Marathi Prem

भगत सिंग संपूर्ण माहिती । Bhagat Singh Mahiti Marathi

मित्रांनो आज आपण भगत सिंग संपूर्ण माहिती । Bhagat Singh Mahiti Marathi याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. भगत सिंग हे भारतीय क्रांतिकारक होते. भगतसिंग यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानामुळे आपल्या मनात आहेत. तर चला भगतसिंग च्या जीवनाबद्दल, स्वातंत्र्य चळवळीबद्दल, जेलमधील जीवनाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

प्रारंभिक जीवन – Bhagat Singh Information in marathi

भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 या साली पंजाब मधील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला होता. भगतसिंग यांच्या आईचे नाव विद्यावती आणि वडिलांचे नाव किशन सिंग होते. भगतसिंग यांचे संपूर्ण कुटुंबाने देश कार्यामध्ये आपले जीवन जगून दिले होते. भारताच्या स्वतंत्र्य आंदोलनात भगतसिंग च्या वडिलांना व त्यांच्या दोन काकांना तुरुंगवास झाले होते, जेव्हा त्यांची तुरुंगातून सुटका झाली त्याच वेळेस भगतसिंगचा जन्म झाला.

भगतसिंग च्या कुटुंबातील काही लोक त स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेत होते तर काही कुटुंबाचे सदस्य महाराजा रणजीत सिंग च्या सैन्यात सामील झाले होते. त्यांचे वडील किशन सिंग व काका हे दोघे करतार सिंग साराभ व हर दयाल यांनी स्थापन केलेल्या गदर पार्टीचे सदस्य होते.

लहानपणापासूनच भगतसिंग यांचे देशावर अपार प्रेम होते. भगतसिंग जेव्हा बारा वर्षाचे होते तेव्हा अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता, हे कांड झाल्यावर भगतसिंग यांनी तेथे जाऊन ती जागा पाहिली आणि त्यांना खूप दुःख झाले होते. ते 14 वर्षे असताना गुरुद्वारामध्ये नानकाना साहेब या जागी अनेक लोकांना जिवे मारण्याविरुद्धच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. नंतर भगतसिंग यांनी युवा क्रांतिकारी चळवली मध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.

शिक्षण

लाहोर मध्ये खालचा हायस्कूल नावाची शाळा होती, लहानपणी सारे शीख मुले त्या शाळेत जायची पण भगतसिंग च्या आजोबांना त्या शाळेतील लोक ब्रिटिश सरकार च्या निष्ठेची होते म्हणून त्यांना भगतसिंगला त्या शाळेत जाऊ दिले नाही. भगतसिंग यांनी त्यांचे शालेय शिक्षण दयानंद अँग्लो वेदिक हायस्कूल लाहोर मधून पूर्ण केले. नंतर त्यांनी लाहोर मधील नॅशनल कॉलेज मधून त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण केले. भगतसिंग यांना लिहिण्याचे व पुस्तक वाचण्याची खूप आवड होती.

स्वातंत्रीय चळवळ

भगतसिंग यांना लहानपणापासूनच स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेण्याची आवड होती. महात्मा गांधीजींनी जेव्हा असहकार चळवळ आंदोलन सुरू केली होती तेव्हा भगतसिंग यांनी या आंदोलनात सामील झाले होते, परंतु जेव्हा गांधीजींनी असंकार चळवळ बंद केली तेव्हा भगतसिंग यांचा अहिंसेच्या मार्गावरून विश्वास निघून गेला होता. या चळवळी नंतर भगतसिंग यांनी युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये भाग घेतले आणि ब्रिटिश सरकारचे पाडाव हिंसेच्या मार्गानेच होऊ शकतो या विचारांचे समर्थक झाले.

भगतसिंग यांनी इटलीच्या एका गटापासून प्रेरणा घेऊन मार्च 1926 मध्ये “नवजवान भारत सभा” याची स्थापना केली. भारतातील संघटना ” हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन” ज्यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, शहीद अश्फाकुल्ला खान यासारखे दिग्गज होते, या संघटनेचे सदस्य ते झाले.

1928 मध्ये सायमन कमिशन च्या विरोधात हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लाजपत राय आंदोलन छेडले होते. या आंदोलनामध्ये पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी लाठी चार्ज चे आदेश दिले होते, आणि या लाटी चार्ज मध्ये आपले लाला लाजपत राय जबरी जखमी झाले होते. त्यानंतर दोन आठवड्या नंतर लाला लाजपत राय यांचे निधन झाले होते. लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग ने स्कॉटला मारण्याचा प्लान केला होता. म्हणून डिसेंबर 1928 मध्ये भगतसिंग आणि त्यांचे सहकारी शिवराम राजगुरू यांनी जेम्स कॉट यांना ठार मारण्याचा ठरवले होते पण चुकून स्कॉट ऐवजी 21 वर्षे ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॅन्डर्सला गोल्या घालून ठार मारण्यात आले.

