नवरी मुलींसाठी Best उखाणे , MARATHI UKHANE FOR FEMALE
यमुनेच्या किनाऱ्यावर
कृष्ण वाजवितो पावा,
***रावांचे नाव घेते
तुमचा आशीर्वाद हवा.
समर्थांचा दासबोध अनुभवाचा साठा, ***चे नाव घेते तुमचा मान मोठा.
सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप, ***राव मला मिळाले आहेत
ते अनुरूप
शंकराच्याच्या पिंडीवर वाहते जवस, ***रावांचे नाव घेते संक्रातीचा दिवस.
एकविरा आईच्या देवळात सोन्याचा कळस, *** चं नाव घ्यायला मला नाही आळस.
गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती, ***रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती
सोनेरी चोळीला चंदेरी बटन, संजयरावांना आवडते तंदुरी चिकन.
कोऱ्या घागरीत लिंबाचा खार, ***च्या गळ्यात सोन्याचा हार.
सर्व देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्म, विष्णू-महेश, ***रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश.
चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा,
*** रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा
मराठी उखाणे नवरीसाठी । MARATHI UKHANE FOR FEMALE 2023
Learn more