डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi

संपूर्ण भारतात डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi) यांचे नाव माहीत नाही, असा एकही माणूस सापडणार नाही. भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कसे होते? ते किती आणि कुठे शिकले? डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर का केले? डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दलीत चळवळीतील योगदान, त्यांचे पूर्वज, त्यांचे बालपण या सर्व गोष्टी आपण जाणुन घेणार आहोत आजच्या Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi या लेखात. चलातर जाणुन घेऊ या डॉक्टर भीमराव रामजी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar Mahiti Marathi यांच्या विषयी.

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्वज

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याकाळच्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीत जन्माला आले असले तरी ते गरीब नव्हते. अर्थात गरीबी आणि श्रीमंती या तुलनात्मक दृष्ट्या मोजल्या जाणाऱ्या गोष्टी आसतात. त्यामुळे माझ्यासारख्या मिठागर मजुराच्या मुलाच्या दृष्टीने पाहिल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा, वडील गरीब नव्हते असेच म्हणावे लागेल. का ते पुढे पाहू या.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ. ते ब्रिटिश सैन्यात शिपाई होते. म्हणजेच ते त्या काळात सरकारी नोकरीत होते. त्यामुळे त्यांना सैनिकी शाळेत शिकता आले. ते रामानंद पंथाचे अनुययी होते. मालोजीराव यांना चार आपत्य झाली. १८४८ साली जन्मलेले रामजी हे त्यांचे चौथे आपत्य.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन काकांपैकी एक सन्यासी झाले. त्यांनी घरादाराचा त्याग केला. दुसरे काका ब्रिटिश सैन्यात नोकरीला होते. त्यांच्या बाबांनी म्हणजेच रामजीनी सैनिकी शाळेत नॉर्मलची परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढे ते १८६६साली वयाच्या १८व्या वर्षी ब्रिटिश सैन्यात शिपाई म्हणुन भरती झाले. वयाच्या १९व्या वर्षी त्याचे लग्न भिमाबईंशी झाले तेव्हा भीमाबाई अवघ्या १३वर्षाच्या होत्या. रामजी इग्रजी भाषा अस्खलित बोलत. त्यांना सैन्यात बढती मिळून ते सुभेदार झाले. त्यानंतर त्यांनी सैनिकी शिक्षक म्हणून काम केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म व बालपण

रामजी व भीमाबाई यांना एकूण चौदा मुले झाली. त्यापैकी सात मुले वारली व सात मुले जगली. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात धाकटे म्हणजे चौदावे मुल होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यावेळी बाबासाहेबांचे वडील रामाजी हे महू येथिल नॉर्मल स्कुलचे मुख्याध्यापक होते.

१८९४ साली निवृत्त झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गावी कॅम्प दापोली येथे राहु लागले. हे ठिकाण त्यांचे मूळ गाव असेलल्या आंबवडे ता. मंडणगड पासुन जवळ होते. यावेळी डॉ बाबासाहेब अगदी लहान असल्याने त्यांना येथिल शाळेत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना घरीच अक्षर ओळख शिकवायला सुरुवात केली.

पुढे १८९६ साली बाबासाहेब पाच वर्षाचे असताना रामाजी सकपाळ यांनी दापोली सोडले व साताऱ्यात एका भाड्याच्या बंगल्यात राहू लागले. येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कॅम्प स्कूल या मराठी शाळेत प्रवेश मिळाला. याच वेळी बाबासाहेबांच्या आईचे आजारपणात निधन झाले. पुढे बाबासाहेब व त्यांच्या भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांची आत्या मीराबाई यांनी सांभाळली.

पुढे १८९८ साली बाबासाहेबांच्या वडिलांनी विधवा आसलेल्या जिजाबाई यांचेसोबत दुसरे लग्न केले.

भिमराव रामजी सकपाळ आंबेडकर कसे झाले ?

मराठी शाळेतील शिक्षण पुर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी बाबासाहेबांचे नाव सातारा हायस्कूल मध्ये घातले. त्यावेळी कोकणातील रिवाजाप्रमाणे रामजी सकपाळ यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी आपल्या मुलाचे म्हणजेच बाबासाहेबांचं नाव आपल्या मूळ गावाच्या नावावरून भीमराव रामजी आंबवडेकर असे नोंदवले.

या शाळेत शिक्षक असणाऱ्या कृष्णा केशव आंबेडकर यांना अंबावडेकर हे नाव उच्चारताना चुकल्यासारखे व्हायचे. तेव्हा त्यांनी बाबासाहेबांची संमती घेऊन त्यांचे आडनाव आंबेडकर असे नोंदवले.