या हल्ल्यानंतर पोलीस भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शोध घेत होते, या कारणास्तव त्यांनी लाहोर सोडण्याचा निर्णय घेतला. 1929 मध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून संसदेत बॉम्ब हल्ला केला, या हल्ल्यामध्ये त्यांना कोणालाच हानी पोहोचवायची नव्हती. या हल्ल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या शरणागती गेले.

या आल्यानंतर भगतसिंग यांना जेलमध्ये पाठवण्यात आले आणि नंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

boAt Airdopes 141 ANC TWS in Ear Earbuds with 32 Db ANC, 42 Hrs Playback, 50Ms Low Latency Beast Mode, Iwp Tech,Quad Mics with Enx,ASAP Charge,USB Type-C Port & Ipx5(Gunmetal Black)

जेल मधील जीवन

भगतसिंग यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या जेलमध्ये रवाना करण्यात आले. थोडा काळ त्यांना दिल्लीच्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते त्यानंतर त्यांना मेन वाली जेलमध्ये हलवण्यात आले. मेन वाली जेलमध्ये त्यांनी असे बघितले की युरोपियन आणि भारतीय कायद्यामध्ये ब्रिटिश सरकार द्वारे भेद करण्यात यायचं. युरोपियन कैद्यांना चांगले जेवण चांगले कपडे देण्यात यायचे, पण भारतीय कायद्यांना नीच प्रतीचे जेवण घाणेरडे कपडे देण्यात यायचे.

भगतसिंग हे एक राजकीय कैदी होते, आणि राजकीय कैद्यांना जेलमध्ये चांगल्या सुविधा देण्यात यायच्या, पण या मेनवली जेलमध्ये भगतसिंग यांनाही साधारण कैद्यांबरोबर ठेवण्यात आले होते. हे सर्व प्रकार बघून भगतसिंग यांनी मेनवली जेलमध्ये जेलर विरुद्ध आवाज उठवला होता. पण त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही.

तेव्हा त्यांनी जेलमध्ये उपोषण करण्याचे ठरवले. उपोषण करण्यामागचे त्यांचे हेतू होते की भारतीय कैद्यांना चांगले जेवण, चांगले कपडे, वर्तमानपत्रके, पुस्तके वाचण्यासाठी द्यावे. हे उपोषण सोडण्यासाठी ब्रिटिश सरकारने खूप प्रयत्न केले. या उपोषणाच्या 68 व्या दिवशी भगतसिंग यांचे सहकारी दास यांचे मृत्यू झाले. ब्रिटिश सरकार तरीही काही निर्णय घेत नव्हती. या उपोषणामुळे भगतसिंग यांना खूप प्रसिद्धी भेटत होती, नॅशनल काँग्रेस पार्टी आणि भगतसिंग यांच्या वडिलांच्या विनंती वरून,116 व्या दिवशी 5 ऑक्टोबर 1929 ला भगतसिंग यांनी उपोषण थांबवण्यात आले.

या उपोषणानंतर भगतसिंग यांची प्रसिद्धी संपूर्ण भारतात झाली होती.

मृत्यू

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द व्हावी या संदर्भात गांधीजींनी लक्ष द्यावे म्हणून त्यांना विनंती केली होती. गांधीजींनी तत्कालीन गव्हर्नरला पत्र लिहून फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून विनंती केली होती, हे पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला समजतात त्यांनी भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाशी आदल्या दिवशी रात्री देऊन टाकले.

फाशीची शिक्षा 24 मार्च ला ठरवण्यात आली होती पण ही शिक्षा 23 मार्च ला देण्यात आले. भगतसिंग यांचे मृत्यू 23 मार्च 1931 साली झाले.

Conclusion – Bhagat Singh Mahiti Marathi

या लेखामध्ये आपण भगतसिंग यांच्या जीवनाचा प्रवासाबद्दल, लहानपणापासून ते मृत्यू पर्यंत संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. आम्हाला आशा आहे की भगत सिंग संपूर्ण माहिती । Bhagat Singh Mahiti Marathi हे लेख तुम्हाला नक्कीच आवडले असेल. तुम्ही या आलेखामधील माहिती निबंधासाठी किंवा भाषणासाठी वापरू शकता. हा लेख तुम्ही नक्की आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा.

FAQs – भगत सिंग संपूर्ण माहिती । Bhagat Singh Mahiti Marathi

भगतसिंग यांच्या आईचे नाव काय होते?

भगतसिंग यांच्या आईचे नाव विद्यावती होते.

भगतसिंग यांना फाशी देण्यात आली तेव्हा त्यांचे वय किती होते?

भागात सिंग यांना फाशी २३ मार्च १९३१ ला देण्यात आली , त्या वेळी त्यांचे वय २३ वर्ष होते.

भगतसिंग यांनी कुठे शिक्षण घेतले?

भगतसिंग यांनी त्यांचे शालेय शिक्षण दयानंद अँग्लो वेदिक हायस्कूल लाहोर मधून पूर्ण केले. नंतर त्यांनी लाहोर मधील नॅशनल कॉलेज मधून त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण केले.

हे देखील वाचा

पंडित जवाहरलाल नेहरू माहिती | Pandit Jawaharlal Nehru Mahiti Marathi

Exit mobile version