशाच्या मुर्त्या आहेत, हे चार दरवाजे असे दर्शवतात की चारही युगात श्री गणेश आहेत. मंदिराला पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो. मुख्य मंदिरात मोरेश्वर गणपतीची मूर्ती आहे, मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबी मध्ये हिरे आहेत. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या पितळेच्या मुर्त्या आहेत.
मोरेश्वर गणपती मंदिर पुण्यापासून 65 किलोमीटर लांब आहे. या मंदिरापासून 17 किलोमीटर वर श्री जेजुरी क्षेत्र खंडोबा चे मंदिर आहे. मोरेश्वर गणपतीचे मंदिर मुंबईपासून 224 किलोमीटर लांब आहे.
श्री चिंतामणी मंदिर, थेऊर
अष्टविनायक पैकी दुसरा गणपती म्हणजे थेऊरचा श्री चिंतामणी गणपती. या मंदिरा संदर्भात काही कथा आहेत त्यापैकी एक कथा आहे अशी आहे की ब्रह्मदेवाचे मन स्थिर राहत नव्हते तर मन स्थिर करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी श्री गणेशाची आराधना केली म्हणून या ठिकाणाला थेऊर असे नाव पडले.
अजून एक अशी कथा आहे की गुणा सूर नावाचा एक दानव होता, त्याने एक दिवस कपिल मुनी कडून चिंतामणी हिरा चोरला, हे कपिल मुनींना कळल्यावर, त्यांनी गणपतीला तो हिरा परत आणण्यासाठी सांगितले, श्री गणपतीने गुणासुराचा वध केला आणि तो हिरा परत आणला. कपिल मुलींनी तो हिरा न घेता, श्री गणेशाला तो हिरा अर्पण केला आणि त्यांची चिंता ही मिटली. तेव्हापासून या ठिकाणी श्री गणेशाला चिंतामणी ही म्हटले जाते.
प्रथमतः संत मोरया गोसावी यांचे नातू श्रीधरणीधर महाराज यांनी हे मंदिर बांधले होते. यानंतर शंभर वर्षांनी पेशव्यांनी या मंदिराची पुनर्बांधणी करून येथे एक आकर्षक भव्य मंदिर आणि सभागृह बांधले. मंदिर पूर्ण लाकडी आहे. श्री गणेशाचे हे मंदिर कंदम वृक्षा खाली आहे. पेशव्यांनी मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा हे लावली. मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे. गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आणि डाव्या सोंडेची आहे. श्री गणेशाच्या दोन्ही डोळ्यात हिरे आणि लाल मनी आहेत.
श्री क्षेत्र चिंतामणी गणपती मंदिर सोलापूर महामार्गावर पुण्यापासून 25 किलोमीटर लांब आहे आणि मुंबईपासून 178 किलोमीटर लांब आहे.
श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक
सिद्धिविनायक गणपती हे अष्टविनायक पैकी तिसरे गणपती आहे. अष्टविनायक गणपती पैकी हे एकमेव उजव्या सोंडेच्या गणपती आहेत. या गणपती संदर्भात एक कथा आहे, मधु आणि कैटभ नावाचे दोन दानव होते, ते ब्राह्मणांना खूप त्रास देत होते, हे बघून श्री विष्णू ने त्यांच्याबरोबर लढाई करण्यास सुरुवात केली, पण विष्णू देवाला त्यांचा पराभव करता येत नव्हता. म्हणून ते शिवशंकरा जवळ गेले तेव्हा शंकर देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही लढाई सुरू करण्या अगोदर श्री गणेशाची पूजा केली नाही. तेव्हा सिद्धटेक येथे श्रीविष्णू ने तपश्चर्या केली आणि श्री गणेशाला प्रसन्न केले. श्री गणेशाने त्यांना शक्ती (सिद्धी) प्राप्त करून दिली. ह्या ठिकाणी श्री गणेशा ने श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून दिली म्हणून श्री गणेशाला सिद्धिविनायक म्हणून संबोधले जाते.
सिद्धिविनायक गणपती हे उजव्या सोंडेचे असल्याकारणाने हे खूप शक्तीशाली आहेत असे सांगण्यात येते, पण त्यांना प्रसन्न करणे ही खूप कठीण आहे. पूर्वी सिद्धिविनायक गणपतीचं टेकडीवर छोटासा मंदिर होतं तिथे जाण्यासाठी पण रस्ता नव्हता. पेशवे काळात सरदार हरीपंत फडके यांनी तिथे रस्ता बांधला होता. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मोठे मंदिर बांधले होते.