तेव्हापासून बाबासाहेबांचे नाव आंबेडकर झाले.

मुंबईला प्रयाण

नोव्हेंबर १९०४ साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व ते परीवरासहित मुंबईला आले. लोअर परळ येथील बदक चाळीतील एका खोलीत त्यांचा परीवार राहू लागला.

येथे बाबासाहेबांनी एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला. या शाळेत जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. रामजी यांच्या लष्करातील पदाच्या प्रभावामुळे बाबासाहेबांना या शाळेत प्रवेश मिळू शकला होता. इतर जातींच्या लोकांना बाबासाहेबांचा या शाळेतली प्रवेश मान्य नव्हता.

अस्पृश्यता त्रासदायक

एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये सुध्दा बाबासाहेबांना वर्गाबाहेर बसावे लागे. शाळेतील शिक्षकांचे प्रेम तर सोडाच सहकार्यही बाबासाहेबांना लाभत नव्हते. तहान लागली तरी शाळेतली माठातील पाणी पिता येतं नव्हते. जेव्हा शाळेतली शिपाई अगदी लांबून त्यांच्या हातावर पाणी टाकावे तेव्हाच तहान भागावी अशी क्रूर वागणूक त्यांना मिळत होती. शिपाई मोकळा नसेल तर तहान सोसण्यावाचून त्यांना पर्याय नसे.

बाबासाहेबांचं लग्न

१९०६ साली दापोलीच्या भिकू वलंगकर यांची दहा वर्षाची मुलगी रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी बाबासाहेबांचा विवाह झाला तेव्हा ते शाळा शिकत होते.

बुद्ध तत्त्वज्ञानाची ओळख

एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये १९०७साली बाबासाहेब मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पास झाले. अस्पृश्य समाजासाठी हा दुर्मिळ योग होता. त्यामुळे त्यांच्या जाती बांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींच्या अध्यक्षतेखाली एक सभा आयोजित करुन बाबासाहेबांचे कौतुक केले. त्यावेळी केळुस्कर गुरूजींनी बाबासाहेबांच्या हातावर मराठीतील बुद्ध चरित्राची प्रत ठेवली. हे पुस्तक वाचून बाबासाहेब बुद्ध तत्वज्ञानाकडे अकर्शित झाले.

महाराज सयाजीराव गायकवाड यांची भेट व महावि्यालयीन शिक्षण

आर्थिक अडचणीमुळे बाबासाहेबांचे महाविद्यालयातील शिक्षण अपूर्ण राहतेय की काय असे वाटत असतानाच केळुस्कर गुरूजींनी बाबासाहेबांची भेट महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी घडवून आणली. बाबासाहेबांची आजवरची शैक्षणिक कारकीर्द पाहून महाराजांनी त्यांना दरमहा पंचवीस रूपये शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्या शिषवृतीच्या जोरावर बाबासाहेबांनी ३जानेवारी १९०८रोजी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९१२साली त्यांनीं राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांतील बी ए ची पदवी मिळवली.

नोकरी, मुलाचा जन्म व वडिलांचे निधन – Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi

पदवी मिळवून बाबसाहेब सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदे संस्थानात नोकरीवर रुजू झाले. मात्र येथेही कार्यालयात त्यांना अस्पृश्य म्हणुन अपमानजनक वागणूक मिळाली. या दरम्यान यशवंत या त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. २ फेब्रुवारी १९१३ रोजी मुंबईत त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्या नंतर चार महिन्यांनी बडोदा संस्थानचे अधिपती महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून प्रतीमाह अकरा पौंड शिष्यवृत्ती मिळाल्याने ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले.

उच्च शिक्षण

परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवणारे बाबासाहेब हे पहिले भारतीय होते.

दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले दक्षिण आशियाई होते. नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या.

१९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्यांच्या हयातीतील ते भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.

मूकनायक

आंबेडकरांचे जाती अंताचे कार्य सुरू असताना कोल्हापुरचे राजे शाहू महाराज आंबेडकरांना घरी येऊन भेटले व वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली. त्या मदतीतून १९२० साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू झाले . पांडुरंग नंदराम भटकर या पाक्षिकाचे संपादक होते.

मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी, १९२० रोजी प्रकाशित झाला. पहिल्या अंकातील त्यांनी लिहिलेला मनोगत हा अग्रलेख बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणारा होता. याच लेखातून अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे त्यांचें ठाम मत होते. ५ जुलै, १९२० मध्ये बाबासाहेब इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.

प्रबुद्ध भारत, समता, जनता , बहिष्कृत भारत इत्यादी पत्रे बाबासाहेबांनी सुरू केली होती.

