अकबर बिरबल ची गोष्ट । Akbar Birbal Story in Marathi

मित्रांना आज आम्ही तुमच्यासाठी Akbar Birbal Story in Marathi घेऊन आलोय. आपण लहानपणापासून अकबर आणि बिरबल च्या गोष्टी ऐकत आलो आहोत. त्यांच्या गोष्टींमध्ये हास्य, ज्ञान आणि काही तरी शिकवण असते.

अकबर आणि बिरबल च्या गोष्टी एवढ्या लोकप्रिय आहेत की त्यांच्या गोष्टींवर खूप सारे टीव्ही सिरीयल बनवले आहेत. अशीच एक अकबर आणि बिरबलची गोष्ट घेऊन आम्ही आलो आहोत, ज्यामधून तुम्हाला एक चांगला संदेश आणि एक चांगली शिकवण भेटेल, अशी आशा बाळगतो.

चला तर मग जाऊया अकबर आणि बिरबलच्या दुनियेत या Akbar Birbal Story in Marathi गोष्टीच्या माध्यमातून.

बिरबलाचा शोध – Akbar Birbal Story in Marathi

एके दिवशी बिरबलला बादशहा अकबर वर खूप राग आला, म्हणून तो रागवून कुठेतरी निघून गेला. आता बिरबल दरबारात दिसत नाही, हे बघून अकबराला बिरबलाची आठवण येऊ लागली. त्यांना माहित होते की बिरबल स्वतःहून परत येणार नाही. त्याला शोधायला लागेल. त्यांनी एक युक्ती आखली आणि राज्यात आव्हान केले. जो कोणी व्यक्ती या थंडगार तलावाच्या पाण्यात उभा राहील. त्याला पन्नास सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून देण्यात येतील. त्यांच्या राज्यात एक रमेश नावाचा व्यक्ती राहत होता, त्याला पैशाची खूप गरज होती, म्हणून त्यांनी हे आव्हान स्वीकारले.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रमेशने पाण्यात प्रवेश केला आणि पूर्ण रात्र पाण्यात कुडकुडत उभा राहिला. बादशहाने त्याच्यावर सेवकांना लक्ष ठेवायला सांगितले. सकाळ होताच सेवकांनी बादशहाला सांगितले की, “रमेश पूर्ण रात्र कुडकुडत तलावाच्या पाण्यात उभा राहिला होता”. बादशहाने रमेश ला बोलावले आणि विचारले, “तू कसा काय एवढ्या थंड पाण्यात रात्रभर उभा राहिलास, तलावाजवळ काय कुठला दिवा चालू होता काय?”

“हो सरकार”, रमेशने उत्तर दिले.

“तू त्या दिव्याकडे बघितलं होतंस का?”, बादशहा ने विचारले.

“हो सरकार रात्रभर मी त्याच दिव्याकडे पाहत होतो”, रमेशने सांगितले.

“बरं, तर असे आहे काय!” अकबर म्हणाला, “तू रात्रभर तलावाच्या पाण्यात उभा राहू शकलास कारण तू त्या दिव्यापासून उष्णता मिळत होती त्यामुळे तुला बक्षीस मागायचा काहीच अधिकार नाही निघून जा इथून,” अशा प्रकारे अकबराने रमेशला रागवून हाकलून दिले.

रमेश खूप दुःखी झाला, पण तो काय करणार? आपल्या घरी परत आला आणि रडत राहील.

बिरबलाला हा सर्व घडलेला प्रकार कळाला तो रमेश ला भेटला आणि म्हणाला, “तुला न्याय मिळेल.” घरी आल्यावर बिरबलने अकबरला निरोप पाठवला की मी परत आलोय. संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी जेवायला आलात तरच आपली भेट होईल. इकडे बादशहा बिरबलाची वाट पाहत होता. संध्याकाळ झाली बिरबलाचा निरोप आला नाही.

बादशहाने माणूस पाठवला आणि म्हणाला, “बिरबलला बोलावून आणा, त्याला सांगा आज जेवण इकडे घेऊ या, आम्ही त्याच्या निमंत्रणावरून पुन्हा कधीतरी घरी येऊ.” बादशहाला खूप भूक लागली होती. बादशहाच्या माणसाने परत येऊन सांगितले, “महाराज बिरबल म्हणाला की तो खिचडी बनवण्यात व्यस्त आहे, खिचडी बनवून झाल्यावर येतोच.” खूप वेळ होऊन गेला पण बिरबल आला नाही. बादशाहने बिरबलला बोलवायला पुन्हा दुसऱ्या सेवकाला पाठवले. त्याने परत येऊन पहिल्या सेवकाप्रमाणेच अकबराला उत्तर दिले.

बादशहाला खूप आश्चर्य वाटले. तो स्वतः बिरबलाच्या घरी गेला आणि जातात त्याला आश्चर्याचा धक्का बसला. बिरबलाने जमिनीवरती आग पेटवली होती आणि त्या आगीच्या धगीवर, त्याने वरती उंचावर एक मातीचे मडके बांधले होते.

बाच्या म्हणाला, “हा काय मूर्खपणा आहे? जमिनीवर पेटवलेली आगीची धग एवढ्या वरती बांधलेल्या मडक्यापर्यंत कशी काय पोहोचेल? आम्हाला काय आज उपाशी ठेवायचा विचार आहे का?”

बिरबल ने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला, “महाराज जर एक मैल लांब चालू असलेला दिवा रमेशला उष्णता देऊ शकतो आणि त्यामुळे रमेश संपूर्ण रात्रभर थंडगार कुडकुडत्या पाण्यात उभा राहू शकतो, तर मग या आगीची ढग या पाच फूट उंच वाढलेल्या भांड्यापर्यंत का पोहोचलो नाही शकणार?’

“अरे, बिरबल! आम्ही हे सगळं तुला परत मिळवण्यासाठी केले होते. तू माझ्यावर चिडून निघून गेला होतास; पण मला आनंद आहे की, माझी युक्ती कामाला आली आणि तू परत आलास. मी पन्नास नाही, तर त्या ज्या माणसामुळे आम्हाला तू परत मिळाला आहेस, त्याला पाचशे मुद्रा देईन. प्रजा बरोबरच म्हणते, बिरबल गरिबांचा खरा हितचिंतक आहे.” असे म्हणून बादशहाने विरघळला मिठी मारली आणि रमेश ला पाचशे मुजरा देऊन पाठवला.

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि Akbar Birbal Story in Marathi with moral आवडली असेल. हि गोष्ट वाचून तुम्हाला नक्कीच मजा आली असेल.

धन्यवाद !

हे देखील वाचा Marathi Story for kids | Marathi Short Stories | मराठी गोष्टी

YOUTUBE CHANNEL GROW KAISE KARE | BEST TIPS यूट्यूब चैनल ग्रो कैसे करे 2023

1 thought on “अकबर बिरबल ची गोष्ट । Akbar Birbal Story in Marathi”

Leave a Comment