सिद्धिविनायक गणपती मंदिरातले मूर्ती ही स्वयंभू आहे, तिची उंची तीन फूट आणि रुंदी अडीच फूट आहे. श्री गणेशाच्या मूर्तीचे तोंड उत्तरे कडे आहे. हे मंदिर भीमा नदी किनारी वसले आहे. मंदिरातील श्री गणेशाचे गाभाऱ्यातील मखर पितळेचा आहे आणि सिंहासन पाषाणाचा आहे. मंदिराच्या सुरुवातीलाच नगारखाना आहे.
सिद्धिविनायक गणपती हे अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक येथे आहे. पूर्वी इथे मंदिराकडे पोहोचण्यासाठी होडीने नदी पार करावी लागत असे, पण आता पूल बांधल्याकारणाने तेथे पायी किंवा गाडीने जाता येतो. सिद्धिविनायक गणपती मंदिर पुण्यापासून 98 किलोमीटर लांब आहे आणि मुंबईपासून अडीचशे किलोमीटर लांब आहे.
श्री महागणपती मंदिर, रांजणगाव
श्री महागणपती हे अष्टविनायक पैकी चौथे गणपती आहेत. श्री महागणपती रांजणगाव पुणे जिल्ह्यात आहे. महागणपती रांजणगावचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. या मंदिरा संदर्भ एक कथा आहे, ती अशी आहे की, त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता. त्याला एक वरदान होता की, त्याला शंकराशिवाय कोणच मारू शकत नाही, म्हणून त्याने सर्वत्र थैमान घातला होता. सर्व देवांना त्रास देत होता. तेव्हा शंकराने या त्रिपुरासुराचा वध केला होता. येथे शंकराने श्री गणेशाचे स्मरण केले होते या गावाचं नाव मणिपूर होते. येथे शंकराने श्री गणेशाची मूर्तीची स्थापना केली होती. तेच गाव आता रांजणगाव म्हणून ओळखले जाते.
या मंदिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे असे सांगण्यात येते. . श्रीमंत माधवराव पेशवे इथे नेहमी श्री गणेशाच्या दर्शनासाठी येत जात. माधवराव पेशव्यांनी या मंदिराचा गाभारा बांधला आणि इंदूरचे सरदार किबे यांनी मंदिराचा सभामंडप बांधला आहे.
मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती खूप दर्शनी आहे, पण असं सांगण्यात येते की, या मंदिरातील मूळ मूर्ती खाली तळघरात ठेवण्यात आली आहे या मूळ मूर्तीला दहा सोंड आणि वीस हात आहेत. श्री महागणपती मंदिराची रचना अशा तऱ्हेने केली आहे की सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. श्री महागणपती ची मूर्ती पूर्वा भिमुख आहे व ते उजव्या सोंडेची आहे. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या मंदिरात लोकांचे दर्शनासाठी खूप गर्दी असते.
श्री महागणपती रांजणगाव चे मंदिर पुणे अहमदनगर महामार्गावर, पुण्यापासून 50 किलोमीटरवर आहे. हे मंदिर मुंबई पासून 195 किलोमीटर लांब आहे.
श्री विघ्नहर मंदिर, ओझर
श्री विघ्नहर गणपती हे अष्टविनायक पैकी पाचवे गणपती आहे. हे गणपती पुण्या जिल्ह्यातील ओझर या ठिकाणी आहे. या मंदिरा संदर्भ एक कथा आहे ही अशी की अभिनंदन नावाचा एक राजा होता, त्याला त्रिलोकाधिश बनायचे होते. त्यासाठी त्याने एक यज्ञ सुरू केला. हे पाहून इंद्राला भीती वाटू लागली म्हणून इंद्राने विघ्नासुर नावाचा राक्षस उत्पन्न केला आणि त्याला सांगितले की त्या यज्ञात अर्थ लहान अडथळा आण. विघ्नासुराने त्या त्या यज्ञात अडथळा आणलाच पण त्याने दुसऱ्या सर्व यज्ञात अडथळा आणण्यास सुरुवात केली. हे बघून ऋषिमुनींनी श्री गणपतीची आराधना केली आणि विघ्नासुरापासून त्यांची सुटका करण्यास सांगितले.
श्री गणपतीने विघ्नासुरा बरोबर लढाई केली आणि त्याला पराभूत केले. विघ्नासुरा गणपतीच्या शरण गेला आणि त्यांनी माफी मागितली. गणपतीने त्याला एक अटीवर सोडण्यास मान्य केले की जिथे गणपतीची पूजा केली जाते, तिथे तो कधीच विघ्न नाही आणणार. विघ्न सुराने अट मान्य केली आणि श्री गणेशाला विनंती केली की येथे तुमच्या नावा अगोदर माझा नाव घेण्यात यावा आणि तुम्ही येथेच या ठिकाणी वास्तव्य करा. गणपतीने विघ्नासुराची विनंती मान्य केली व तेथेच “विघ्नहर” नावाने वास्तव्य करायला लागले.