बाबासाहेबांचे दुसरे लग्न

वयाच्या ५७ व्या वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा दुसरा विवाह ३९ वर्षीय शारदा कबीर यांच्याशी १५ एप्रिल १९४८ रोजी काही विशिष्ट कारणांनी झाला. लग्नानंतर सविता नाव धारण करुन त्या पतीची सेवा करू लागल्या. आंबेडकरांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असताना आंबेडकरांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आंबेडकरांचा पूर्ण निष्ठेने सांभाळ केला .

द बुद्ध अँड हिज धम्म या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पत्नीकडून मिळालेल्या मदतीचा उल्लेख केला आहे . या प्रस्तावनेत त्यांनी सविता आंबेडकर यांचे आयुष्य आठ दहा वर्षांनी वाढवल्याचे नमूद केले.

बौद्ध धर्माचा स्वीकार – हिंदू धर्मात अस्पृश्याना मानव म्हणुन सन्मान मिळत नव्हता. त्यामुळे मानवता नाकारणाऱ्या हिंदू धर्मात राहणे आपल्यासाठी योग्य नाही अशी भूमिका घेऊन दिनांक १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे अपाल्या दोन लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दिक्षा घेतली.

भूषवली पदे – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मोजण्याच्या पलीकडचे आहे. ईतके अफाट सर्व समावेशक कार्य एखादया महामानवाच्या हतूनाच घडू शकते. तरीही काही महत्वाच्या आणि मोजक्या कार्याचा उल्लेख आपण करु.

१ ) संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष २) राज्य सभेचे सदस्य ( मुंबई राज्य)३) भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री ४) भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष ५)ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, ऊर्जामंत्री व बांधकाममंत्री; व्हाइसरॉयचे कार्यकारी मंडळ ६) मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते ७)मुंबई विधानसभेचे सदस्य ८) मुंबई विधिमंडळाचे सदस्य.

राजकीय पक्षांची स्थापना – १) स्वतंत्र मजूर पक्ष २) शेडुल्ड कास्ट फेडरेशन ३) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याच बरोबर त्यांनी बहिष्कृत हीत कारणी सभा व समता सैनिक दल या सामासिक संस्थांची स्थापना केली होती.

बाबासाहेबांचे कार्य

१) चवदर तळे आंदोलन – महाड येथिल चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्याना पिण्यास बंदी होती. ती बंदी तोडण्यासाठी तळे आंदोलन केले. २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिन” म्हणून साजरा केला जातो.

२) मनुस्मृती दहन – मनुस्मृती हा जातीभेद करणारा अन्याय करणारा ग्रंथ आहे आणि त्याचा निषेध केला पाहिजे असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. म्हणुन

२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते.

३) काळाराम मंदिर प्रवेश – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील काळा राम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी हा सत्याग्रह होता.

“आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे.”

— डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे २ मार्च १९३० रोजीचे भाषण.

४) कामगारांसाठी कार्य – कामगार क्षेत्रात आज दिसत असलेल्या सुधारणा बाबासाहेब आंबेडकर यांनी अंमलात आणल्या. आंबेडकरांनीच कामगारांसाठी आठ तास काम, किमान वेतन, ईएसआय, पीएफ इत्यादी आणले .

महापरिनिर्वाण – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ६डिसेंबर १९५६ रोजी अंतिम श्वास घेतला. मुंबई, दादर समुद्र किनारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा परिसर आता चैत्यभूमी म्हणुन ओळखला जातो.

Conclusion – Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य एका लेखात समाविष्ट करणे केवळ अशक्य आहे. त्यांच्या आनेक कामांचा उल्लेख येथे आलेला नाही. याचे बद्दल दिलगिरी व्यक्त करण्याशिवाय आम्ही काहीही करु शकत नाही.

बाबा साहेबांचे कार्य केवळ अफाट आहे. संपूर्ण मानव जातीला समानतेच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही त्रिसूत्री बाबासाहेबांनी दिली. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र बाबासाहेबांनी दिला. त्यांची ग्रंथसंपदा संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक ठरते आहे. त्यांचें एकेक ग्रंथ म्हणजे एकेक विद्यापीठ आहे. अशा या महामानवाला अभिवादन करुन आजच्या लेखाची सांगता करतो.

आजचा लेख Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi आपल्याला कसा वाटला ते कमेंट करुन अवश्य सांगा. लेख आवडला असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्याला पुढील लेखात काय वाचायला आवडेल ते आम्हाला नक्की सांगा.

हे देखील वाचा पंडित जवाहरलाल नेहरू माहिती | Pandit Jawaharlal Nehru Mahiti Marathi

1 thought on “डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi”

Leave a Comment