रामायण कथा (भाग १)। Ramayan Story in Marathi (Part 1)

रामायण हे एक महाकाव्य आहे चे ऋषी वाल्मिकी यांनी लिहिले आहे. रामायण हे त्रेतायुग या युगात घडले होते. असे म्हटले जाते की ऋषी वाल्मिकी यांनी रामायण दिले, तसेच भगवान विष्णू यांना रामाचा अवतार घेऊन पृथ्वीवर जन्माला यावे लागले होते. रामायण कसे घडले, रामायणातील पात्र, रामायणातील सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती घेऊया.

Ramayan Story in Marathi

श्रीरामाच्या जन्माची कथा

श्रीरामाच्या जन्मापूर्वी रावणाने संपूर्ण पृथ्वीवर हाहाकार करून ठेवला होता. सर्व ऋषी, सामान्य मनुष्य, देव सर्वांचे हाल करून ठेवले होते. तेव्हा सर्व देव, ऋषी आणि ब्रह्मादेव, भगवान विष्णू कडे गेले आणि रावणाच्या अत्याचाराची कथा सांगितली. रावणाला वरदान होतं कि त्याला कोणी देव, दानव, ऋषी, रक्षक कोणीही मारू शकत नाही. या वरदानामुळे भगवान विष्णू यांनी सामान्य मनुष्याच्या रूपं जन्म घेण्याचे ठरले.

पृथ्वीलोकात सूर्यवंशी राजा दशरथ यांनी पुत्र प्राप्त होत नव्हतं. तेव्हा त्यांना त्यांच्या कुलगुरू ने पुत्र प्राप्ती साठी यज्ञ करण्यास सांगितले. या यज्ञानंतर त्यांना चार पुत्रांची प्राप्ती झाली. त्यांच्या पहिली पत्नी कौशल्य ला एक पुत्र (राम), दुसरी पत्नी कैकयी ला एक पुत्र (भरत) आणि तिसरी पत्नी सुमित्राला दोन पुत्र (लक्ष्मण , शत्रूग्नह ) झाले. भगवान विष्णू ने वचन दिल्याप्रमाणे रामाच्या रूपात अवतार घेतले.

श्रीरामाचे बालपण

श्रीराम आणि त्यांचे तिन्ही भाऊ यांना लहानपणापासून हे खूप लाड, प्रेमाने वागवत असत. चौघा भावांमध्ये एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम होते. थोडे मोठे झाल्यावर राम आणि त्यांच्या भावांना गुरुकुल मध्ये शिक्षा घेण्यासाठी पाठवण्यात आले. गुरुकुल मध्ये त्यांना सर्व वेद, खगोलशास्त्र, गणित, ज्योतिष शास्त्र ,योग अभ्यास, संगीत, शस्त्र विद्या या सर्वांचे शिक्षण देण्यात आले. गुरुकुल मध्ये त्यांची दिनचर्या सकाळी लवकर सुरु होत असे.

प्रथम त्यांना भिक्षा मागण्यास जायला लागत असे. ते करून आल्यावर बाकीचे विद्याअभ्यास करायला लागत असे. गुरुकुल मध्ये सर्व प्रकारचे मुले जसे गरीब, श्रीमंत शिक्षण घेत असत. गुरुकुल मध्ये त्यांना समानतेची, शिस्तीची आणि कठोर परिश्रमाची गुण भावना त्यांच्यात रुजू लागते. सर्व शिक्षण शिकल्या नंतर श्री राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न अयोध्येला परत आले. तिथे त्यांच्या जंगी स्वागत करण्यात आले.

ऋषी विश्वामित्र च्या यज्ञाची रक्षा, माता अहिल्येचा उद्धार

गुरुकुल मध्ये शिक्षा प्राप्त करून, अयोध्येत परत आलेच होते कि, गुरु विश्वामित्र श्री रामाला आपल्यासोबत नेण्यास आले. ऋषी विश्वमित्र आणि त्यांचे सहकारी एक मोठा यज्ञ करत होते. पण हा यज्ञ रावणाचे असुर राक्षस पूर्ण करून देत नव्हते. ते काही ना काही विघ्न आणत होते. म्हणून तो यज्ञ चांगल्या रीतीने पूर्ण व्हावा, यासाठी विश्वामित्र अयोध्येला गेले आणि श्री रामाला आपल्या राक्षे साठी घेऊन आले.

महाराज दशरथ ने श्री रामा बरोबर लक्ष्मणाला पण त्यांच्या सोबत पाठवले. आश्रमात श्री रामाने यज्ञेचे रक्षण करत, खूप काही नवीन विद्या शिकले , ज्या ऋषी विश्वामित्राने त्यांना शिकवले. श्री रामाने सर्व असुरांना मारून, यज्ञ पूर्ण करण्यास मदत केली.

श्री रामच्या जन्मापूर्वी एक गौतम ऋषी होते, त्यांनी एका चुकीच्या कारणामुळे त्यांच्या पत्नी अहिल्याला श्राप दिला, श्राप देताच त्या एक दगडामध्ये रूपांतर झाल्या. गौतम ऋषी चा राग शान्त झाल्यावर, त्यांना कळलं कि चुकीचा श्राप दिला, तेव्हा त्यांनी त्यावर एक वर दिला कि जेव्हा भगवान विष्णू रामाच्या अवतारात पृथ्वीवर जन्म घेतील, तेव्हा ते या आश्रमात येतील, त्यांचे चरण स्पर्श होताच, दगडातून मनुष्यरूपात परत येशील. त्याच प्रमाणे श्री रॅम त्या आश्रमात येतात आणि माता अहिल्येचा उद्धार करतात.

Conclusion

आपण या लेखात जाणून घेतलं कि, कसे भगवान विष्णू यांनी श्री रामाचा अवतार घेतला, श्रीरामाचे बालपणीची कथा आणि बालपणी कसे पराक्रम करून राक्षसांना मारून ऋषी विश्वामित्राला मदत केली. आम्हाला आशा आहे कि रामायण कथा (भाग १)। Ramayan Story in Marathi (Part 1) हा लेख तुम्हाला नक्की आवडला असेल.

जय श्री राम !

हे देखील वाचा Marathi Story for kids | Marathi Short Stories | मराठी गोष्टी

Leave a Comment