श्री विघ्नहर गणपती चे मंदिर पेशव्यांनी बांधले होते. साल 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे मंदिर बांधले होते. मंदिराच्या वरती एक सोनेरी कलश ही लावण्यात आले होते. मंदिराच्या समोर सभागृह आहे, तो वीस फूट लांबीचा आहे. गणपती मंदिराचा गाभारा दहा बाय दहा फुटाचा आहे. मंदिरातील मूर्ती पूर्वाभिमुख आहे. श्रींच्या मूर्तीच्या कपाळावर आणि नाभीवर हिरे जडले आहेत.
श्री विघ्नहर गणपती देवस्थान नारायणगाव पासून आठ किलोमीटर कुकडी नदीच्या किनाऱ्यावर आहे. श्री विघ्नहर गणपती मंदिर पुण्यापासून नव्वद किलोमीटर लांब आणि मुंबईपासून 195 किलोमीटर लांब आहे.
श्री गिरिजात्मक मंदिर, लेण्याद्री
श्री गिरीजात्मक गणपती मंदिर हे अष्टविनायकापैकी सहावे गणपती आहेत. हे गणपती पुण्या जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. या मंदिर संदर्भात एक कथा आहे, पार्वती माते ने इथे श्री गणेशाचे पार्थिव मूर्ती बनवली होती आणि त्या गणेशाच्या मूर्तीची पार्वती मातेने बारा वर्षे तपश्चर्या केली. गणपती त्यांना पुत्र म्हणून प्राप्त व्हावा म्हणून त्यांनी हे तपश्चर्या केली. बारा वर्षानंतर श्री गणेश पार्वती मातेच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन, भाद्रपद महिन्यात बटू स्वरूपात प्रकट झाले.
सह्याद्रीच्या या डोंगरामध्ये 28 लेण्या आहेत त्या पैकी एका लेणीमध्ये गणपती आहे, म्हणून या लेण्यांना गणेश लेणी ही म्हणतात. गिरजात्मक गणपती मंदिर लेण्याद्रीच्या आठव्या गुहेमध्ये आहे. हे मंदिर संपूर्ण दगडाला पोखरून बनवलेला आहे, या मंदिरात एकही खांब नाही आहे, हे या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य आहे. खाल पासून मंदिरापर्यंत 367 पायऱ्या आहेत. गणपतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत मंदिरातील मूर्तीवर उजेड पडत असतो.
श्री गिरिजात्मक गणपती मंदिर पुण्यापासून शंभर किलोमीटर लांब आहे व मुंबईपासून 150 किलोमीटर लांब आहे.
श्री वरदविनायक मंदिर, महड
श्री वरद विनायक गणपती हे अष्टविनायक पैकी आठवे गणपती आहे. हे गणपती रायगड जिल्ह्यातील महड गावात आहे. असे वरद विनायक गणपती संदर्भात एक कथा आहे ती अशी आहे की, गृत्समद नावाचा ऋषी होता, त्याचा जन्म इंद्र आणि त्याची आई मुकुंदा यांच्या अनैतिक संबंधामुळे झाला होता. हे समजल्यावर गृत्समदा ने त्याच्या आईला श्राप दिले आणि तो एका भद्रक वनात तपश्चर्या करायला गेला. त्यांनी विनायकाची आराधना केली. श्री विनायक त्याला प्रसन्न झाला आणि त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने गणपतीकडे अशी मागणी केली की “तुम्ही या वनात वास्तव्य करा आणि सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करा”. ते मान्य करून विनायक तेथे राहू लागले. हेच ते भद्रक वन म्हणजेच आत्ताचे “महड” होय.
या ठिकाणी गृत्समदा ला श्री गणेशाने वर दिले म्हणून येथे विनायकाला “वरदविनायक” असे म्हणतात. या मंदिरासंदर्भात अजून एक कथा आहे, 1690 मध्ये धोंडू पौढकर नावाच्या माणसाच्या स्वप्नात गणपती येतो आणि ते सांगतात की माझी मूर्ती या तलावात आहे. धोंडू पौढकर त्या तलावातून गणपतीची मूर्ती बाहेर काढतात आणि स्थापना करतात. नंतर येथे 1725 मध्ये कल्याणच्या सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी मंदिर बांधले.
श्री वरद विनायक गणपतीचे मंदिर हे कौलारू साधे कौलारू आहे. कळशाचा वरचा भाग सोन्याचा आहे. मंदिराच्या चारही कोपऱ्याला चार हत्तीच्या मूर्ती आहेत. श्री गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्तीच्या बाजूला एक दिवा तेवत असतो, तो सदाकाल पेटलेला असतो असं सांगण्यात येते की ते 1825 पासून दिवा पेटलेला आहे. हे मंदिर भाविकांसाठी 24 तास खोले असते, तुम्हाला दर्शन एकदम मूर्तीच्या जवळून करायला भेटतो.
श्री वरद विनायक मंदिर पुण्यापासून 90 किलोमीटर लांब आहे आणि मुंबईपासून 60 किलोमीटर लांब आहे.
श्री बल्लाळेश्वर मंदिर, पाली
श्री बल्लाळेश्वर गणपती हे अष्टविनायक पैकी आठवे गणपती होय. हे मंदिर रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आहे. या गणपती संदर्भात एक कथा आहे, कल्याण नावाचा एक व्यापारी होता त्याचा एक मुलगा होता त्याचं नाव होतं “बल्लाळ”. बल्लाळ गणपतीचा खूप मोठा भक्त होता, तो भक्तीमध्ये एवढा वेडा होता की त्याने आपल्या मित्रांनाही गणेश भक्ती चे वेळ लावले होते. ते सर्व जवळच्या जंगलात जाऊन गणपतीची पूजा करत असत. हे बघून त्याच्या मित्रांचे घरातील लोक अस्वस्थ झाले होते आणि त्यांनी बल्लाळ च्या वडिलांकडे तक्रार केली.
कल्याण शेठ रागाच्या भरात जंगलात गेले, हातात चाबूक घेतला होता, ते बघून सर्व मित्र पळून गेले,, बल्लाळ एकटा भक्ती मध्ये लिन झाला होता. कल्याण शेठ ने बल्लाळ खूप मारले व एका झाडाला बांधून तेथेच त्याला सोडून आले. आणि निघताना त्याला बोलून आले की आता बोलाव तुझ्या गणेशाला तुला सोडवण्यासाठी. तेव्हा गणपती तेथे एका ब्राह्मणाच्या रूपात येऊन बल्लाळ ला सोडवतात. बल्लाळ त्यांना बोलतो की ज्याने गणेशाची मूर्ती फेकली आणि मला मारले त्याला या जन्मी आंधळा , बहिरा आणि कुष्ठरोगी बनव.
श्री गणेश बल्लाळ म्हणाले. “ज्याने तुला त्रास दिला त्याला या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी सुद्धा हाल भोगावे लागतील”. मी आता तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे तुला जे हवं आहे ते वर मांग. बल्लाळ म्हणाला ” तुम्ही भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुम्ही या जागी वास्तव्य करा, अशी माझी इच्छा आहे आणि ही भूमी श्री गणेश क्षेत्र म्हणून ओळखली जावी”. श्री गणेश म्हणतात, ” तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक नावाने ओळखला जाईल आणि इथेच वास्तव्य करेन”.
इथे पूर्वी लाकडी मंदिर होते, नाना फडणवीस यांनी ते लाकडी मंदिर दगडी मंदिरात रूपांतर केले. या मंदिराची रचना अशी केली आहे की सूर्य उगवताना त्याची किरणे गणपतीच्या मूर्तीवर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन तलाव आहेत. गणेशाची मूर्ती स्वयंभू आहे आणि दोन्ही डोळ्यांमध्ये हिरे आहेत.
श्री बल्लाळेश्वर मंदिर, हे पुण्यापासून 110 किलोमीटर लांब आहे आणि मुंबईपासून 98 किलोमीटर लांब आहे.
हे देखील वाचा श्री गणेश आरती । Shri Ganesh Aarti | Shri Ganpati Aarti
श्री अष्टविनायक दर्शन । Ashtavinayak Ganpati Mandir Darshan Map
Conclusion
महाराष्ट्रातून अष्टविनायक यात्रा करण्यासाठी लाखो भाविक येत असतात. भाद्रपद महिन्यात मधील गणेश चतुर्थीला या आठ ठिकाणी खूप भक्त येत असतात. अष्टविनायक यात्रेमध्ये सर्व गणपती मंदिरामध्ये जेवणाची व राहण्याची सोय होऊ शकते. अशाप्रकारे आम्ही संपूर्ण अष्टविनायक यात्रेची माहिती या लेखामध्ये दिली आहे. तुम्हाला Ashtavinayak Ganpati Names and Places in Marathi ही पोस्ट कशी वाटली याबद्दल कमेंट करून नक्कीच सांगा. अष्टविनायक गणपती संपूर्ण माहिती । Ashtavinayak Ganpati Places List in Marathi ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा.
धन्यवाद!
FAQ-Ashtavinayak Ganpati Mandir
अष्टविनायक पैकी किती गणपती पुणे जिल्ह्यामध्ये आहेत?
पुणे जिल्ह्यामध्ये एकूण पाच गणपती आहेत.
अष्टविनायक यात्रा पूर्ण करायला किती दिवस लागतात?
अष्टविनायक यात्रा पूर्ण करायला दोन ते तीन दिवस लागतात.
3 thoughts on “अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती | Ashtavinayak Ganpati Names and Places in Marathi”